रवि. दि. 10 ते 16 ऑक्टो. 2021
मेष
नवरात्र उत्सवात कोणताही अतिरेक करू नका. ताण तणाव वाढेल. बुध, हर्षल षडाष्टक योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात काम करताना उतावळेपणा करू नका. गोड बोलून कार्य साधा. वस्तू सांभाळा. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका. प्रवासात काळजी घ्या. प्रकृती सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे डावपेच कमकुवत करण्याचा प्रयत्न होईल. जवळची माणसे चुका करतील. तडजोड करण्याची वेळ येईल. नम्रता ठेवा.
वृषभ
श्री अंबामातेच्या कृपेने तुमची अडचणीत आलेली कामे होतील. मेहनत घ्या. शुक्र, शनि लाभयोग. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहात कठीण कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. वसुली होईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यातील किचकट कामे रेंगाळत ठेवू नका. कोर्ट केस यशस्वी होईल. संसारातील कामे होतील. ओळखी वाढतील. ज्ञानात भर पडेल. कला, क्रीडा, साहित्यात नवी दिशा मिळेल. चांगला बदल कराल.
मिथुन
नवरात्र उत्सवात रागावर ताबा ठेवा. श्री जगतमातेच्या कृपेसाठी मन एकाग्र करा. धोका पत्करू नका. चंद्र, मंगळ केंद्रयोग, बुध, हर्षल षडाष्टक योग होत आहे. कायद्याला कमी लेखू नका. धंद्यात हिशोब नीट करा. वाद वाढवू नका. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रसंगावधान ठेवा. संसारात क्षुल्लक मतभेद होतील. नोकरी टिकवून ठेवा. कडवट बोलणे त्रासदायक ठरेल. मैत्रीत तणाव होईल. व्यवहारात फसू नका.
कर्क
श्री जगदंबेच्या कृपेने तुम्हाला उत्साह मिळेल. यशस्वी वाटचाल वेगाने करता येईल. शुक्र शनि लाभयोग, सूर्य, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. समस्या येतील. परंतु मार्ग मिळेल. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने कार्य करा. तुमच्या कामाचा ठसा उमटवता येईल. स्थान मजबूत करा. स्पर्धेत चमकाल. घरात खूषखबर मिळेल. आळस न करता ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. तत्पर रहा.
सिंह
श्री जगन्मातेच्या कृपेने अडचणी कमी होतील. परंतु संयम ठेवा. शत्रूला ओळखा. अनुभवी लोकांना कमी लेखू नका. चंद्र, मंगळ केंद्रयोग, सुर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मोह वाढवू नका. नोकरीत अरेरावी करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात अनुभवाशिवाय बोलू नका. प्रति÷ा टिकवता येईल. संसारात खर्च वाढेल. व्यसन टाळा. प्रेमात तणाव होईल. स्पर्धा कठीण असेल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या
श्री भक्तवत्सल अंबामाता तुम्हाला चांगली संधी देणार आहे. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करा. एकाग्र मनाने चिंतन करा. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. नोकरीत काम वाढले तरी, यश मिळेल. अरेरावी करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव दिसेल. नम्रपणे कामे करा. बुद्धी वापरा. ध्येय गाठा. नवीन ओळखी होतील. बुध, हर्षल षडाष्टक योग तणाव व चिंता निर्माण करेल. कायदा सर्वत्र पाळा. वाहन जपून चालवा.
तुळ
नवरात्र उत्सवात ताण तणाव होऊ देऊ नका. रागावर ताबा ठेवा. श्री जगतमातेच्या आराधनेकडे मन एकाग्र करा. समस्यांचा सामना करण्याची जिद्द ठेवा. चंद्र, शुक्र लाभयोग, मंगळ, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात हिशोब चुकाल. कायदा मोडू नका. नोकरी टिकवा. शब्द जपून वापरा. वाहनाचा वेग कमी ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता दाखवा. पण अतिशयोक्ती नको. नम्रता ठेवा. कोणतीही स्पर्धा जिंकणे कठीण आहे.
वृश्चिक
श्री अंबामातेच्या कृपेने कठीण कामे होतील. ती पूर्ण करा. मनोभावे आराधना करा. धंद्यात मोठी संधी मिळेल. आजपर्यंत तुमच्याशी फटकून वागणारे लोक मैत्री करण्यास येतील. वसुली करा. नवे काम मिळवा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यातील किचकट समस्या सोडवाच. लोकप्रियता मिळेल. संधी घालवू नका. संसारात सुखद, उत्साहवर्धक घटना घडेल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धा आकर्षक होईल.
धनु
नवरात्री उत्सवात तुमचा नावलौकिक वाढणार आहे. श्रीगणपतीची पूजा मनोभावे करा. खाण्या पिण्याचे तंत्र सांभाळा. संसारात किरकोळ मतभेद होतील. सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. सुधारणा करता येईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगती कराल. स्पर्धा जिंकाल. नवीन ओळख फसवी ठरू शकते. रविवारी संसारात, मैत्रीत गैरसमज होईल.
मकर
देवीच्या कृपेने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याला मदत होईल. एकाग्र मनाने ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. सोमवार, मंगळवार अडचणी येतील. सौम्य धोरण ठेवा. धंद्यात प्रगती कराल. मागील येणे वसूल करा. नोकरीत नवीन संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात नवे धोरण वापरता येईल. ओळखीचा उपयोग होईल. आनंद मिळेल.
कुंभ
नवरात्री उत्सवात नम्रपणे बोला. ताण वाढेल. तुमच्यावर आरोप येईल. सावध रहा. श्री मातेच्या कृपेने संकट दूर पळवता येईल. तरी भ्रमात राहू नका. प्रवासात घाई करू नका. धंद्यात तणाव होईल. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तणाव होईल. संशय घेतला जाईल. नोकरी टिकवा. कायदा मोडून काम करू नका. वरि÷ांना कमी लेखू नका. सूर्य, नेपच्यून षडाष्टक योग तुम्हाला स्वस्थता लाभू देणार नाही. प्रति÷ा सांभाळा.
मीन
नवरात्र उत्सवात तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. संकटाची तीव्रता कमी होईल. मनोभावे मातेचे चिंतन करा. चंद्र, शुक्र लाभयोग, सूर्य गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसवून ठेवा. प्रकृतीत सुधारणा होईल. कर्जाचे काम करा. स्पर्धेत पुढे जाल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकसंग्रह, लोकप्रियता मिळेल. कठीण कामे करून घ्या. घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. खरेदी कराल.