दि. 4 ते 10 एप्रिल 2021
मेष
या सप्ताहात कुंभ राशीत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात सबुरीने वागा. घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. वस्तू नीट सांभाळा. नोकरीत काम वाढेल. नाराजी दिसू देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी केले जाईल. बोलण्यात एकवाक्मयता ठेवा. संसारात क्षुल्लक समस्या येतील. खर्च वाढेल. डोळय़ांची काळजी घ्या.
वृषभ
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वसुली करून घ्या. नवे काम मिळेल, असा प्रयत्न करा. नोकरीत वर्चस्व कायम ठेवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात योजना वेळेत पूर्ण करा. रविवारी ताण वाढेल. लोकांना नाराज करू नका. संसारातील कर्तव्य वेळीच पूर्ण करा. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.
मिथुन
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात लाभ होईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात कायदा पाळा, वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करा. कुणाला कमी समजू नका. कला, क्रीडा, साहित्यात नवे शिकावयास मिळेल.
कर्क
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात नवे मोठे काम मिळू शकेल. बाकी येणे वसूली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत तुमच्या कामावर वरि÷ खूष होतील. घरात दगदगीचे काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही ज्यांना मान देता त्यांच्यावर रागावू नका. संयमाने वागा. कठीण प्रसंगावर मात करता येईल.
सिंह
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात संधीची वाट पहा. हातात असलेले काम पूर्ण करा. नोकरीत तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जवळचे लोक करतील. संयम ठेवा. परिस्थिती बदलेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकांना शह देण्यात हळूहळू यश मिळेल. कुठेही उतावळेपणा नको.
कन्या
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या लवकर सोडवा. मागील येणे वसूल करा. नोकरीतील कठीण कामे प्रथम पूर्ण करा. वरि÷ांच्या बरोबर सन्मानाने वागा. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्या पूर्णतेकडे लक्ष द्या. मेहनत घ्या. संसारात क्षुल्लक मतभेद होईल. पोटाची काळजी घ्या.
तुळ
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात हिशोब नीट करा. चांगल्या कामाची आशा निर्माण होईल. थोडी वाट पहा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. कायदा विसरु देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात अपेक्षित यशासाठी मेहनत घ्या. गुप्त गोष्टी उघड करू नका. नोकरी टिकवा. संसारात कामे वाढतील.
वृश्चिक
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची संधी मिळेल. वसुली लवकर करून घ्या. नोकरीत वरि÷ांना मदत कराल. राजकीय, सामाजिक कार्यात स्पर्धा वाढेल. दगदग होईल. प्रयत्नांचा वेग वाढवा. घरातील कामे करून घेता येतील. कला, क्रीडा, साहित्यात नवे काम मिळेल.
धनु
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश होत आहे. प्रत्येक दिवशी तुमचा उत्साह वाढेल. नवे काम मिळवता येईल. गोड बोला. नम्रपणाने चर्चा करा. नोकरीच्या कामात यश मिळेल. विरोधक मैत्री करतील. राजकीय, सामाजिक कार्यात नवे डावपेच टाकण्याचा विचार करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.
मकर
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करतो आहे. रविवारी तुमचा अंदाज चुकेल. धंद्यात जास्त मेहनत घ्या. लाभात वाढ होईल. चांगल्या नोकरीचा प्रयत्न करा. बेकारांना नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला गतिमान करता येईल. व्यवस्थित आखणी करा. वेळ फुकट जाऊ देऊ नका, कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. शिक्षणात मोठे यश मिळेल.
कुंभ
या सप्ताहात तुमच्याच राशीत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्येवर उपाय शोधता येईल. थकबाकी वसूल करा. कायदा मोडू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवा. दगदग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व इतरांच्या लक्षात येईल. गैरसमज, चूक सुधारता येईल. कला,क्रीडा, साहित्यात प्रगतीची संधी मिळेल.
मीन
या सप्ताहात कुंभेत गुरु, मेषेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. वसुली करून घ्या. किचकट कामे लवकर संपवा. नोकरीत, कामात बदल होण्याचा संभव आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा मार्ग दिसेल. विचारपूर्वक प्रकरण सोडवा. योग्य सल्ला घ्या. संसारात तुमच्या कामाचे कौतुक होईल. कट कारस्थानात अडकू नका.