राशींचा देश टॅरेचा संदेश
9.1.2022 ते 15.1.2022
मेष
अनपेक्षित यात्रा करावी लागू शकते. शुभकार्याची तयारी सुरू कराल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला आहे. पारिवारिक सुख उत्तम. बरेच दिवस अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील. लवमेट्सनी कठोर शब्दांचा वापर टाळावा. नोकरदारांना हा आठवडा काहीसा तणावपूर्ण असेल. आपण बरे आणि आपले काम बरे असे वर्तन ठेवा.
वृषभ
आरोग्य चांगले रहावे म्हणून विशेष प्रयत्न कराल. सरकारी कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती जाणून बुजून त्रास देऊ शकते. वैवाहिक जोडीदाराकडून चांगली बातमी कळेल. एखाद्या व्यक्तीला प्रपोज करण्याकरता हा आठवडा योग्य आहे. परिवारातील सदस्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढणार आहेत. पैशाची आवक सर्वसामान्य राहील.
मिथुन
नशीब मेहरबान आहे. संधींचा पूर्ण फायदा घ्या. या आठवडय़ात आत्मविश्वासात कमी पडू देऊ नका. ज्या व्यक्तीचे भले केले तीच विश्वासघात करू शकते. सावध रहा. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. या आठवडय़ात कर्ज काढणे आणि कर्ज देणे दोन्हीही टाळा. लवमेट्सनी एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा.
कर्क
हा आठवडा रोमान्सनी सजलेला असेल. पचनासंबंधी तक्रारी होतील. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुना मित्र भेटेल. काही गोष्टींसंबंधी मन भावूक होईल. भावनांना व्यक्त करा. कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे चिडचिड होऊ शकते. लवमेट्सनी संयम ठेवावा. जोखीम असलेल्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू नका. कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक वातावरण राहील.
सिंह
मित्रपरिवाराबरोबर पार्टी कराल. या आठवडय़ात तुम्ही बेफिकीर असाल. तुम्हाला तुमचा वेळ तुमच्या पद्धतीने घालवावा असे वाटेल. आरोग्य चांगले राहील. वायफळ खर्च करू नका. कुटुंबाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. व्यापारी वर्गाला नव्या संधी मिळतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या बोलण्याचा त्रास होईल. क्रोध नियंत्रित ठेवा.
कन्या
या आठवडय़ात चंचल स्वभावाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. बाहेरच्या व्यक्तीमुळे कुटुंबात वादविवादाचे प्रसंग येतील. तब्येत नाजूक असणार आहे. पैशांच्याबाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाही. व्यावसायिकांच्या हातून एखादी संधी निसटू शकते, ज्याचा फायदा दुसऱयाला होईल. नोकरदारांना वरि÷ांची बोलणी खावी लागतील.
तुळ
समाधान आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ या आठवडय़ात असणार आहे. तब्येतीच्या तक्रारी कमी झाल्याने उत्साहात वाढ होईल. कामधंद्यात यश मिळेल. लवमेट्स एकमेकाला इंप्रेस करतील. भौतिक इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदी असेल. नवीन वस्तू खरेदी कराल. व्यावसायिकांना मदत मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास हा आठवडा सगळय़ा बाजूंनी उत्तम.
वृश्चिक
पाण्यामुळे संसर्गजन्य आजार होऊ शकतो. कुठलेही पेय पिताना ते शुद्ध आणि आरोग्यदायी आहे याची खात्री करूनच घ्या. मित्रांमध्ये गैरसमज होऊ शकतो. टीका करणे शक्मयतो टाळा. कामे वेळेवर पूर्ण होण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. लवमेट्सनी जुन्या गोष्टींवरून भांडणे टाळावीत. मेहनतीचा परतावा उशिरा मिळेल.
धनु
साहस आणि दृढनिश्चयाच्या जोरावर बाजी माराल. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. धाकटय़ा भावंडाविषयी जास्त संवेदनशील व्हाल. त्यांच्याविषयी काहीतरी करावे असे वाटेल. कामाच्या ठिकाणी आपल्या मनावर ठाम रहाल. लवमेट्सना आठवडा आनंदाचा. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी दुसऱयाची मदत घ्यावी लागेल.
मकर
संमिश्र आठवडा आहे. काही ठिकाणी अनपेक्षित यश तर काही ठिकाणी हातात आलेल्या संधी निसटू शकतात. परिवारातील सगळय़ांची मने सांभाळण्यात तुम्हाला तुमच्याकरता असा वेळ आहे. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा.
कुंभ
कामानिमित्त सहकाऱयांबरोबर प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल. वाहन, वास्तू संदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्याल. तब्येत ठीक राहील. परिवारातील वातावरण शांत असेल. एखाद्या क्यक्तीला समजावण्याकरता बळाचा वापर करावा लागू शकतो. लवमेट्सनी शंका घेणे टाळावे. पैशाची बाजू सर्वसामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अडचणीतून मार्ग काढाल.
मीन
नशीब मेहेरबान आहे पण कष्टाला पर्याय नाही. सहकाऱयांबरोबर अति बोलणे किंवा चर्चा करणे टाळा. परिवारातील ज्ये÷ क्यक्तीमुळे मानसिक ताण येईल. या आठवडय़ात स्वतःकरता वेळ काढावासा वाटेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल. वायफळ खर्च टाळा. लवमेट्सना आनंदाचे दिवस आहेत. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन करा.
टॅरो उपाय- निराशा, वैताग आणि नकारात्मक विचार आल्यास मुठीत खडे मीठ घेऊन 5 मिनिटे डोळे बंद करावेत. नंतर ते मीठ बेसीनमध्ये टाकून द्यावे.