रविवार दि.7 ते शनिवार 13 मार्च 2021
मेष
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, सूर्य-नेपच्यून युती होत आहे. धंद्यात मोठा लाभ मिळेल. जम बसवा. मागील थकबाकी वसूल करा. मोठे काम मिळेल. नोकरीत वरिष्ठांना तुमच्याबद्दल आदर वाटेल. कामाचे कौतुक होईल. उन्नतीचे पद मिळेल. संसारातील तणाव कमी होईल. चांगली घटना घडेल. राजकीय-सामाजिक कार्यात, दौऱयात प्रभाव वाढेल. योजना पूर्ण होतील. अधिकार मिळेल. शिक्षणात यश येईल.
वृषभ
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. रविवार, सोमवार क्षुल्लक अडचणी येतील. संयमाने बोला. वाहन हळू चालवा. धंद्यात वाढ होईल. कामाचा व्याप वाढवता येईल. थकबाकी मिळवा. नवीन ओळखीचा उपयोग होईल. संसारात धावपळ झाली तरी आनंद मिळेल. नोकरीत वर्चस्व दाखवाल. चांगला बदल होईल. राजकीय, सामाजिक कार्यात पुढे जाल. लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल.
मिथुन
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील तणाव कमी करता येईल. नवे काम युक्तीने मिळवा. जुना वाद वाढवू नका. प्रवासात घाई नको. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. नोकरीत परिस्थिती पाहून तुमचे मत व्यक्त करा. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रतिष्ठा टिकवता येईल. कला, क्रीडा, शिक्षणात संधी सोडू नका. संसारात स्थिरता वाटेल.
कर्क
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. कठोर बोलणे टाळा. नोकरवर्गाला सांभाळून घ्या. संसारात धावपळ होईल. वृद्धांची चिंता वाटेल. आप्तेष्ठाना मदत करावी लागेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवा. वाद वाढवू नका. मैत्रीत तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. आरोप येईल. प्रतिष्ठा सांभाळणे कठीण वाटेल. स्पर्धा कठीण आहे. मेहनत घ्या.
सिंह
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, सूर्य, नेपच्यून युती होत आहे. मंगळवार, बुधवार कटकटी वाढतील. नोकरीत नम्रपणे वागा. धंद्यात काम मिळेल ते घ्या. जुने येणे वसूल करा. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करा. संसारात स्थिरता राहील. राजकीय, सामाजिक कार्यातील प्रश्न थोडय़ा प्रमाणात मार्गी लावता येतील. दौऱयात यश मिळेल. प्रकृती सुधारेल. नवीन ओळखी होतील. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. कष्ट घ्या.
कन्या
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात प्रश्न निर्माण होतील. कामगार वर्ग चिंताजनक कृती करती. लाभ कमी झाला तरी चालेल. धंदा चालू ठेवा. नवीन खर्च टाळा. नवीन ओळख धोकादायक ठरेल. सावध रहा. संयम, नम्रता ठेवा. मेहनत घ्या. नोकरीच्या कामात चूक होऊ शकते. संसारात समस्या येतील. तुमचे मन अस्थिर राहील. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक ठिकाणी वक्तव्य जपून करा. तटस्थ रहा. स्वतःचे पद राखा. स्पर्धा कठीण आहे.
तुळ
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. कोणत्याही प्रश्नावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. राग वाढेल. प्रवासात घाई नको. धंद्यात स्थिरता वाटेल. वसुली करा. नवे काम घ्या. किचकट कामे करून घ्या. घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. दुखाला टाळा. नोकरीत महत्त्वाचे काम करा. वरि÷ तुमचे मत ऐकून घेतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व टिकवता येईल. कामे पूर्ण करा. भेट घ्या. चर्चा करा. कष्ट घ्या.
वृश्चिक
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात रागाने वागू नका. गिऱहाईक टिकवा, खाण्याची काळजी घ्या. धावपळ होईल. नोकरीत मनमानी चालणार नाही. वाहन हळू चालवा. संसारातील कामे करा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तणाव वाढेल. आरोप येईल. जवळचे सहकारी नाराज होऊ शकतात. स्पर्धेत टिकून रहा. अहंकाराची भाषा उपयोगी पडणार नाही.
धनु
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात नवे करता येईल. काम मिळवा. तुम्ही ठरवाल ते करून दाखवता येईल. कठीण कामे करून घ्या. संसारात सुखद समाचार मिळेल. अविवाहितांना योग्य स्थळे मिळतील. पुत्र प्राप्तीसाठी राजकीय, सामाजिक कार्यात गतिमान घटना घडतील. प्रति÷ा वाढेल. स्पर्धा जिंकाल. शिक्षण सोडू नका.
मकर
या सप्ताहात कुंभेत बुध प्रवेश, सूर्य, नेपच्यून युती होत आहे. धंद्यातील कोणतीही समस्या सोडवता येतील. प्रयत्न वाढवा. नवे काम मिळवा. ओळखी वाढतील. मोठय़ा लोकांच्याकडून मदत मिळेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. तुमच्या कामाचे श्रेय मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जा. वेळेला महत्त्व द्या. व्यसन नको. जिद्द ठेवा. ध्येय गाठा. शिक्षणात प्रगती होईल. घरात शुभ समाचार मिळेल.
कुंभ
तुमच्याच राशीत बुध प्रवेश, सूर्य, नेपच्यून युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. आवेश, उत्साह वाढेल. धंद्यातील तणाव कमी करता येईल. रागावर ताबा ठेवा. कोणताही वाद वाढू देऊ नका. कायदा पालन करा. नोकरीत वरिष्ठाच्या मतानुसार काम करावे लागेल. तुमचे कौतुक होईल. मंगळवार, बुधवार वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात काम वाढेल. तुमच्याकडे महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पाहिले जाईल.
मीन
कुंभेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात मिळते जुळते धोरण ठेवा. हिशोब नीट करा. गिऱहाईक तोडू नका. नवे काम मिळणे सोपे नाही. पैशाने कामे होतील, या भ्रमात राहू नका. नम्रता ठेवा. स्वतःची काळजी घ्या. संसारात कुणाला कमी समजू नका. नोकरीत व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात टीका सहन करावी लागेल. पद सांभाळा. लोकप्रियता कमी होईल. मोह टाळा.