दि.02.01.2022
मेष
नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने कराल. आठवडय़ाच्या सुरुवातीला सुस्ती येण्याची शक्मयता आहे. परिवारिक जबाबदाऱया वाढतील. भावनेच्या भरात कोणालाही वचन देऊ नका. नातेसंबंधांमध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न कराल. पैशाच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील. कामाच्या ठिकाणी बदल संभवतो. कोणतेही काम करण्यापूर्वी सिनीयर्सचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
वृषभ
नवीन वर्ष, नवा संकल्प आणि जोश यांचा मेळ या आठवडय़ात असणार आहे. या आठवडय़ात प्रत्येक काम उत्साहाने कराल. कुटुंबाकरता वेळ काढाल. कुटुंबातील एका व्यक्तीची समस्या सोडवावी लागेल. त्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. तब्येत पूर्ण साथ देईल. पैशांचे नियोजन करावे लागणार आहे. प्रेमीजनांना आठवडा मजेत जाणार आहे. कामाच्या ठिकाणी एकाग्रता वाढवण्याची गरज आहे.
मिथुन
नवीन वर्षांच्या स्वागताबरोबरच आर्थिकदृष्टय़ा आनंदाची बातमी घेऊन येणारा हा सप्ताह आहे. जे नोकरीकरता प्रयत्न करत आहेत. त्यांना नोकरी मिळेल. व्यवसाय करणाऱयांना नवीन प्रकल्प मिळेल. वेळेचे नियोजन मात्र महत्त्वाचे ठरेल. तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रेमप्रसंगात दुसऱयावर शंका घेणे धोक्मयाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी डोके शांत ठेवा.
कर्क
वर्षाची सुरुवात दृढनिश्चयाने करा. कामाच्या व्यापाचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. परिवारातल्या छोटय़ा मोठय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष करावे लागेल. योग्य आहार घेतल्याने तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षांमुळे तणाव येऊ शकतो. पैशाच्या बाबतीत कंजुषपणा सोडा. कामाच्या ठिकाणी एखाद्या स्त्रीमुळे मनस्ताप होईल. मन शांत ठेवा.
सिंह
नवीन वर्षाची सुरुवात अपेक्षापूर्तीत होईल. निश्चयी स्वभावामुळे कामे पूर्ण कराल. घरात लहानांचा हट्ट पुरवावा लागेल. एखादी परकी व्यक्ती घरातील खासगी गोष्टींमध्ये नाक खुपसू शकते आणि त्यामुळे घरातील चांगले वातावरण बिघडू शकते. आर्थिक आवक चांगली राहील. गुंतवणुकीबद्दल विचार कराल. कामाच्या ठिकाणी दुसऱयांना मदत करताना दमछाक होईल.
कन्या
नवीन वर्षाची सुरुवात नव्या भेटीगाठींनी होईल. ज्याचा येणाऱया काळात तुम्हाला फायदा होणार आहे. घरातल्या हसऱया वातावरणाला तडा जाईल, असे काहीही बोलण्यापासून स्वतःला थांबवा. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी उदभवतील. पण काळजी नसावी. स्वतःला वेळ द्या. आवडत्या छंदाकडे लक्ष द्या. या आठवडय़ात उसनवारी करू नका. कामाच्या ठिकाणी फक्त कामाकडे लक्ष द्या.
तुळ
नव्या आशेने आणि नव्या जोमाने नवीन वर्षाचे स्वागत कराल. या आठवडय़ात योजनापूर्वक काम केल्याचे फायदे होतील. अती ताणामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. वृद्ध व्यक्तीमुळे घरातील वातावरण काहीसे तणावपूर्ण असणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत प्रत्येक पाऊल जपून टाकणे गरजेचे आहे. आर्थिक पक्ष मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी गोंधळून गेल्याने संधी वाया जाईल.
वृश्चिक
वर्षाच्या सुरुवातीलाच जुन्या ओळखीमुळे नवीन संधी मिळतील. थोडा धोका पत्करून संधींचे सोने करा. अपचन किंवा पोट जड होणे या सारखी समस्या सतावू शकते. खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे गरजेचे आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. पाहुणे येतील. प्रेमीजनांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत असुरक्षित वाटेल. कामाच्या ठिकाणी चित्त एकाग्र ठेवा.
धनु
नवीन वर्षाची सुरुवात सुवार्तेने होईल. एखाद्या समारंभात सहभागी होण्याकरता प्रवास कराल. सरकार पक्षाकडून सहाय्य मिळेल. घरातील सगळय़ा व्यक्ती व्यस्त असल्याने एकटेपणा जाणवेल. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. आर्थिक दृष्टीने हा आठवडा सर्वसामान्य असेल. व्यावसायिकांनी मोठा लोभ टाळावा. कामाच्या ठिकाणी तुमच्या चिकित्सक स्वभावाचा इतरांना राग येईल.
मकर
निराशेतून आशेकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा आठवडा असेल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. काही लोकांचे खरे रुप समोर येईल. परिवारात गैरसमजांना थारा देऊ नका. तब्येत ठीक राहील. प्रिय व्यक्तीच्या निरर्थक हट्टामुळे संताप येईल. कामानिमित्त पैशांची जुळवणूक करताना परतफेडीचा विचार सुद्धा करावा लागेल. व्यावसायिकांना आठवडा आनंदाचा.
कुंभ
नवीन वर्षाचा पहिला आठवडा संधींचे पुष्पगुच्छ घेऊन येत आहे. निराशा झटकून कामाला लागा. लांबचे संबंधीत तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील. त्यात त्यांचा स्वार्थ आहे हे ओळखून दूर रहा. प्रेमीजनांनी हे जाणलं पाहिजे की, प्रेमासोबत आदर असणेही आवश्यक आहे. नोकरदारांच्या कष्टाचे चीज होईल.
मीन
वर्षाच्या सुरुवातीला प्रवासामुळे आणि विरंगुळय़ामुळे मन आनंदी असेल. पण याच दरम्यान चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तब्येत बिघडू शकते. एखादी शारीरिक चाचणी करून घ्या. परिवारिक जबाबदारी वाढेल. कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. पैशांच्या बाबतीत बेफिकीर वृत्ती धोकादायक ठरेल. कामाच्या ठिकाणी कुणावरही टीका करू नका.
टॅरो उपाय-साहस, जोश आणि हिम्मत वाढवण्याकरता ‘रेड जास्फर’ क्रिस्टल वापरावा.