रत्न-समज आणि गैरसमज -भाग 2
नमस्कार, पुन्हा सांगतो की राशीरत्न किंवा भाग्यरत्न ही जाणून बुजून पसरवण्यात आलेली नितांत खोटी संकल्पना आहे. संपूर्ण कुंडलीचे विश्लेषण करून, नवांश कुंडली, ग्रहांचे बल आणि कार्येशत्व, महादशा इ. बाबींचा पूर्ण अभ्यास करून मगच रत्न वापरावे. विवाह होत नाही म्हणून पुष्कराज वापर, मन शांत नाही म्हणून मोती वापर या खुळचट कल्पना आहेत. पुष्कराज हा अहंकार वाढवू शकतो. पोटाचे विकार देऊ शकतो, पोवळय़ामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते आणि मोत्याने नैराश्यसुद्धा येऊ शकते. आणखी एक गैरसमज असा जो जाहिरातीतून पसरवला जातो की करणीबाधा दूर करणारे रत्न वापरावे. लक्षात घ्या, असले कोणतेही रत्न नसते.
काही लोक नवग्रहांची अंगठी वापरतात, हे हास्यास्पद आहे. समजा तुमचे आयुष्य हा सिनेमा आहे. त्यात 9 पात्रे आहेत. काही हिरो आहेत तर काही खलनायक. तर तुम्ही हिरोंबरोबर खलनायकालाही आमंत्रण देणार का? नाही ना? तसेच नवग्रहाच्या अंगठीचे आहे.
काही ज्योतिषी (?) त्रिकोणाच्या स्वामींची रत्ने सुचवतात. म्हणजे 9 रत्ने एकत्र घाला! उदा. पोवळे+पाचू+पुष्कराज (मेष लग्नासाठी). त्यांचे काय जाते सांगायला? त्यांना सल्ल्याचे पैसे अधिक 3 रत्नांचे पैसे बसल्या जागी मिळतात ना? पण जातकाने ही रत्ने धावली तर अपघात आणि पैशाचा व्यय, हॉस्पिटलायझेशन होऊ शकते हे कोण सांगणार?
असो. आता कोणते रत्न वापरावे ते सांगतो. ही जी थेअरी आहे ही दक्षिण भारतात विकसित झाली. अत्यंत तर्कशुद्ध अशी ही थेअरी आहे. अनेक नावाजलेल्या ज्योतिषांनी याचा अनुभव घेतला आहे. या थेअरीमध्ये संपूर्ण कुंडलीचा सविस्तर अभ्यास करून मग रत्नांचे 3 भागात वर्गीकरण केले जाते. 1 मारक (destiny breaker), 2. सम (nuetral), 3. तारक (destiny maker) बऱयाच लोकांना हेही माहीत नसते की, प्रत्येक ग्रहाची 2 प्रकारची रत्ने असतात. पारदर्शक आणि अपारदर्शक. उदा. रवीचे माणिक हे पारदर्शक रत्न आणि रेड जास्फर हे अपारदर्शक रत्न आहे. जो ग्रह मारक आहे त्याचे अपारदर्शक रत्न वापरावे आणि जो तारक आहे त्याचे पारदर्शक रत्न वापरावे. जो ग्रह सम आहे त्याचे रत्न वापरले काय आणि न वापरले काय? काय फरक पडतो? मग पैसे का वाया घाला? मग ज्याला कुंडली कळत नाही त्याने रत्न कसे निवडावे? इथे तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे गरजेचेच आहे. याला पर्याय नाही. पण काही खडे हे आपल्या गरजेप्रमाणे आपण नक्कीच वापरू शकतो. तेही थोडय़ा पैशात! कोणते खडे ते पुढच्या लेखात सांगतो!
महाउपाय ः संकटातून सुटण्यासाठी आपल्या उंचीएवढा लाल, पिवळा व काळा दोरा नारळाला बांधून हनुमानाच्या चरणी ठेवावा.
सोपी वास्तू टीप – आग्नेय (पूर्व-दक्षिण) बाजूला स्वयंपाक घर नसेल, तर तिथे चकमकीचे दगड (ज्यातून ठिणगी येते) ठेवावेत.
मेष
तब्येतीचा एक विषय सोडला तर कित्येक बाबतीत भाग्यशाली राहाल. पैशासंबंधी काळजी मिटेल. पण दिलेला शब्द पाळा. धाडस करण्यात मन धजावणार नाही. जमिनीचे व्यवहार सध्या नको. प्रेमीजनांना आनंदाचा काळ. नोकरदारांना सुसंधी. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य, भाग्याची उत्तम साथ आहे.
उपाय- दिव्यांग गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करा. व्यवसायात प्रगती होईल.
वृषभ
तब्येतीची साथ उत्तम आहे. कुटुंबाचा सहयोग मिळणार नाही. कटू बोलणे महागात पडू शकते. प्रवास टाळा. वाहनविषयक समस्या येऊ शकते. मनोरंजनाकडे कल राहील. अतिरेक टाळा, नोकरवर्गाला लाभ. वैवाहिक जीवनात आनंदाचा काळ. मन स्थिर ठेवून वाहन चालवा. अपेक्षेइतका लाभ मिळणार नाही.
