रवि. 3 ते 9 जाने. 2021
मेष
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. तुमच्या धंद्यातील समस्या कमी करता येतील. मोठे काम मिळवा. वसुलीचा प्रयत्न करा. धावपळ करताना प्रकृतीची काळजी घ्या. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत वरि÷ांच्या मर्जीत रहाल. राजकीय, सामाजिक कार्यात अधिक प्रगती करण्याचा विचार करा. क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रतिष्ठा वाढेल. संसारात खर्च वाढेल. शेतकरीवर्गाला नवी दिशा मिळेल. शिक्षणात प्रगती कराल.
वृषभ
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. धंद्यात मिळते-जुळते धोरण ठेवा. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात धोका स्वीकारू नका. संसारात अडचणी येतील. तणाव होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत काम वाढेल. अचानक कामात बदल होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक अडचणी निर्माण करतील. प्रक्षोभक भाषण त्रासदायक ठरेल. शेतकरी वर्गाने संयम ठेवावा. वाकडे पाऊल उचलू नये.
मिथुन
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. आळस नको. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. नोकरीतील कठीण कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्याला गती राहील. किचकट समस्या रेंगाळत ठेवू नका. संसारातील तणाव कमी होईल. शेतकरी वर्गाची मेहनत फळाला येईल. शिक्षणात मागे राहू नका.
कर्क
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. तुमचा उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. किरकोळ वादविवाद, गैरसमज, संसार, नोकरीत होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी निर्माण केल्या जातील. व्यसन नको. नवीन ओळख झालेल्या क्यक्तीपासून थोडे दूर रहा. प्रति÷ा सर्वत्र सांभाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. शेतकरी वर्गाने संयम ठेवावा. संधी मिळेल. जिद्द ठेवा.
सिंह
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहे. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. धंद्यातील प्रश्न सोडवा. वसुली करा. नवे काम मिळवा. नोकरीतील कामे रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कमीपणा वाटून घेऊ नका. संसारातील कामे होतील. शब्द जपून वापरा. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. पैसे गुंतवतांना काळजी घ्या.
कन्या
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. प्रकृतीत सुधारणा होईल. उतावळेपणा नको. खाण्या-पिण्याची काळजी सप्ताहाच्या सुरुवातीला घ्या. धंद्यात तणाव वाढवू नका. मिळेल ते काम स्वीकारा. नोकरीत तुमच्याकडे जबाबदारी देण्यात येईल. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर सावध रहा. वाहनाचा वेग कमी ठेवा. शेतकरी वर्गाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जीवनाला महत्त्व द्या. व्यसन नको.
तुळ
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. वसुली करा. मोठं काम मिळवा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. योजना मार्गी लावण्याचा प्रत्न करा. शेतकरी वर्गाला नवा मार्ग मिळेल. मालाची विक्री करता येईल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. संसारातील समस्या कमी होतील.
वृश्चिक
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. धंद्यात फायदा वाढेल. मोठे कंत्राट मिळवा. वसुली करा. वादाला महत्त्व देऊ नका. नोकरीत प्रगती होईल. नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. विरोधकांचा विचार कमी समजू नका. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. शेतकरी नवे तत्व स्वीकारू शकेल, उत्साह वाढेल. घर, खरेदी विक्री करता येईल. संसारात आनंदी रहाल.
धनु
या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लूटो प्रवेश करीत आहेत. सप्ताहाच्या शेवटी अडचण येईल. वाद वाढवू नका. कायदा पाळा. धंद्यात सुधारणा होईल. शेतकरी वर्गाल नवा पर्याय शोधता येईल. जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरि÷ांना खुष करता येईल. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने सुरुवात करा. लोकसंग्रह वाढेल. कला, क्रीडा साहित्यात चमकाल. शिक्षणात प्रगती होईल. घरातील तणाव कमी होईल.
मकर
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, तुमच्याच राशीत बुध, प्लूटो प्रवेश करीत आहेत. धंद्यात नम्रपणे व्यवहार करा. कठोर शब्द वापरू नका. नोकरीत काम वाढेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कोणताही वाद-विवादाला थारा देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जाईल. जवळचे लोक अखडू धोरण घेतील. संसारात चिंता वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसन नको. नवीन ओळखीवर एकदम विश्वास ठेवू नका. शिक्षणात लक्ष द्या.
कुंभ
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहेत. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळेल. मैत्रीच्या सहाय्याने धंद्यातील समस्या सोडवता येईल. बाकी वसूल करा. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. बेजबाबदार वाटेल, असे वक्तव्य करण्याची चूक कोणत्याही क्षेत्रात करू नका. राजकीय, सामाजिक कार्यामुळे मान वाढेल. कठीण कामे लवकर करून घ्या. संसारात तुमच्या आधाराची गरज महत्त्वाची ठरेल. शिक्षणात आळस नको.
मीन
या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत बुध, प्लुटो प्रवेश करीत आहे. आर्थिक व्यवहारात तणाव होईल. संयम ठेवा. धंद्यात फायदा होईल. मनासारखे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. बेकारांनी नोकरी शोधावी. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. अनुभवी लोकांच्या ओळखी होतील. संसारात सुखद समाचार मिळेल. कला, क्रीडा, साहित्य शिक्षणात पुढे जाता येईल. कामे रेंगाळत ठेवू नका.