30.01.2022
मेष
या आठवडय़ात यशासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न लाभ देतील. पण त्यामुळे तुमचे समाधान होणार नाही. भौतिक सुखाच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे. काळजीपूर्वक निर्णय घेतल्याने वादाचे प्रसंग टळतील. पारिवारिक सुख चांगले आहे. पैशाची आवक विलंब दाखवते. लवमेट्सनी समजूतदारपणा दाखवावा. वैवाहिक जीवन समाधानी असेल. हीना अत्तर वापरावे.
वृषभ
सध्याच्या मिळकतीवर आणि यशावर न थांबता पुढे येणाऱया संधींसाठी स्वतःला तयार करा. मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचे युद्ध सुरू आहे. त्यात सकारात्मक विचारांना बळ द्या. घरात छोटय़ा गोष्टीवरून वाद होतील. पैसे जपून खर्च करा. प्रेमसंबंध दृढ होतील. दुर्लक्ष केल्यास आजार बळावेल. ‘मनी क्लांईंबर’ झाड घरी ठेवा.
मिथुन
नातेसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आहे. लांबून चांगली बातमी मिळेल. हा काळ आत्मचिंतनाचाही आहे. जी गोष्ट शिकता आहात त्यात यश मिळेल. तब्येतीची सामान्य तक्रार राहील. परिवारात चांगले वातावरण असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जास्त कष्ट करावे लागतील. लवमेट्स आणि विवाहितांसाठी आनंदाचा आठवडा आहे. गरजूला आर्थिक मदत करा.
कर्क
हा आठवडा सफलतेचा आणि विजयाचा आहे. दिलेले वचन पाळाल. शत्रू प्रशस्त होतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. एखादी क्यक्ती अशी भेटेल की तिच्या सल्ल्यामुळे व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. मित्रता आणि पारिवारिक नातेसंबंध दृढ होतील. लवमेट्सनी परीक्षा बघू नये. वैवाहिक संबंध प्रगाढ होतील. पांढरा हातरुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपाय-प्रार्थना करताना नेहमी वर्तमान काळात, म्हणजे होत आहे, घडत आहे अशी करावी. भविष्य काळाचे शब्द जसे ‘होऊ दे, घडू दे,’ टाळावे.
सिंह
बरेच दिवस असलेला ताण निवळायला सुरुवात झाली आहे. मन शांत राहील. स्वतःकरता वेळ काढावासा वाटेल. व्यापाराकरता आठवडा अनुकूल आहे. नोकरदारांनी बॉसशी बोलताना सांभाळून शब्द वापरावे. लवमेट्नी संबंध ताणले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार संभवतात. खिशात उगवत्या सूर्याचा फोटो ठेवावा.
कन्या
आंतरिक बदल करण्याची वेळ आहे. या आठवडय़ात बऱयाच अशा गोष्टींचा उलगडा होईल (चांगल्या आणि वाईटही) की ज्याच्यामुळे जीवनशैली बदलाविशी वाटेल. कामाच्या ठिकाणी प्रसंगावर मात कराल. पैशांची आवक सहज असेल. लवमेट्सनी नात्यातला उथळपणा सोडून नाते दृढ करण्याकडे लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात संतुष्टी. हिरव्या शाईने 6 आकडा गल्ल्यावर काढा.
तुळ
परिस्थिती कशीही असली तरी तुमचा आत्मविश्वास आणि आशावादी स्वभाव तुम्हाला तारून नेतो. या आठवडय़ात बऱयाच वेळा तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल. लोक तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. आपल्या विचारांवर ठाम रहा. व्यापार, धंद्यात यश आहे. वैवाहिक जीवन समाधानी, लवमेट्समध्ये वादावादीचे प्रसंग येतील. जेवणातील थोडा भाग भटक्मया जनावरांना घाला.
वृश्चिक
ज्या ठिकाणी पूर्ण विश्वास टाकला त्याच ठिकाणी धोका मिळाला अशी परिस्थिती आहे. हक्काने आपले काम एखाद्या व्यक्तीला सांगावे आणि त्या क्यक्तीनेच दगा द्यावा असा प्रसंग येईल. बदलांना सकारात्मक दृष्टीने पहा. पोटाचे आणि स्नायूंचे विकार संभवतात. वैवाहिक जोडीदाराची मात्र पूर्ण साथ मिळेल. लवमेट्सनी धाडस टाळावे. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी दिवा लावावा.
धनु
तुमच्या निरीक्षणामुळे मोठी चूक होता होता टळेल. या आठवडय़ात तुम्ही नवीन गोष्टींच्या शोधात असाल. असे वाटेल की काहीतरी कमी आहे किंवा चुकत आहे आणि ते सुधारायला हवे. नातेसंबंधात तुम्ही स्पष्ट बोलल्यामुळे कटुता येऊ शकते. कंबरेचे, मणक्मयांचे दुखणे संभवते. पैशाची आवक ठीकठाक आहे. वैवाहिक जीवनात कुरबुरी. वृद्ध क्यक्तीला दुधाचे दान द्या.
मकर
आठवडय़ामध्ये सुवार्ता येईल. शिकलेल्या गोष्टींचा उपयोग होईल. संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून मदत मिळेल. अर्जाचे उत्तर येईल. कफ प्रवृत्तीच्या लोकांनी सावध रहावे. तब्येत बिघडू शकते. या आठवडय़ात कोणालाही उधारी देऊ नये. लवमेट्सना आठवडा चांगला आहे. संयम बाळगा. वैवाहिक जीवन सुखमय असेल. घरातील मागच्या बाजूला काळी वस्तू ठेवावी.
कुंभ
स्वतःची प्रगती साधण्याकरता आधी स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. या आठवडय़ात थोडा एकटेपणा जाणवण्याची शक्मयता आहे. सांसारिक गोष्टींमुळे मन थोडे उदास राहील. परिवारापासून दूर राहण्याची इच्छा होणे शक्मय आहे. व्यापार धंद्यात संयम ठेवून योजना आखा. तब्येतीची तक्रार कमी होईल. लवमेट्सकरता वेळ अनुकूल नाही. शनिवारी तिजोरीत पिंपळाचे पान ठेवा.
मीन
वादविवाद किंवा अप्रिय घटना या आठवडय़ात घडू शकतात. परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्याचा तुमच्या मनावर परिणाम होईल. या आठवडय़ात शक्मयतो अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. तब्येतीवर ताण येईल, असे काही करू नका. पैशाची आवक चांगली आहे. लवमेट्सनी आणि विवाहितांनी एकमेकाला स्पेस देण्याची गरज आहे. औदुंबराचे पान जवळ ठेवा.