उपाय- मुंग्यांना साखर घाला. आर्थिक समस्या होणार नाही.
मिथुन
तब्येतीकडे लक्ष द्या, दुखणे अंगावर काढू नका. कुटुंबात रुसवा असेल. प्रवासात धनहानी, आईमुळे फायदा होईल. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. लव्हर्सकरता सुवर्णकाळ आहे. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरदारांवर वरि÷ खूष असतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण. व्यापारात थोडी मंदी.
उपायः मारुतीच्या उजव्या पायाचा शेंदूर पाकिटात ठेवा. आर्थिक चणचण दूर होईल.
कर्क
जेष्ठनी तब्येत सांभाळणे गरजेचे आहे. हाडांचे विकार बळावू शकतात. पैशासंबंधी काळजी वाटेल. लेखन, प्रकाशन, जाहिरात यातून फायदा, छोटय़ा प्रवासात योग आहे. जमिनीसंबंधी वाद सामोपचाराने मिटवा. प्रेमजीवनात रोमांच होईल. नोकरदारांनी सावधपणे काम करावे.
उपायः अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घाला. गोमुत्राचे सेवन करा.
सिंह
पैशाच्या बाबतीत भाग्यवान रहाल. अपेक्षा नसलेल्या ठिकाणाहून पैसे येतील. दुर्लक्ष केल्याने तब्येतीची तक्रार राहील. पराक्रमात वाढ होईल. पण घमेंड करू नका. प्रॉपर्टीची समस्या सुटेल. नोकरदार वर्गाने सांभाळून काम करावे. चुका होऊ शकतात. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येतील.
उपायः पक्ष्यांना बाजरा घाला. पेचप्रसंगातून सुटका होईल.
कन्या
उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेले असाल. जुनाट व्याधी कमी होतील. आर्थिक दृष्टीने भाग्यवान असाल. कुटुंबाचा पूर्ण सहयोग मिळेल. घराकरता नवीन वस्तू घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र निराशा येईल. नोकरीत बदल सध्या नको. वैवाहिक जीवनात ताणतणाव. भाग्य चांगले असले तरी लाभ कमी.
उपायः कुंभाराकडची ओली माती (नाही मिळाल्यास, मातीचे भांडे) शेंदूर लावून घरी ठेवा.
तुळ
शारीरिक दुखणी कमी झाल्याने उत्साहात कामे कराल. पैशांची आवक उत्तम होईल. बोलण्याचा प्रभाव पडेल. मोठय़ा व्यक्तीच्या संपर्कातून फायदा होईल. प्रवास टाळा. जमिनीचे व्यवहार फसू शकतात. जोखीम असलेली कोणतीही गुंतवणूक करू नका. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येतील.
उपायः स्वच्छताकर्मींना उडदाचे वडे आणि दक्षिणा द्या. तंदुरुस्त रहाल.
वृश्चिक
पोटाच्या तक्रारी दूर होतील. पैशाची चिंता मिटेल. प्रवास टाळा. प्रॉपर्टीसंबंधी वाटाघाटीत सहभागी होऊ नका. गैरसमजुतीतून नको ते आरोप होतील. प्रेमप्रसंगात फसवणूक. नोकरदारांवर वरि÷ांचा रोष. वैवाहिक जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. भाग्याची साथ कमी आहे. प्रयत्नांची कास धरा.
उपायः लाल गाईला गूळपोळी खाऊ घाला. संकटांना दूर करा.
धनु
मानसन्मानात वृद्धी होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात वृद्धीचे योग. परिवारात थोडा तणाव राहील. एखाद्या नातेवाईकामुळे मनस्ताप. बोलताना शब्द जपून वापरा. प्रवास टाळा. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज. नोकरदारवर्गाला पदोन्नतीचे योग आहेत.
उपायः अनाथाश्रमात अन्नदान करा, प्रगतीच्या वाटा सापडतील.
मकर
भाग्याची उत्तम साथ असली तरी काही जुन्या देण्यांमुळे आर्थिक चणचण भासू शकते. तब्येतदेखील थोडी नरम राहील. सही करताना कागदपत्रे नीट वाचा. जमिनीचे व्यवहार टाळा. शेअर मार्केटमध्ये लाभाच्या संधी आहेत. लाभाचे अवसर हातून निसटू जाऊ देऊ नका.
उपायः स्मशानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. आर्थिक सुबत्ता येईल.
कुंभ
दुखणे अंगावर काढण्यापेक्षा योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. आर्थिकबाबतीत कष्ट जास्त करण्याची गरज आहे. प्रयत्न सोडू नका. जमीन आणि वाहनासंबंधी व्यवहार यशस्वी होतील. प्रेमसंबंधात दुरावा संभवतो. वैवाहिक जीवनात ताण तणावाचे प्रसंग येतील.
उपायः गरजूला गरम कपडे द्या. शारीरिक आणि मानसिक त्रास संभवतील.
मीन
आपले काम इमानदारीने वेळेवर पूर्ण कराल. आणि त्याचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. गुप्त गोष्टींबद्दल कुणाशीही चर्चा करू नका. भाग्याची पूर्ण साथ आहे. मानसन्मान आणि लाभाचे योग आहेत.
उपायः सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घाला. अडलेली कामे होतील.