रविवार दि.7 ते 13 फेब्रुवारी 2021
मेष
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, शुक्र, गुरु युती होत आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कोणतेही काम करण्याचा आळस करू नका. धंद्यात जम बसेल. वसुली करा. ओळखीने मोठे काम मिळू शकेल. नोकरीत प्रभाव वाढेल. संसारात आनंदी वातावरण राहिल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मनाप्रमाणे डाव टाकता येईल. पद मिळवता येईल. रविवारी प्रवासात सावध रहा. स्पर्धेत चमकाल.
वृषभ
या सप्ताहात कुंभेत सुर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करून घ्या. वाद कुठेही वाढवू नका. मनावर एखादे घरगुती दडपण राहील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरि÷ांच्या दबावाखाली रहावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने कामे पूर्ण करा. नवा अधिकार प्राप्त होईल. नवीन ओळखीने उत्साह वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल. शिक्षणात मागे राहू नका.
मिथुन
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. नम्रता ठेवा, गोड बोला तरच धंद्यात टिकाव लागेल. हिशोब नीट करा. नोकरी टिकवा. वरि÷ांना विरोध करू नका. संसारात खर्च वाढेल. वाटाघाटीत वाद होईल. सप्ताहाच्या शेवटी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी होईल. कायदा कुठेही मोडू नका. स्पर्धा कठीण असेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीपासून कामे करा. धंद्यात सुधारणा होईल. फायदा मिळेल. शेतकरी वर्गाच्या मालाला चांगला उठाव येईल. नोकरीतील कामे रेंगाळत ठेवू नका. संसारात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेळेला महत्त्व द्या.
सिंह
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मोह जास्त ठेवू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीत काम वाढेल. चुका करू नका. संसारात खर्च वाढेल. जवळच्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. थकवा जाणवेल. औषध-पाणी वेळेवर घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात केंडी होईल. प्रश्नाचे उत्तर सप्ताहाच्या शेवटी मिळेल.
कन्या
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. अडकलेले पैसा लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा. चांगला सल्ला अव्हेरू नका. धंद्यात काम मिळेल. नोकरीत तुमचे कौतुक करतील. परिचयात वाढ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. मुले मदत करतील. वाहन जपून चालवा. रागाच्या भरात कठोर बोलाल.
तुळा
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला चिडचिडेपणा होईल. मनाविरुद्ध काम करावे लागेल. पोटाची काळजी घ्या. नोकरीच्या कामात सावध रहा. कायदा पाळा. वाहन हळू चालवा. संसारात किरकोळ वाद होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. प्रति÷ा टिकवा. शिक्षणात कष्ट घ्या. स्पर्धेत टिकून रहाणे महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात नवा प्रयोग यशस्वी ठरेल. मोठे काम मिळवा. वसुली करा. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. वरि÷ांची मर्जी राहील. काम नसलेल्यांना काम मिळेल. संसारात सौख्य मिळेल. अविवाहितांना स्थळे मिळतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे करा. लोकप्रियता मिळेल. स्पर्धेत प्रगती होईल. शिक्षणात पुढे जाल.
धनु
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, शुक्र, गुरु युती होत आहे. यशस्वी सप्ताह ठरेल. धंद्यात वाढ होईल. शेतकरी वर्गाला लाभ होईल. कठीण प्रश्न सोडवाल. नोकरीत प्रगती होईल. घरात आनंदाची घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात आत्मविश्वासाने पुढे जाल. योजनांना गती मिळेल. परिचयात वाढ होईल. स्पर्धेत अव्वल रहाल. शिक्षण पूर्ण करा.
मकर
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात चर्चा सफल होईल. थोरामोठय़ांच्या मदतीने अधिक मोठे काम मिळवा. वसुली करा. नोकरीत प्रगती होईल. बदल करता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक कार्याला योजनाबद्ध पद्धतीने पुढे न्या. अधिकार मिळेल. नवे मित्र मिळतील. घरातील तणाव कमी होईल.
कुंभ
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे नीट ठेवा. हिशोबात चूक करू नका. नोकरी टिकवा. कायदा पालन करून मग निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्यावर आरोप होईल. टीका होईल. नवीन ओळखीवर जास्त भरवंसा ठेवू नका. घरात तणाव, अशांतता वाटेल.
मीन
या सप्ताहात कुंभेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला किचकट कामे करून घ्या. धंद्यात फायदा होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत कामात नैपुण्य दिसेल. राजकीय, सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी समस्या येईल. रागावर नियंत्रण ठेवा. लोकप्रियता मिळेल. स्पर्धेत यश मिळेल. शिक्षणात जिद्द ठेवा.