रवि. दि. 14 ते 20 नोव्हें. 2021
मेष
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. कुंभेत गुरु प्रवेश प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई करू नका. धंद्यात अडचणी आल्या तरी मार्ग शोधता येईल. मित्र मदत करतील. थकबाकी वसूल करा. नोकरीत कामाचा ताण राहिल. नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही काही प्रश्नावर तटस्थ भूमिका घ्या. अरेरावी करण्याने होत आलेले काम बिघडू शकते. घरातील जवळच्या व्यक्ती मदत करतील. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कला, क्रीडा, साहित्यात जास्त मेहनत घ्या. स्पर्धा सोपी नाही.
वृषभ
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात गिऱहाईकाला दुखवू नका. नवे काम मिळवण्यात अडचणी येतील. महत्त्वाच्या वस्तू नीट ठेवा. किरकोळ वाद वाढवू नका. नोकरीत कामामध्ये लक्ष द्या. मैत्रीत गैरसमज होईल. संसारात कामे वाढतील, खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकांचे मत ऐकून घ्यावे लागेल. तुमच्या बाजूने लढणारे लोक ऐनवेळी फिरू शकतात. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीसमवेत कोणताही व्यवहार करणे टाळा. गुपित सांगू नका. व्यसनाने नुकसान होईल. कला, क्रीडा, साहित्यात संमिश्र घटना घडतील.
मिथुन
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. कुंभेत गुरु आहे. अडचणीवर मात करून पुढे जावे लागेल. युक्ती वापरा. शक्तीचा उपयोग टाळा. धंद्यात कामे मिळतील. फायदा होईल. थकबाकी वसूल करा. दादागिरीची भाषा वापरू नका. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांना कमी समजू नका. तुमचे मुद्दे मांडताना काळजी घ्या. नम्रता ठेवावी लागेल. नोकरीच्या कामात बेकायदा कोणतेही काम करू नका. प्रवासात कायदा पाळा. नोकरी टिकवा. कला, क्रीडा, साहित्यात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. प्रसिद्धीसाठी घाई करू नका. वाट पहा.
कर्क
या सप्ताहात वृश्चिकेत सूर्य, बुध प्रवेश, कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात खर्च, गैरसमज होईल, तरीही तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल. भागिदाराच्या बरोबर वाद वाढवू नका. मैत्रीत तणाव होईल. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत वरि÷ांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात कामे वेळेवर पूर्ण करा. रागावर नियंत्रण ठेवल्यास प्रगती होईल. सहकारी वर्ग तुमच्या विरोधात बोलण्याची शक्मयता आहे. संसारात वाद होईल. जीवनसाथीमुळे यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. स्पर्धेत प्रगती करता येईल.
सिंह
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात जास्त गुंतवणूक न करता कामे करा. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी बुधवारपासून करा. नोकरी टिकवा. वरि÷ांच्या मर्जीनुसार कामे करावी लागतील. नवीन व्यक्ती सहवासात आल्याने उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमचे विचार पटवून द्यावे लागतील. अनुभवी व्यक्तींना कमी लेखू नका. संसारातील महत्त्वाची कामे वेळेवर करून घ्या. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती करण्यासाठी परिश्रम घ्या.
कन्या
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, मंगळ, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. वादाला जास्त वाढवू नका. भागिदार, गिऱहाईक यांच्याशी तडजोडीचे धोरण ठेवून बोला. फायदा वाढेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा अथवा नाही ठेवायचा याचा नीट विचार करा. स्वतःची फसगत होऊ देऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. संसारात क्षुल्लक समस्या मनावर दडपण आणणार आहेत. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. कुंभेत येणारा गुरु संभ्रमात टाकेल.
तुळ
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात फायदा होईल, नवे काम मिळेल. धोरण सौम्य ठेवा. रागावर ताबा ठेवल्यास कठीण कामे करू शकाल. थकबाकी वसूल करा. वाहनाचा वेग कमी ठेवा. कायदा सर्व ठिकाणी पाळा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. जिद्द ठेवा. सहनशीलता ठेवा. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक घटना घडेल. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य, बुध प्रवेश, कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात नवीन संधी मिळेल परंतु चर्चा करताना रागावर ताबा ठेवा. अहंकार ठेवू नका. करार करण्याची घाई करू नका. वसुलीचा प्रयत्न करा. वाहनाचा वेग कमी ठेवा. सावध रहा. नोकरीच्या कामात चूक करू नका. मित्र मदत करतील. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही शब्दात फसू नका. गोड बोलून प्रश्न सोडवा. कला, क्रीडा, साहित्यात पुढे जाल.
धनु
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, शुक्र, हर्षल त्रिकोण योग, कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात सुधारणा होईल. मोठेपणाच्या आहारी न जाता चर्चा करा. प्रेमाने वागा. नोकरीत मर्जी राखावी लागेल. तुमच्या बुद्धिमत्तेची तुलना इतरांच्या समवेत केली जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे येतील. मोठय़ा व्यक्ती तुमचे मुद्दे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतील. प्रति÷ा टिकवण्याचा प्रयत्न करावा लागेल. संसारातील कामे वेळेवर पूर्ण करता येतील. कला, क्रीडा, साहित्यात तुम्हाला नवी संधी मिळेल.
मकर
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, बुध, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. साडेसातीचा कालावधी सुरू असला तरी कुंभ गुरुमुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल. खाण्या पिण्याची काळजी घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी धंद्यात सुधारणा होईल. खर्च वाढेल. तुमच्या हुशारीचे कौतुक होईल. परदेशात नोकरीसाठी जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढवण्याची जिद्द ठेवा. योजना वेळेत पूर्ण करा. जवळच्या सहकारी मंडळींना दुखवू नका. क्रीडा, साहित्यात चमकाल. व्यसनाच्या नादी लागू नका.
कुंभ
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, कुंभेत गुरु येत आहे. चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. तुमचे अंदाज बरोबर येतील. जुने येणे वसूल करा. नवे काम मिळवा. कर्जाचे काम करण्याचा प्रयत्न करा. कायदा पाळा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. दौऱयात जनसंपर्क वाढेल. दिशाभूल करणाऱया व्यक्तींपासून सावध रहा. रचवून सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱया नसतात याचा अनुभव घ्याल. स्पर्धा जिंकता येईल. संसारात चांगली घटना घडेल.
मीन
या सप्ताहात वृश्चिक राशीत सूर्य, बुध प्रवेश, कुंभेत गुरु येत आहे. धंद्यात चर्चा करताना ताळमेळ सोडू नका. नम्रता ठेवा. फसू नका. मोह जास्त ठेवू नका. महत्त्वाची कामे या सप्ताहात करून घ्या. कर्जाचे काम होईल. प्रयत्न जास्त करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा उत्साह वाढेल. प्रवासात घाई करू नका. दुखापत टाळा. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा डाव रचतील. त्याला शह देता येईल. कला, क्रीडा, साहित्यात मोठे यश मिळवता येईल. घरात तडजोडीचा प्रयत्न करा. राग वाढवू नका.