रवि. दि. 5 ते 11 सप्टेंबर 2021
मेष
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ आणि प्लूटो धनुमध्ये वक्री होत आहे. धंद्यात वाढ होईल. गिऱहाईकाशी सौम्य भाषेत बोला. वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्पर रहा. आखलेली योजना पूर्ण करा. भेटीतील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत यशस्वी व्हाल. विरोधकांना नमवता येईल.
वृषभ
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लूटो वक्री होत आहे. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. भागीदार नाराज होण्याचा संभव सप्ताहाच्या शेवटी आहे. संसारात वाद वाढवू नका. नोकरीत कामाचा व्याप राहिल. वर्चस्व टिकवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात विरुद्धलिंगी व्यक्तीद्वारे तुमची फसगत होईल. मोह आवरा. व्यसन नको.
मिथुन
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. मागील येणे वसूल करा. नवा भागीदार मिळेल. घरातील समस्या कमी करता येतील. मुलांसंबंधी प्रश्न सोडवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात कामे रेंगाळत ठेवू नका. कायदा पाळा, प्रति÷ा वाढेल. राग आवरा. नोकरीत वरि÷ांना खूष कराल.
कर्क
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लूटो वक्री होत आहे. विरोध मोडून काढता येईल. धंद्यात नवे काम मिळेल. आळस न करता कामे पूर्ण करा. नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना योग्य न्याय देता येईल. मान-सन्मानात भर पडेल. स्पर्धा जिंकाल. नवीन ओळखी होतील. प्रेरणादायी घटना घडेल.
सिंह
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. रविवार मग अस्थिर होईल. त्यानंतर मात्र तुमच्या कामाला गती देता येईल. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. घर, दुकान, जमीन खरेदी-विक्री करण्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या खऱया स्वभावाची ओळख जनतेला होईल. स्पर्धा जिंकाल.
कन्या
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लूटो वक्री होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात निभावून जाल. अरेरावीचे वर्तन करू नका. नोकरी टिकवा. कामात दक्ष रहा. राजकीय, सामाजिक कार्यात इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या. कायदा पाळा. स्पर्धा कठीण आहे.
तुळ
या सप्ताहात तुमच्या राशीत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. कोणत्याही कामाची तयारी करताना घाई गडबड करू नका. दुखापत टाळा. धंद्यात हिशोब नीट करा. नोकरीत राग वाढू देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यातील कामे मागे ठेवू नका. वेळच्यावेळी कामे करा. समस्या सोडवा. संसारात क्षुल्लक तणाव होईल.
वृश्चिक
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लूटो वक्री होत आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी मनोभावे करा. धंद्यात वाढ होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी मनावर दडपण येईल. संयम ठेवा. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांना नाराज करू नका. व्यवहारात भावना आणू नका. मैत्रीत तणाव होईल.
धनु
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. श्री गणेशाच्या आगमनाने बऱयाच समस्या सोडवता येतील. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मिळवा. कर्जासाठी प्रयत्न करा. नोकरीत चांगली संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्याकडे वरि÷ांना लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुखद घटना घडेल. स्पर्धा जिंकाल.
मकर
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. श्री गणेशाचे पूजन मनोभावे करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात जास्त अतिरेक होईल, असे वागणे टाळा. गर्व करू नका. धंद्यात वाढ होईल. वसुली करता येईल. नोकरी टिकवून ठेवा. कुटुंबात तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. स्पर्धा ही प्रगतिसाठी आहे.
कुंभ
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येतील. प्रवासात सावध रहा. धंद्यात गिऱहाईकाला दुखवू नका. राग वाढेल. संयम ठेवा. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. जवळच्या माणसांमध्ये गैरसमज होईल. गणेशपूजन मनोभावे कराल.
मीन
या सप्ताहात तुळेत शुक्र, कन्येत मंगळ, धनुमध्ये प्लुटो वक्री होत आहे. या सप्ताहात तुम्ही सर्व निर्णय सावधपणे घ्या. स्वतःची फसगत टाळा. धंद्यात संयमाने वागा. नोकरी टिकवा. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी क्षुल्लक अडचण येईल. पूजेत मन एकाग्र करा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात स्पष्ट बोलणे वादग्रस्त ठरेल, नम्रपणे बोला.