रवि. दि. 7 ते 13 जून 2020
मेष
या सप्ताहात चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात प्रगती होईल. नवे काम मिळेल. प्रयत्न वाढवा. कायदा पाळा. नोकरीत प्रभाव पडेल. घरातील वातावरण उत्साहवर्धक ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व सर्व बाजूने वाढेल. जबाबदारी वाढेल. परिचयात भर पडेल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. कला-साहित्यात तुमच्या विचारांना चालना मिळेल.
वृषभ
या सप्ताहात चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवडय़ाच्या सुरुवातीला प्रश्न निर्माण होईल. संयम ठेवा. नोकरी टिकवून ठेवा. वरि÷ांना खूष करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. लोकांच्या अडचणी सोडवण्यास मदत करा. लोकप्रियता मिळेल. घरात शुभ समाचार मिळेल. तणाव कमी होईल. कलाक्षेत्रात मन रमवता येईल.
मिथुन
या सप्ताहात चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात फसवाफसवी होऊ शकते. कुणावरही भरवसा ठेवतांना सावध रहा. नोकरीत काम वाढेल. चूक टाळण्याचा प्रयत्न करा. मोहात पडू नका. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक कार्यात उतावळेपणा नको. सहनशीलता, नम्रता ठेवा. अरेरावीने समस्या चिघळेल.
कर्क
या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. कोणतीही समस्या लवकर समाप्त करण्याचा प्रयत्न करा. सहनशीलता ठेवा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात फायदा होईल. कायदा पाळा. नोकरीत वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता, प्रति÷ा टिकवता येईल. प्रवासात घाई करू नका. घरात जीवनसाथी, मुले यांच्याकडे लक्ष पुरवा.
सिंह
या सप्ताहात चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. किरकोळ अडचणीवर मात करता येईल. नोकरीत वरि ष्ठाना खूष कराल. रागाने वागल्यास चांगल्या कामाचे नुकसान होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मान-प्रति ष्ठा वाढेल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. प्रवासात सावध रहा. घरातील वातावरण आनंदी राहील. कला, साहित्यात प्रगती करता येईल.
कन्या
या सप्ताहात चंद्र, गुरु युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. सौम्य धोरण ठेवा. नोकरी टिकवा. वरि ष्ठाच्या मतानुसार निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. जनहिताची योजना करा. तरच पुढे निभाव लागेल. भाषणाचा प्रभाव पडेल. घरातील तणाव कमी होईल. कला, लेखन यात पुढे जाल.
तुळ
चंद, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. मनोबल टिकवून ठेवता येईल. चौफेर सावध रहा. महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू, नीट सांभाळा. धंद्यात समस्या येईल. चतुराईने वागा. वाद कोणताही वाढवू नका. नोकरी टिकवा. जवळचे लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. कार्य करा. अपेक्षा ठेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्धाची चिंता वाटेल.
वृश्चिक
या सप्ताहात चंद्र, गुरु युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात बोलणी करताना रागाचा पारा वाढू देऊ नका. गोड बोला काम मिळेल. वसुली करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. मित्रांना मदत कराल. राजकीय, सामाजिक प्रति÷ा अधिक वाढेल. पदाधिकार मिळेल. थट्टा करताना शब्द नीट वापरा. संसारात सुखद समाचार मिळेल. कला, साहित्यात प्रगती करता येईल.
धनु
साडेसाती सुरू आहे. सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. चंद्र, गुरु युती होत आहे. तुमचे मनोधैर्य महत्त्वाचे ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. सैरभैर मनाला ताब्यात ठेवा. सर्व ठीक होईल. धंद्यात तडजोड करावी लागेल. सर्वच ठिकाणी तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीत मोह टाळा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. तुम्ही जनहिताची योजना पूर्ण करा. व्यसन नको.
मकर
साडेसाती सुरू आहे. प्रगतीची संधी कमी वेळासाठी असते. त्यामुळे प्रयत्नावर भर द्या. ग्रहांची साथ आहे. चंद्र, गुरु युती, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवा. गुंतवणूक करणे कठीण असले तरी नवे काम मिळवता येईल. नोकरीत वर्चस्व दाखवा. नोकरी टिकवून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकाराचा वापर योग्य प्रकारे करा. लोकांना मदत करा. कला क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ
चंद्र, बुध प्रतियुती, मंगळ, नेपच्यून युती होत आहे. राग वाढवणारे प्रसंग येतील. सहनशीलता ठेवा. योग्य वेळी उत्तर द्या. धंद्यात समाधान मानावे लागेल. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत कामाची मदत इतरांना करावी लागेल. मित्र अडवणूक करण्याची शक्मयता आहे. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्ध व्यक्तीशी प्रेमाने वागा. राजकीय, सामाजिक कार्यात, भाषणात, प्रभाव पडेल. वैर वाढवू नका.
मीन
चंद्र, गुरु युती, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळवता येईल. दूरदृष्टीकोनातून गुंतवणूक शेअर्समध्ये करता येईल. घरातील व्यक्तींना खूष कराल. वाहन जपून चालवा. राग कमी करा. नोकरीत वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. लोकांना मदत करा. त्याचाच फायदा होईल. कला, साहित्यात प्रेरणादायी घटना घडेल.