21 ते 27-11-2021
मेष
टॅरोचे पत्तेः 1. किंग ऑफ कप्स 2. 6 ऑफ कप्स, 3. द कॅरीओट, 4. 3 ऑफ पेंटाकल्स 5. 2 ऑफ स्वोर्ड्स
घरातल्या कर्त्या माणसाला हा आठवडा महत्त्वाचा आहे. तुम्हाला हे माहीत असायला हवे की, घरातील वडीलधारे यांचा पाठिंबा तुम्हाला हवा आहे. तब्येत खराब असेल तर त्याचे कारण भूतकाळात असू शकते. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. तुम्ही प्रेम करता अशी व्यक्ती तुम्ही खूप प्रगती पण खूप कमी वेळात करावी, असा दबाव आणेल. पण तुम्ही तुमची गती आणि क्षमता लक्षात घेतली पाहिजे. जितका संवाद साधाल तितका फायदा होईल. पैशाच्या बाबतीत आता कुठे परिस्थिती सुधारत आहे. पण याचे कारण नशीब नसून तुम्ही केलेले प्रयत्न आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही आपले काम चोख कराल. पण काही बाबतीत दुसऱयांवर अवलंबून रहावे लागेल. अवाजवी अपेक्षा ठेवू नका.
वृषभ
1. नाईट ऑफ पेन्टाकल्स, 2. 6 ऑफ वाँड्स, 3. 10 ऑफ स्वोर्ड्स 4. द मून, 5. द सन
घरच्यांच्या छोटय़ातल्या छोटय़ा गरजांकडे लक्ष द्या. त्यांच्याशी बोला. घरातील व्यक्ती एखादी गोष्ट लपवत असेल तर योग्य संवाद हाच उपाय आहे. हा आठवडा पारिवारिक संबंध सुधारण्याकरता आहे हे जाणा, पुढे याचाच फायदा तुम्हाला होईल. मागच्या काही दिवसात जी तब्येतीची काळजी तुम्हाला होती ती कमी होईल. गरज आहे ती स्वतःला वेळ देण्याची. घाबरण्यासारखे तुम्हाला काही झालेले नाही हे लक्षात घ्या. पेमसंबंधांमध्ये सत्याची परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. समस्यांपासून समस्या सुटत नसतात. लक्षात घ्या की, तुम्ही कुणावरही प्रेम करण्याची किंवा आदर देण्याची सक्ती करू शकत नाही. पैशाच्या बाबतीतला मोठा निर्णय या वेळी नको. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. नोकरीसंबंधी चांगली बातमी कळेल. पण गर्व नको.
मिथुन
1.एस ऑफ कप्स, 2. 8 ऑफ वाँड्स, 3.नाईट ऑफ कप्स, 4. क्विन ऑफ कप्स, 5. द हेरमीट.
तुमचे घरचे सध्या तुमच्यामुळे थोडे काळजीत आहेत. ते तुमच्या बाजूने आहेत हे लक्षात घ्या. या आठवडय़ात तुमची काळजी ज्यांना आहे त्यांना हे कळू द्या की तुम्हीही त्यांच्यावर प्रेम करता जर तब्येतीची काही तक्रार असेल तर भ्रमात राहून किंवा गोंधळून जाऊन काही उपयोग नाही. धीर धरा. वाट पहा. लवकरच तोडगा निघेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत, नाते आणखी बळकट होईल. तुम्ही वचनबद्ध असाल तर ही गोष्ट खूप चांगली आहे. नात्यावर शिक्कामोर्तब होईल. पैशाच्या बाबतीत सकारात्मक बदल करून अंदाज घेऊन गुंतवणूक करा. तुमचे मित्र तुम्हाला मदत करू शकतात. कामाच्या बाबतीत तुमचे श्रम हे तुमच्या बॉसला कळतील हे नक्की करा. तुम्ही केलेल्या कष्टाची त्यांना जाणीव व्हावी असे तुम्हाला वाटेल.
