दिनांक 10 ते 16 एप्रिल 2022 पर्यंत
मेष
या आठवडय़ामध्ये कुटुंबातील किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. अशावेळी परिस्थितीचा फायदा समोरचा माणूस उचलणार नाही याची काळजी घ्यावी. नकारात्मक भावनांचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये समोरची व्यक्ती दबाव आणू शकते. कष्टाचे चीज होईल. वाटसरूंकरता पाण्याची सोय करा.
वृषभ
एखादी चांगली बातमी कळेल. महत्त्वाकांक्षेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा आलेख चढता असेल. कोणतेही यश संपादन करताना इतरांची मदत घ्यावी लागेल. तब्येत थोडी नरम-गरम असेल. परिवारातील वातावरण चांगले असेल. शत्रु मानसिक धैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतील .धीर सोडू नये. वृद्धांना आर्थिक मदत करावी
मिथुन
बेधडक बेपर्वाईने वागण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणती व्यक्ती कोणत्या क्षणी कशी वागेल हे सांगता येणार नाही. या आठवडय़ात क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त बोलण्याने नुकसान होऊ शकते. दुसऱयांचा अति विचार केल्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकते. पैशांच्या बाबतीत जपून निर्णय घ्या. 3 लवंगा जवळ ठेवाव्यात.
कर्क
या आठवडय़ामध्ये तुमचे मन काय मिळाले यापेक्षा काय गमावले याकडे जास्त लागेल. हातात काय आहे आणि काय करू शकतो यापेक्षा गेलेल्याचे दुःख तुम्हाला अधिक सतावू शकते. वैवाहिक जीवनात काहीसा कडवटपणा येऊ शकतो. आर्थिक लाभ जरी झाले तरी तुमचे मन काहीसे उदास राहील. काळा हकीक जवळ ठेवा
सिंह
समजा एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल किंवा एखादे उत्तर अपेक्षित असेल तर तुम्हाला फार काळ वाट बघावी लागणार नाही. लवकरच काम पूर्ण होईल. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून लवकरच होकार मिळवू शकाल. लहान मोठे यश पदरी पडेल. एकूणच सकारात्मक बदल दाखवणारा आठवडा आहे. जलाशयाजवळची माती घरी ठेवावी.
कन्या
कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट सुरू होऊ शकतो. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील. या संधी साधण्याकरता किंवा ध्येय पूर्ण करण्याकरता व्यवहारकुशलता आणि कूटनीती वापरावी लागेल. काही व्यक्ती धोका देऊ शकतात. याकरता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा. परिवारातील एखाद्या सदस्यावर नाराजी होऊ शकते. काचेची गोटी जवळ ठेवावी.
तूळ
तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती गुंतलेल्या आहेत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात उज्ज्वल यश मिळवण्याकरता काही काळ वाट बघावीच लागते. स्वतःतील आणि मित्रांमधील कौशल्याचा योग्य वापर करावा. गाफिल राहू नये. उत्साह कमी होऊ देऊ नये. पक्ष्यांकरता पाण्याची सोय करावाr
वृश्चिक
या आठवडय़ामध्ये कामाच्याबाबतीत बऱयाच अडचणी येऊ शकतात पण तुमच्या बुद्धिमत्तेने आणि आत्मविश्वासाने तुम्ही या अडचणींवर मात कराल. एखादा सौदा होता होता राहू शकतो. पण याकरता मन उदास करून घेण्याची गरज नाही. यापेक्षाही चांगला व्यवहार पुढे होऊ शकतो. योग्य आर्थिक नियोजन करावे. परिवारातील सदस्यांवर खर्च होईल. मजुरांना थंड पेय दान करा.
धनु
कामाच्या ठिकाणच्या आणि घरातील अडचणी सोडवण्यामध्ये दमछाक होऊ शकते. वेळ कमी पडल्यामुळे काही कामे अर्धवट राहू शकतात. या आठवडय़ात एकापेक्षा जास्त बाजूनी तुमच्यावर ताण येऊ शकतो. अशावेळी मन स्थिर ठेवून काम करणे हितावह ठरेल. परिवारातील सदस्यांची साथ मिळू शकते. सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घाला.
मकर
कष्टाचे प्रमाण जास्त आणि पैशांची आवक त्यामानाने कमी असल्यामुळे तुम्ही नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन पद्धतीचे काम शोधण्याच्या प्रयत्नात असाल. या गोष्टींकरता मित्रांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक ताळमेळ न बसल्यामुळे खर्चावर नियंत्रण असणार नाही. या आठवडय़ात कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. वारुळाची माती जवळ ठेवावी.
कुंभ
तुम्ही अगोदर केलेल्या प्रयत्नांचा आणि त्यातून शिकलेल्या अनुभवाचा फायदा तुम्हाला या आठवडय़ात मिळेल. अगोदर केलेल्या कामामुळे नवीन काम मिळू शकते. परिवारातील सदस्यांमध्ये एकी राखण्याचा प्रयत्न कराल. पण एखाद्या सदस्याच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. तुमचे कौशल्य दाखवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तब्येतीला सांभाळावे लागेल. गूळ खाऊन पाणी पिऊन मग काम करावे.
मीन
हा आठवडा थोडा उदासवाणा किंवा रेंगाळलेला असा वाटू शकतो. कामाची गती कमी झाल्यामुळे उत्साहात कमी येऊ शकते. दररोजच्या सवयीच्या त्याच त्याच जगण्याला तुम्ही थोडे कंटाळून जाल. या आठवडय़ात तुम्ही नवीन संधीच्या शोधात असाल. उत्साहवर्धक काही करावेसे वाटेल. थोडक्मयात तुम्हाला जीवनशैलीमध्ये बदल करावासा वाटेल. निळय़ा रंगाचा हातरुमाल जवळ बाळगावा.
टॅरो उपाय ः घराण्यातील शाप जाण्याकरताः काही घराणी शापीत असतात. आपण बघतो की त्या घराण्यांमध्ये बरकत होत नाही. वंशवृद्धी खुंटते. आजारपण आणि आर्थिक विवंचना कायम असते. याकरता एक छोटी काच घ्यावी. काचेवर थोडे काजळ लावावे. घरातील प्रत्येक सदस्याने आपला चेहरा त्या काचेत बघावा. काच फ़ोडावी. सगळे तुकडे एका काळय़ा कपडय़ात बांधून त्यात तीन मुठी मीठ आणि एक काळा हकीक घालून पिशवी शिवून टाकावी. ती पिशवी अमावास्येला वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी.