रविवार दि.9 मे ते शनिवार दि.15 मे 2021
मेष
या सप्ताहात वृषभेत सूर्य, बुध, शनि त्रिकोणयोग होत आहे. रविवार क्षुल्लक अडचण येईल. धंद्यात जम बसेल. मनाप्रमाणे काम होईल. कर्जासंबंधी प्रश्न सोडवा. नोकरीत प्रभाव वाढेल. घरातील व्यक्तींना खूष कराल. मौल्यवान खरेदी कराल. शुभकार्य होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे स्थान मजबूत होईल. सर्वांचे सहाय्य मिळेल. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल.
वृषभ
या सप्ताहात तुमच्या राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्याला नवे वळण देता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला संयमाने वागा. उतावळेपणा करू नका. नोकरीत नमते धोरण ठेवा. संसारात तुमच्या शब्दाला महत्त्व येईल. नवीन ओळख वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तडजोडीचे धोरण ठेवा. पुढे संधी मिळेल. व्यवहारात फायदा होईल. स्पर्धेत मेहनत घ्या. निराश होऊ नका. अभ्यास करा.
मिथुन
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. धंद्यात किरकोळ वाद होईल. पार्टनर कुरकुर करेल. नोकरांना सांभाळावे लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढू शकतो. संसारात खर्च वाढेल. गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक अडचणी वाढवतील. वाद जास्त वाढू शकतो. प्रवासात काळजी घ्या. जिद्द ठेवा. स्पर्धा कठीण वाटेल. यश खेचा.
कर्क
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यात काम मिळेल. ओळखीतून फायदेशीर काम मिळवता येईल. नोकरीत प्रभाव राहील. शनिवार प्रवासात घाई करू नका. राग आवरा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. कलाक्षेत्रात विशेष यश मिळवाल. संसारातील तणाव कमी होईल. शिक्षणात आळस करू नका. चांगली संगत ठेवा.
सिंह
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. रविवारी क्षुल्लक तणाव होईल. धंद्यात वाढ होईल. वसुली करून घ्या. कर्जाचे काम होईल. प्रयत्न करा. कठीण कामे करून घ्या. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. संसारातील समस्या सोडवा. घर, जमीन खरेदी, विक्री फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यातील अवघड कामे मार्गी लावा. इतरांची मदत घेता येईल. स्पर्धा जिंकाल.
कन्या
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी मिळेल. धंद्यात लक्ष द्या. आळस करू नका. फायदा होईल. नोकरीत वरि÷ांना विरोध करू नका. संसारातील कामे होतील. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मत व्यक्त करण्याची घाई करू नका. मान सन्मानाचा प्रश्न निर्माण करू नका. तटस्थ रहा. कलाक्षेत्रात संधी मिळेल. अभ्यासात लक्ष द्या.
तुळ
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद, गुरु लाभयोग होत आहे. प्रकृतीची काळजी घ्या. इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. धंद्यात नम्रपणे बोला. हिशोब तपासा. खर्च वाढेल. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. नोकरीत क्षुल्लक ताण होईल. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. संयमाने वागा. स्पर्धेत जिद्द ठेवा. अभ्यासात आळस करू नका.
वृश्चिक
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. सप्ताह अडचणीचा असला तरी तत्परता ठेवा. दगदग वाढेल. वादाचा प्रसंग उद्भवेल. नोकरांच्या बरोबर सलगी वाढेल. वसुली करा. नोकरीत कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी सोडवण्यावर चर्चा यशस्वी करता येईल. अरेरावी करू नका. संसारात लक्ष द्या. अनाठायी खर्च टाळा. कलाक्षेत्रात प्रगती होईल.
धनु
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, मंगळ, हर्षल लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण कामे करून घ्या. धंद्यात गोड बोला. वस्तू नीट ठेवा. इतरांना मदत करण्याने खर्च वाढेल. नोकरीत, कामात बदल होईल. संसारात गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात कायद्यानुसार बोला. चूक होईल. वरि÷ांचा दबाव राहील. स्पर्धा कठीण आहे.
मकर
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद, बुध युती होत आहे. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळवता येईल. संसारातील तणाव कमी होईल. अविवाहितांना योग्य स्थळे येतील. नोकरीत तुमच्या कामावर वरि÷ खूष होतील. शनिवार वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देण्यात यश येईल. लोकसंग्रह वाढेल. प्रसिद्धी मिळेल. कलाक्षेत्रात विशेष काम कराल. स्पर्धेत जिंकाल.
कुंभ
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात वादाचे प्रसंग टाळा. कायद्यात राहून बोला, काम करा. धंद्यात तडजोड करावी लागेल. क्षुल्लक गैरसमज होईल. संसारात खर्च वाढेल. आप्ते÷ नाराज होतील. नोकरीत जास्त काम करावे लागेल. नवीन ओळखी होतील. परंतु मोहाला बळी पडू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. स्पर्धा जिद्दीने पूर्ण करा. व्यसन नको.
मीन
या सप्ताहात वृषभेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. अनाठायी पैसा खर्च करू नका. महत्त्वाची कामे करता येतील. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका. खंबीर पण नम्रता ठेवा. गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. संसारातील गैरसमज दूर करता येईल. वृद्धांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रसंगानुरुप वागा. उतावळेपणा नको. योग्य संगत ठेवा. स्पर्धेत मेहनत घ्या.