कर्क
घरातील एखाद्या व्यक्तीसोबत असणारे मतभेद या आठवडय़ात विरत जातील. या आठवडय़ाचा उपयोग नात्यामध्ये गोडवा आणण्यासाठी करा. शेवटी आपलीच माणसं कामाला येतात हे ध्यानी ठेवा. या आठवडय़ात तब्येतीत लक्षणीय सुधारणा होईल. याचा अर्थ कुपथ्य केलेले चालते असा अजिबात नाही. उलट याचा फायदा घेऊन तब्येत आणखी कशी सुधारेल हे पहा. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अती अपेक्षा तर करत नाही ना, याचा विचार करा. या आठवडय़ात तुम्हाला व्यावहारिक होण्याची गरज जास्त आहे. तुमच्यामुळे तुमच्या जोडीदाराचा आनंद नष्ट होईल, असे वागू नका. पैशांच्या बाबतीत सावध राहण्याचा संकेत टॅरो देत आहे. हलगर्जीपणामुळे नुकसानीची शक्मयता आहे. कामाच्या बाबतीतसुद्धा सावधान राहण्याची गरज आहे. जर तुम्ही आता कामात टाळाटाळ केली तर तुमच्या जागी दुसऱया व्यक्तीला घेण्याचा निर्णय होऊ शकतो.
सिंह
1. 8 ऑफ पेंटाकल्स, 2. 9 ऑफ स्वोर्ड्स, 3. 10 ऑफ कप्स, 4. द डेव्हिल, 5. 2 ऑफ पेंटाकल्स
तुम्हाला वाटत आहे की, तुमच्या जीवनातल्या इतर गोष्टींमुळे तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होत आहे. तुम्हाला जर पारिवारिक संबंध मजबूत ठेवायचे असतील तर तुम्हाला वेळ हा दिलाच पाहिजे. कितीही व्यस्त असाल तरीही. हा आठवडा पैशाच्या बाबतीत सावध राहण्याचा आहे. तुमचे धोरण चुकत तर नाही ना हे तपासा. पैशांचे नियोजन चुकू शकते आणि तंगी जाणवू शकते. पण तुम्ही जितक्मया शांतपणे उपाय शोधाल तितके बरे राहील. रागराग करून काही होणार नाही. तब्येतीच्या बाबतीत आत्मपरीक्षणाची गरज आहे. एखाद्या सवयीचा अतिरेक तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. स्वतःच्या मनाने औषध घेऊ नका. पेमसंबंधांच्या बाबतीत आपण उगाच काळजी करत होतो हे तुम्हाला कळेल. तुम्ही ज्या अपेक्षा आपल्या जोडीदाराकडून करता त्याच अपेक्षा तुमचा जोडीदार तुमच्याकडून करतो हे तुम्हाला कळेल. कामाच्या बाबतीत झेपणार नाहीत इतकी कामे एका वेळी तुम्ही घेता आहात, त्याने ताण वाढेल. प्राधान्य देऊन काम करा.
कन्या
1. पेज ऑफ कप्स, 2. पेज ऑफ स्वोर्ड्स, 3. 7 ऑफ कप्स, 4. 6 0 कप्स, 5. द मॅजिशियन
परिवारामध्ये जे एकसुरी वातावरण झाले आहे त्यासाठी काही तरी मजा येईल असे करा. एक छोटी सहल सगळय़ांना आनंद देऊ शकते. ज्यामुळे नातेसंबंध बळकट होतील. तब्येतीच्या बाबतीत, अती ताण हे थकव्याचे मूळ कारण आहे. स्वतःला वेळ द्या आणि मुख्य म्हणजे शरीर आणि मन दोहोंना जरा उसंत घेऊ द्या. प्रेमसंबंधांच्या बाबतीत, सध्या जे तुम्ही उतावळे आणि अतीसंवेदनशील होता आहात ते टाळा. तुम्हाला योग्य जोडीदार मिळेपर्यंत धीर धरण्याची गरज आहे. पैशाच्या बाबतीत एक लक्षात घ्या की, पूर्वी ज्या संधी हातून गेल्या त्या गेल्या. आता ते आठवून त्रास करून घेण्याची गरज नाही. योग्य योजनेचा हा काळ आहे. कामाच्या ठिकाणी बऱयाच गोष्टी रुळावर येत आहेत. ही वेळ प्रमोशन किंवा नवीन नोकरीकरिता योग्य आहे. तुमच्या शैलीमुळे आणि नाविन्यपूर्ण कृतींमुळे लोक साथ देतील.
