रविवार दि.8 ते शनिवार दि.14 ऑगस्ट 2021
मेष
या सप्ताहात बुध सिंहेत, शुक्र कन्येत प्रवेश करीत आहे. धंद्यात सप्ताहाच्या मध्यावर वादविवाद होईल. वस्तू गहाळ होण्याची शक्मयता आहे. नोकरीत अरेरावी करू नका. कामात लक्ष ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात अचानक काही व्यक्ती विरोध करतील. वाद होईल. संयम ठेवा. संसारात नाराजी होईल. वाटाघाटीत तणाव होईल. स्पर्धा कठीण वाटेल.
वृषभ
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात किरकोळ अडचण सप्ताहाच्या शेवटी येईल. वसुली करून घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. मान-प्रति÷ा वाढवणारी घटना घडेल. पद मिळेल. जनहिताचे कार्य वेगाने पुढे न्या. स्पर्धा जिंकाल. संसारात शुभ बातमी मिळेल.
मिथुन
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे होतील. धंद्यात फायदा होईल. नवा धंदा सुरू करता येईल. नोकरीत वरि÷ांना खूष करू शकाल. संसारातील कठीण कामे होतील. खरेदी, विक्रीत फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात सुधारणा करून प्रति÷ा वाढवता येईल. नवीन परिचय होतील. स्पर्धा जिंकाल.
कर्क
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला यशदायी ठरेल. उद्योग-धंद्यात लाभ होईल. शेअर्समध्ये फायदा वाढेल. नोकरीत तुमचे काम कौतुकास्पद ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात पुढाकार मिळेल. पद मिळेल. नवे कार्य तुमच्याकडे दिले जाईल. संसार, मुलांच्यासाठी चांगला विचार कराल.
सिंह
या सप्ताहात तुमच्या राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या शेवटी चांगला बदल धंद्यात होईल. वाद वाढवू नका. रविवार प्रवासात सावध रहा. नोकरी टिकवून ठेवा. संसारात खर्च वाढेल. नवीन खरेदी कराल. घरासंबंधी विचारविनिमय होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तत्पर रहा. विरोधक तुमची चूक शोधण्यात गर्क असतील. नम्रता ठेवा. यश खेचाल.
कन्या
या सप्ताहात सिंह राशीत बुध, तुमच्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मनावर, शरीरावर दडपण येईल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. नोकरीत तुमचे महत्त्व राहील. मैत्रीत वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडाल. प्रति÷ा मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. संसारात क्षुल्लक समस्या येईल.
तुळ
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या शेवटी मनावर दडपण येईल. खाण्याची काळजी घ्या. संसारात तणाव होईल. खर्च वाढेल. नोकरीत तुमच्या कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात कामे रेंगाळत ठेवू नका. कुणाला कमी समजू नका. नवीन ओळखीवर जास्त भरवसा ठेवू नका. धंदा सांभाळा.
वृश्चिक
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे नोकर शोधता येतील. जागेचे काम करून घेता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. संसारातील समस्या कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात दुर्लक्ष करू नका. वेळेला महत्त्व द्या. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. स्पर्धा जिंकाल.
धनु
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यातील तणाव कमी होईल. तुमच्या मालाला चांगला भाव मिळवून घेता येईल. नम्रता कुठेही सोडू नका. कायदा पाळा. रविवारी सावध रहा. नोकरीत विरोध सहन करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला अरेरावी करून चालणार नाही. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कृती करू नका.
मकर
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात किरकोळ तणाव होईल. फसगत होईल. जास्त लाभाचा मोह ठेवू नका. संसारात खर्च वाढेल. गैरसमज होईल. नोकरीत प्रभाव टिकवून ठेवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात अति महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. भेट घ्या, चर्चा करा. समस्या सोडवा. स्पर्धा जिंकाल.
कुंभ
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात किरकोळ खर्च वाढेल. वादविवाद होईल. महत्त्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. खाण्याची काळजी घ्या. वसुली करून घ्या. नोकरी टिकवा. विरोध सहन सहन करावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप केला जाईल. नियमांचे पालन करा. स्पर्धा सोपी नाही. माणसे ओळखून ठेवा.
मीन
या सप्ताहात सिंह राशीत बुध, कन्या राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. जिद्द ठेवा. वाद वाढवू नका. जास्त मोह ठेवता येणार नाही. नोकरीत काम वाढेल. विरोधक काडय़ा घालण्याचे काम करतील. संसारात समस्या कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करा. वेळकाढू धोरण ठेवू नका.