रविवार दि.31 जानेवारी ते दि.6 फेब्रुवारी 2021
मेष
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, सूर्य,चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई टाळा. मागील येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत काम वाढेल. संसारात धावपळ होईल. अनाठायी खर्च होईल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक अडथळे निर्माण करतील. प्रकृतीची काळजी घ्या. मान प्रतिष्ठा, चित्रपट, कला, क्रीडा विभागात वाढेल. शिक्षणात माघार घेऊ नका.
वृषभ
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील अडचणी सोडवता येतील. मोठे काम मिळवा. वसुली करण्यात यश मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. बेकारांना काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगति करता येईल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. शेतकऱयाला सुखाचा सप्ताह वाटेल. कला, क्रीडा, शिक्षणात यश मिळेल.
मिथुन
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात उतावळेपणाने वागू नका. गुंतवणूक चुकीच्या ठिकाणी होऊ शकते. मोहाला बळी पडू नका. नोकरीत सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल. नोकरी सांभाळून ठेवणे कठीण वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात कायद्याच्या चौकटीत राहून बोला, निर्णय घ्या. आरोप येतील. संसारात एखाद्या व्यक्तीचा विरह होईल. प्रकृतीची काळजी घ्या. शिक्षणात आळस नको.
कर्क
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. हा सप्ताह यश देणारा ठरेल. कठीण कामे करून घ्या. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. संसारातील कामे होतील. जवळच्या लोकांना खूष ठेवाल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने कामे होतील. पद मिळेल. शेतकरी वर्गाला लाभ मिळेल. कला, क्रीडा शिक्षणात प्रगती होईल.
सिंह
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात तणाव होईल. खर्च वाढेल. गोड बोलून तुमची कामे करून घ्या. नोकरीत कामाचे तास वाढतील. वरि÷ांच्या बद्दल अपशब्द काढू नका. आरोप येईल. राजकीय, सामाजिक कार्यात नकळत चूक होईल. नम्रपणे तुमचे मत मांडा. अरेरावी कुठेही करू नका. शेतकरी वर्गाची फसगत होईल. सावध रहा. जीवाला जपा. स्पर्धा कठीण आहे.
कन्या
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, चंद शुक्र लाभयोग होत आहे. नवीन ओळखून धंद्यात काम मिळवा. रविवार प्रवासात घाई करू नका. घरासंबंधी असलेली समस्या लवकर सोडवा. योग्य सल्ला घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना लवकर पूर्ण करा. लोकांच्या समवेत चर्चा करा. त्यांना मदत करा. शेतकरी वर्गाला लाभ मिळेल. संसारात चांगली बातमी मिळेल. स्पर्धा जिंकाल.
तुळ
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव, चिंता होईल. धंद्यात गोड बोलून रहा. हिशोब नीट करा. महत्त्वाची वस्तु सांभाळा. नोकरीत कायदा पाळून कामे करा. शेतकरी वर्गाला संम्रम निर्माण होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. लोकांच्या टिकेवर प्रत्युत्तर न देता निरीक्षण करा. प्रवासात घाई करू नका. संसारात कामे वाढतील. स्पर्धा सोपी नाही.
वृश्चिक
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर विरोध वाढेल. धंद्यात कामे मिळतील. वेळ कमी पडेल. मागील थकबाकी वसूल करा. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. इतरांच्या कामात मदत केल्याने नवे मित्र मिळतील. संसारातील समस्या सोडवता येईल. विवाह, पुत्र प्राप्ती याकडे लक्ष द्या. शेतकरी वर्गाला लाभ मिळेल. तुमच्या कामात यशस्वी व्हाल.
धनु
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात काम वाढेल. नवा निर्णय घेता येईल. थोरा- मोठय़ांच्या मदतीने फायदेशीर काम मिळेल. नोकरीत प्रगती होईल. शेतकरी वर्गाला संकटातून बाहेर पडता येईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात चुका सुधारून नवे कार्य आरंभ करता येईल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. स्पर्धा जिंकाल.
मकर
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, शुक्र, शनि युती होत आहे. रविवार वादविवाद, तणाव होईल. वाहनापासून धोका होईल. सावध रहा. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळवा. वसुली करा. संसारातील समस्या कमी होतील. शुभ बातमी मिळेल. नोकरी मिळेल, प्रगती होईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. पदाधिकार मिळेल. स्पर्धेत चमकाल. कलाविष्कार कौतुकास्पद होईल. शिक्षणात पुढे जाल.
कुंभ
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, शुक्र, शनि युती होत आहे. गोड बोलून तुमच्याकडून गुपित काढून घेतले जाईल. फसू नका. विरुद्धलिंगी क्यक्ती मनस्ताप देईल. मनावर दडपण येईल. धंद्यात हिशोब नीट करा. नोकरी टिकवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. प्रतिष्ठा, पद यावर घाला घातला जाईल. कायदा पाळा. यश मिळवा. स्पर्धा वाढेल. शिक्षणात माघार घेऊ नका.
मीन
या सप्ताहात मकरेत बुध वक्री, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम मागे ठेवू नका. आळस नको. धंद्यात वाढ, लाभ होईल. जुने येणे वसूल करा. शेतकरी वर्गाला फायदेशीर सप्ताह ठरेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. घरात चांगली घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता, प्रति÷ा मिळेल. पद मिळेल. स्पर्धा जिंकाल. शिक्षण सोडू नका. व्यवहार पूर्ण करा.