तूळ
1. 4 ऑफ वॉन्डस, 2. क्वीन ऑफ कप्स, 3. क्वीन ऑफ वॉन्डस, 4. 6 ऑफ पेंटाकल्स, 5. टेंम्पेन्स
तुम्हाला स्वतःसाठीही वेळ हवा आहे हे तुमच्या परिवाराला पटवून सांगावे लागेल. घरातील एखाद्या सदस्याच्या व्यवहारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. याकरता उत्तम मार्ग म्हणजे एकमेकांच्या स्पेसचा आदर करणे. तब्येतीचा एखादा त्रास असेल तर दुर्लक्ष केल्याने त्रास वाढू शकतो, असा टॅरो संदेश आहे. लवकरच वैश्विक शक्ति या त्रासातून सुटण्याचा मार्ग दाखवेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला अजून मोकळे होण्याची गरज आहे. काहीतरी नवीन आणि रोमांचकारी करण्याचे तुमचे मन करेल. जर कमिटेड असाल तर जोडीदाराबरोबर काही नवीन गोष्टी करा. नाविन्यामुळे रस वाढतो. आर्थिक बाबतीत लक्षात येईल की, काही योजनांचे फळ मिळण्याकरता वेळ लागतो. टॅरो म्हणते की तुम्ही गरजूंना द्या, विश्व तुम्हाला देईल. करियरच्या बाबतीत उद्दिष्टे जरुर ठेवा पण इतकी ही मोठी नको की ती पूर्ण करण्याच्या नादात मनःशांती बिघडेल. लक्षात ठेवा की, लोकांचे तुमच्यावर लक्ष आहे आणि तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला नक्की मिळेल.
वृश्चिक
1. एस ऑफ स्वोर्ड्स, 2. …, 3. 9 ऑफ वॉन्डस्, 4. द डेविल, 5. द लव्हर्स
हा आठवडा नवीन परिवारिक जबाबदाऱयांचा आहे. जर आपल्या कुटुंबापासून काही लपवत असाल तर खरं सांगण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्यांची साथ आणखी जास्त मिळेल आणि याहून अधिक म्हणजे एकमेकांवरचा विश्वास दृढ होईल. नवीन प्रेमसंबंधांकरता हा आठवडा रास्त नाही. स्वतःमध्ये नवीन गुण, नवे कौशल्य विकसित करा. पुढे याचा फायदा नक्की होईल. कमिटेड असाल तर लक्षात घ्या की, तुमच्या जोडीदारालाही स्वतःकरता वेळ हवा असतो. काहीवेळा थोडासा दुरावासुद्धा जवळीक दृढ होण्यासाठी गरजेचा असतो. आर्थिक बाबतीत असमाधानी असण्याने प्रश्न सुटणारे नाहीत. त्याकरता नियोजन करावे लागेल. काही प्रयत्न निष्फळसुद्धा होतील. पण मित्रांची मदत घेण्यास मागे राहू नका. कामामध्ये किंवा करियरमध्ये भावनिक निर्णय घातक ठरू शकतात. तुमच्या समोर दोन पर्याय असतील. योग्य तो निर्णय बुद्धीने घ्या. भावनेने नको.
धनु
1. 4 ऑफ स्वोर्ड्स, 2 पेज ऑफ पेंटाकल्स, 3. क्वीन ऑफ पेंटाकल्स, 4. स्ट्रेंग्थ, 5. द मून
कुटुंबातील कटकटींना, बेसुरेपणाला कंटाळला आहात. तुम्हाला सध्या या सगळय़ापासून थोडे लांब राहण्याची गरज आहे. आणि स्वतःच्या समाधानासाठी वेळ काढणे हा तुमचा हक्कच आहे. कुटुंबाला हे सांगा. जर ते तुमच्यावर प्रेम करत असतील तर त्यांना हे समजेल. स्वास्थ्याविषयी हे समजून घ्या. मानसिक स्वास्थ्य हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या आठवडय़ात मानसिक कोंडमाऱयाला बाहेर काढा. तब्येत बिघडण्याचे कारण भावनिक असू शकते हा टॅरोचा संदेश आहे. या आठवडय़ात प्रेमीजनांना नशीब साथ देईल. पण उतावळे होऊ नका. अती प्रयत्नाने नुकसान होऊ शकते. जे लोक कमिटेड आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराला ही जाणीव करून दिली पाहिजे की, शंकांना प्रेमात स्थान नसते. आर्थिकदृष्टय़ा या आठवडय़ात तुम्ही समाधानी असाल. पण बचत करायला विसरू नका. या आठवडय़ात तुम्हाला मौजमजा कराविशी वाटेल. पण ही ती वेळ नाही. कामधंद्याच्या बाबतीत जी गोंधळाची स्थिती आहे ती आपोआप निवळेल. धीर धरा.
