रवि. 8 मार्च ते 14 मार्च 2020
मेष
चंद्र, बुध प्रतियुती, मीन राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळवा. मागील येणे वसूल होईल. ओळखीतून कठीण कामे करून घ्या. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. धुलीवंदनाच्या दिवशी व्यसनाने वादंग निर्माण होईल. सावध रहा. घरातील प्रश्न सोडवता येतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचे काम लवकर करून घ्या. कला, क्रीडा स्पर्धेत चमकाल.
वृषभ
मीन राशीत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल युती होत आहे. घरातील लोकांना गृहीत धरू नका. अनाठायी खर्च होईल. व्यसनामुळे फसगत होईल. धंद्यात काम मिळवता येईल. नवीन ओळख झालेल्या माणसावर फारसा विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांचा विचार ऐकून निर्णय घ्या. विरोधक तुम्हाला गोड बोलून गोत्यात आणतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासात सावध रहा.
मिथुन
चंद्र, बुध प्रतियुती, मीन राशीत सूर्यप्रवेश होत आहे. धंद्यात काम वाढेल. वसुली करता येईल. ओळखी वाढतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. जोमाने कार्य करा. स्थान स्थिर करा. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात सावध रहा. कायद्याचे योग्य पालन करा. कला, क्रीडा, साहित्यात उत्साहवर्धक घटना घडेल. कोर्टकेस जिंकाल.
कर्क
मीन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात कशा प्रकारे सुधारणा करता येईल, याचा नीटपणे शोध घ्या. बरीच उत्तरे सप्ताहाच्या शेवटी मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. मित्र मदत करतील. संसारात मनावर दडपण राहील. राजकीय, सामाजिक कार्याला पुढे नेण्यासाठी स्वत: प्रयत्न करा. गुप्त कारवाया रोखता येतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.
सिंह
मीन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मनाप्रमाणे प्रगती होईल. मोठे काम मिळवण्यात यश मिळेल. परिचयातून काम मिळवा. कठीण काम करून घ्या. नोकरीत किचकट प्रश्न रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्याला महत्त्व प्राप्त होईल. चर्चा, वाटाघाटी करून समस्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील.
कन्या
मीन राशीत सूर्य प्रवेश, शुक्र, हर्षल युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला शारीरिक मानसिक दडपण येईल. धावपळ होईल. व्यसनात राहू नका. कायद्याचे पालन करा. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. धंद्यात तडजोड करावी लागेल. नोकरीत वाकडय़ा वाटेने जाऊ नका. मोह टाळावा लागे. राजकीय, सामाजिक कार्यात डावपेच सावधपणे टाळा. बदनामीची शक्मयता आहे. कला,क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. पण वाहवत जाऊ नका.
तुळ
चंद्र, गुरु त्रिकोण योग, मीन राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. धुलीवंदनाच्या दिवशी कोणताही अतिरेक त्रासदायक ठरेल. वादाच्या भोवऱयात अडकाल. धंद्यात वाढ होईल. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. नोकरीत प्रभाव राहील. महत्त्वाचे काम पूर्ण करा. राजकीय, सामाजिक कार्यात किचकट प्रश्न प्रथम सोडवा. सर्वांचे मत विचारात घ्या. स्पर्धेत प्रगती कराल. घरातील कामे करून घ्या.
वृश्चिक
शुक्र, हर्षल युती, मीन राशीत सूर्यप्रवेश होत आहे. अचानक खर्च वाढेल. मैत्रीत वाहवत जाऊ नका. गैरफायदा घेतला जाईल. घरातील माणसांना कमी लेखू नका. धंद्यात कष्ट घ्या. कोणताही वाद वाढवू नका. नोकरीत किरकोळ समस्या येईल. राजकीय, सामाजिक कार्यात जवळच्या व्यक्ती फितूर होतील. गुपित उघड होईल. स्पर्धेत पुढे जाता येईल.
धनु
मीन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. डोळय़ांची काळजी घ्या. खर्च वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव राहील. सप्ताहाच्या शेवटी जबाबदारी वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. जमिनीसंबंधी वाद नकोसा वाटेल. घराचा प्रश्न सोडवा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख उपयुक्त ठरेल.
मकर
मीन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. होळीच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. थट्टा मस्करीला वेगळे वळण लागेल. सावध रहा. पोलीस केस होऊ शकते. धंद्यात वाढ होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनेनुसार वेगाने कामे करा. प्रकृती सुधारेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कामात व्यस्त रहा.
कुंभ
मीन राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. तुमच्या मालाला चांगली किंमत मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. व्यसनाने नुकसान होईल. नोकरीत वरि÷ांना मदत कराल. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. अधिक वेगाने कामे पूर्ण करा. वादग्रस्त बोलणे टाळा. कला, क्रीडा क्षेत्रात खंबीरपणे नेतृत्व कराल.
मीन
तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल युती होत आहे. धंद्यातील कामे संयमाने, प्रेमाने करून घेता येतील. वसूली करा. होळीच्या दिवशी कायद्याचे पालन करा. कोणताही अतिरेक, उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात जुन्या चुका पुन्हा होऊ देऊ नका. प्रगतीची संधी मिळेल. जनहित करून दाखवा.