रवि. दि. 14 ते 20 फेब्रुवारी 2021
मेष
या सप्ताहात कुंभेत शुक्र राश्यांतर, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात गोड बोला. धंद्यात वाढ होईल. रागावर ताबा ठेवा. वसुलीसाठी मेहनत घ्या. मोठे काम मिळवा. नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होईल. घरात शुभ घटनेमुळे आनंदी व्हाल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मनाप्रमाणे खेळी खेळता येईल. पदाधिकार मिळेल. जुना वाद संपेल. स्पर्धेत पुढे रहाल. नावलौकिक मिळेल. शिक्षणात प्रगती होईल.
वृषभ
या सप्ताहात कुंभेत शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात चांगली सुधारणा करता येईल. मोठे कंत्राट मिळेल. परिचयातून अडलेले काम करून घ्या. जुने येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने पुढे नेता येईल. सप्ताहाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत वरि÷ तुमची बाजू घेतील. स्पर्धेत जिंकाल. शिक्षणात प्रगती होईल. माघार घेऊ नका.
मिथुन
या सप्ताहात कुंभेत शुक्र राश्यांतर, मंगळ, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात चर्चा करतांना सावध रहा. करारात फसगत होईल. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यावर आरोप करेल. पैसा अनाठायी खर्च होईल. नोकरीत कायद्याच्या विरोधात न जाता निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर जागृत रहा. तत्परता ठेवा. विरोधक तुमच्यावर नजर ठेऊन असतील. शब्द जपून वापरा. संसारात जबाबदारी वाढेल. वस्तु नीट सांभाळा.
कर्क
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात जम बसवा. थकबाकी वसुल करा. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. नोकरीत, कामात लक्ष द्यावे लागेल. नवीन ओळख नीट पारखून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. दादागिरी न करता तुमचे मत व्यक्त करा. प्रभाव अधिक वाढेल. घरातील कामे रेंगाळत ठेऊ नका. स्पर्धा अटीतटीची ठरेल. शिक्षणात जिद्द ठेवा. यश मिळेल.
सिंह
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, चंद्र, मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. दौऱयात सावध रहा. फसगत टाळा. धंद्यात हिशोब नीट करा. मोह जास्त न ठेवता व्यवहार करा. नोकरीत प्रभाव दिसेल. मेहनत घ्यावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात योग्य शब्द वापरा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यावर आरोप, टीका करेल.
कन्या
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. हिशोब नीट करा. गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. अरेरावीची वर्तणूक त्रासदायक ठरेल. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टिका होईल. पद जाणार नाही याची काळजी घ्या. घरातील व्यक्तीची नाराजी होऊ शकते. मोह आवरा. स्पर्धेत कष्ट घ्या. शिक्षणात आळस नको. वाकडी वाट नको.
तुळ
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, मंगळ, नेपच्यून लाभयोग होत आहे. कठीण प्रसंगातून मार्ग काढा म्हणजे अधिक अनुभवी व्हाल. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवा. शब्द जपून वापरा. नोकरीत कामामध्ये लक्ष द्या. धावपळ होईल. घरातील कामे वाढतील. प्रसंगावधान ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांचे मत ऐकून घ्या. मैत्रीच्या नात्याने वागून दुसऱयांना मान द्या.
वृश्चिक
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. चतुराईने वागा. धंद्यात वाढ होईल. रागाने नुकसान होते. संबंध बिघडतात. दूरदृष्टिकोन ठेवा. नोकरीत काम वाढेल. घरातील व्यक्तींना दुखवू नका. खाण्याचे तंत्र सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला तडजोड करावी लागेल. आडमुठे धोरण ठेवल्यास लोक नाराज होतील. स्पर्धेत कष्ट घ्या. शिक्षणात आळस नको. यश खेचता येईल.
धनु
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे धोरण वापरता येईल. वसुली करा. परिचयात वाढ होईल. जुना गैरसमज दूर सारुन राजकीय, सामाजिक कार्यात प्रगति करता येईल. जनहिताचे धोरण डोळय़ासमोर ठेवा. यश मिळेल. संसारात मुले आनंद देतील. अविवाहितांना स्थळे येतील. प्रयत्न करा. स्पर्धा महत्त्वाची प्रसिद्धीची ठरेल. शिक्षण पूर्ण करा.
मकर
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यातील अडचणी दूर करता येतील. जोरदार प्रयत्न करा. कर्जाचे काम होईल. थोरा-मोठय़ांच्या सहाय्याने पुढे जा. नोकरीत तुमचे वरि÷ांच्या बरोबर सलोख्याचे संबंध तयार होतील. राजकीय, सामाजिक कार्याला शिस्तबद्ध पद्धतीने पुढे न्या. ठोस कार्य करा. पद मिळवा. स्पर्धेत चमकाल. शिक्षणात उच्च यश मिळवा.
कुंभ
या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, मंगळ, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. आहे तो धंदा नीट करा. हिशोब चुकू नका. वस्तू नीट सांभाळा. नोकरीतील तणाव कमी होईल. घरातील कामे, खर्च वाढेल. दगदग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रपणे बोला. पद टिकवा. शब्द शस्त्रासारखेच असतात. स्पर्धेत कष्ट घ्या. शिक्षणात आळस नको. संगत चांगली ठेवा.
मीन
या सप्ताहात कुंभेत शुक्र प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात नवा प्रयोग न करता आहे तेच नीट सांभाळा. नुकसान टाळा. नोकरीत कामे वाढतील. प्रवासात सावध रहा. अनाठायी खर्च टाळा. मोह आवरा. व्यसन नको. घरातील क्यक्तींना कमी लेखू नका. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व टिकवून ठेवा. गुप्त कारवायांना कमी समजू नका. शिक्षणात मेहनत घ्या.