मकर
1. एस ऑफ कप्स, 2. 5 ऑफ वॉन्डस, 3. 4 ऑफ कप्स, 4. किंग ऑफ कप्स, 5. द डेव्हिल
या आठवडय़ात कुटुंबीयांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. कुटुंबातील व्यक्तीमुळे अनेक समस्या सुटतील. खेळीमेळीच्या वातावरणाला तडा जाईल, असे काही होऊ देऊ नका. एखादी छोटी उपलब्धीही साजरी कराल. अती कामामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. तब्येतीच्या काही तक्रारींमुळे कंटाळून गेला असाल तर धीर धरा. वेळ लागेल. पण समाधान नक्की होईल. पेमसंबंधाच्याबाबतीत, तुमच्या जोडीदाराकडून असणाऱया अवास्तव अपेक्षा दुःखाचे कारण होऊ शकतात. हळवेपणाला व्यावहारिकतेची साथही गरजेची आहे. आर्थिक बाबतीत गोष्टींना ग्राहय़ धरून चालणार नाही. धोका असणाऱया आर्थिक गुंतवणुकी या आठवडय़ात नुकसानीच्या ठरू शकतात. कोणी विश्वासू व्यक्ती आर्थिक मदत मागते तर जरुर करा. करियर आणि कामधंद्याच्या बाबतीत तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही अडकला आहात. पण नीट पाहिले तर तुम्हाला कळेल की प्रसंग इतका वाईट नाही आहे.
कुंभ
1. किंग ऑफ वॉन्डस, 2. नाईट ऑफ कप्स, 3. पेज ऑफ वॉन्डस, 4. क्विन ऑफ स्वोर्ड्स, 5. द हँग्ड मॅन
तुम्हाला जाणवेल की या आठवडय़ात कुटुंबीयांकडून नेहमीपेक्षा जास्त आधार आणि सहकार्य मिळत आहे. मुख्यतः कुटुंबातील पुरुष व्यक्तींमुळे तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत होईल. याची जाणीव मात्र ठेवली पाहिजे. या आठवडय़ात स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. जर मागे काही त्रास होत होता तो बऱयाच प्रमाणात कमी होईल. मानसिक आणि शारीरिक स्वस्थतेसाठी एक ध्येय निश्चित करा. फायदा होईल. तब्येतीविषयी शुभसूचना मिळेल. प्रेमीजनांना या आठवडय़ात निर्णय घ्यायचा आहे की हे नाते चालू ठेवायचे आहे की संपवायचे आहे. प्रश्नाला उत्तराला आणि परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक बाबतीत इतरांचा सल्ला मोलाचा ठरेल. आवक आता जरी साधारण वाटली तरी नंतर फायदा होईल. नोकरीपेशा असलेल्यांनी बदलीबद्दल विचार करण्याला हरकत नाही.
मीन
1. 9 ऑफ वॉन्डस, 2. द हँग्ड मॅन, 3. द हाय प्रिस्टेस, 4. द स्टार, 5. द टॉवर
कुटुंबात कलहाचे वातावरण आहे. स्फोटक आहे. वाद विकोपाला जाऊ नयेत याची काळजी घेतलीच पाहिजे. काहीवेळा शांत बसणेच हिताचे असते. वेळ जाऊ द्या. सगळे ठीक होईल. तब्येतीकडे नव्या नजरेने पहाल. या बाबतीत जितकी माहिती मिळवता येईल तितकी मिळवा. नवी नजर मिळेल. प्रेमाच्या बाबतीत जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्याकरता योग्य नाही तर रस्ता बदलण्यातच शहाणपण आहे. या आठवडय़ात लोकांच्या फसव्या प्रेमात न पडता नात्यांना गंभीरपणे घेण्याचे संकेत आहेत. आर्थिकदृष्टय़ा हा आठवडा उत्तम आहे. जे हवे ते मिळेल. जर धोका पत्करायची तयारी असेल तर गुंतवणूक फळ देईल. नोकरी, व्यवसायाच्याबाबतीत सध्या तुमच्या मनात निराशा येत आहे. तुम्ही समाधानी नाही आहात. तुम्हाला काय आवडते आणि ते कसे घडेल याचा विचार करून निर्णय घेण्याची ही वेळ आहे.