दिनांक 27 मार्च -2 एप्रिल 2022
मेष-
आठवडय़ाच्या सुरुवातीला एखाद्या कामाचा ताण येऊ शकतो. कुटुंबीयांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. आठवडय़ाच्या मध्याला एखाद्या घटनेमुळे मन उदास होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱयांची मदत घ्याल. पैशाच्या बाबतीत समाधानी असाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
आंब्याच्या पानावर स्वस्तिक काढून जवळ ठेवावे.
वृषभ-
दुसऱयांच्या मुळे अडलेली कामे हळूहळू पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी कोणावरही विसंबून राहणे महागात पडू शकते. परिवारातील वातावरण हसते-खेळते ठेवण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबीयांसोबत छोटी सहल ठरवू शकता. खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे आर्थिक तंगी वाटू शकते. लव मेट्सनी जोडीदाराला परफ्यूम भेट द्यावे. निळी फुले सांडपाण्यात सोडावी.
मिथुन-
गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तुम्हाला चारही बाजूंनी अडकल्यासारखे वाटू शकते. पण खात्रीsने सांगता येईल की यातून मार्ग निघेल. अतिआत्मविश्वास किंवा उतावळेपणामुळे नुकसान होऊ शकते. व्याजावर पैसे घेऊ किंवा देऊ नका. परिवारात लहान-मोठे भांडण होऊ शकते. तब्येतीची योग्य ती काळजी घ्या. कुत्र्याला बिस्किट घालावे.
कर्क-
येणाऱया काही दिवसात बऱयाच गोष्टींना वेगळे वळण लागण्याची शक्मयता आहे. परिवर्तन दाखवणारा हा आठवडा असेल आणि हे परिवर्तन चांगल्यासाठी असेल. काही गोष्टी किंवा व्यक्ती किंवा सवयी यांच्यापासून लांब राहणेच शहाणपणाचे ठरेल. चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्या. काही व्यवहार होता होता राहू शकतात. जोडीदाराची मदत घ्यावी लागेल.
पिंपळाचे पान जवळ ठेवावे.
टॅरो उपाय
एखादी समस्या वारंवार त्रास देत असेल तर ती समस्या कागदावर लिहून त्यावर ।। (pause) हे चिन्ह काढून त्यासोबत अकरा रुपये ठेवून मंदिराच्या किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या दानपेटीत टाकावे.
सिंह-
तुमच्या करारी बाण्याचा लोकांवर धाक असतो. पण बोलण्यात उर्मटपणा येऊ नये याची काळजी घ्या. तब्येतीच्याबाबतीत काळजी करण्यासारखे काही नसेल. या आठवडय़ात तुमच्या स्वभावात रोमॅण्टिकपणा येईल. एखादी व्यक्ती आयुष्यात येऊ शकते ज्यामुळे समृद्धी येईल. पैशांच्याबाबतीत समाधानी असाल. वैवाहिक जोडीदाराचे मन सांभाळावे. बांधकाम मजुरांना दूध वाटा.
कन्या-
सर्वसाधारण परिस्थिती चांगली आहे. परिवारातील आणि जवळच्या व्यक्तींबरोबर असलेले संबंधही ठीक आहेत. पण तुम्ही स्वतःच्या नादात इतरांकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्या. व्यवसायात किंवा कामात गुंतल्यामुळे घरच्यांकडे दुर्लक्ष होईल. या गोष्टीमुळे वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो. आर्थिक आवक चांगली असेल. सफाई कामगारांना सन्मानपूर्वक खाण्यापिण्याच्या वस्तू भेट द्या.
तूळ-
या आठवडय़ामध्ये एखादा महत्त्वाचा संदेश मिळू शकतो. नोकरीच्या संदर्भामध्ये एखादी बातमी कळू शकते. एखाद्या मंगलकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावणे येऊ शकते. या आठवडय़ात तुमचा उत्साह वाढणार आहे. निरीक्षण आणि अभ्यासू वृत्तीमुळे फायदा होईल. पैशांच्याबाबतीत तुमचा गैरफायदा उचलू देऊ नका. नात्यांमध्ये मधुरता येईल. धार्मिक स्थळी दूध दान करा.
वृश्चिक-
जुन्या मित्राची पुनर्भेट होईल. या आठवडय़ात तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. वयस्क व्यक्तीच्या आशीर्वादामुळे फायदा होईल. जुन्या आठवणीमध्ये रमाल. तब्येतीचा पाया मजबूत होत आहे. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. नात्यांमध्ये समंजसपणा दाखवावा लागेल. प्रेमीजनांना प्रतिकूल काळ आहे.
चांदीच्या भांडय़ातून पाणी प्या.
धनु-
बऱयाच वेळेला परिस्थितीमुळे किंवा काही कारणामुळे आपण आपला आतला आवाज दडपून टाकतो आणि मग मनाची एक विलक्षण चलबिचल होते. टॅरोचा संदेश असा आहे की आपल्या आतल्या आवाजाची दखल घ्या. तुमचे अंतर्मन जे सांगेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होऊ शकतो. आध्यात्मिक व्यक्तीची मदत मिळेल. एखाद्या स्त्रीला सौभाग्य अलंकार भेट द्या.
मकर-
कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. व्यवसायामध्ये नावलौकिक वाढेल. जवळच्या मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गप्पा माराल. वारसा हक्कासाठी प्रयत्न करत असाल तर यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्य तुमच्या मनाप्रमाणे वागावे असा हट्ट करू नका. पैशांच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल. मुंग्यांना साखर घाला.
कुंभ-
तुमचा खरा हितचिंतक कोण आणि तोंडावर स्तुती किंवा सहानुभूती दाखवणारे कोण याचा वस्तुनि÷ विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची घिसाडघाई नुकसानदायक ठरू शकते. या आठवडय़ात प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. कोणताही व्यवहार करताना सावध रहा. परिवारातील सदस्यांची मदत घ्यावी लागेल. गरजूंना औषधे दान करा.
मीन-
येणारा आठवडा सकारात्मक असेल. कामांना गती मिळेल. कष्टाचे प्रमाण वाढणार आहे. काही गोष्टींमध्ये बदल घडू शकतो. तुम्ही बांधलेले आडाखे बरोबर निघतील. आजूबाजूच्या व्यक्तींकडून मदत मिळेल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. दैव अनुकूल आहे म्हणून गाफिल राहू नका. ध्येयाकडे जाण्यासाठी नियोजन आणि प्रयत्नांची गरज आहे. लाजाळूची पाने जवळ ठेवावी.
एखादी समस्या वारंवार त्रास देत असेल तर ती समस्या कागदावर लिहून त्यावर ।। (pause) हे चिन्ह काढून त्यासोबत अकरा रुपये ठेवून मंदिराच्या किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या दानपेटीत टाकावे.