हनुमानस्तुती-पूजन सर्व संकटनाशक
आज हनुमान जयंती आहे. शारीरिक सामर्थ्य, बलोपासना आर्थिक सामर्थ्य, अप्रतिम बुद्धिमत्ता यांचे कारकत्व असलेला देव म्हणजे हनुमान. साक्षात रुद्रावतार असल्याने सर्व तऱहेच्या आजारावर संकटांवर मारुती उपासना फलदायी ठरते. विष म्हटले की नागसाप समोर दिसतो व साप म्हटले की, कालसर्पयोग, पितरांचे दोष दिसतात. हे सर्व दोष मारुती आराधनेने कमी होतात. सर्व देवदेवतांची कृपा व आशीर्वाद असणारा देव म्हणजे हनुमान. आज त्याच्या जयंतीदिनी जे त्याची आराधना करतात, त्यांच्या कुटुंबातील दोष कमी होऊ लागतात. लग्न जुळत नसेल, गुप्तशत्रंgचा त्रास, प्रखर कालसर्प योग, आर्थिक विवंचना, आजारपण, सांसर्गिक रोगराई, घरात अशांतता, नोकरी व्यवसायातील अडचणी यासह असंख्य त्रास असतात. त्यासाठी हनुमान जयंतीला मारुतीचे कोणतेही स्तोत्र जास्तीत जास्त वेळा वाचावे. सांसर्गिक व न कळणारे रोग हे राहुखाली येतात. जगात सांसर्गिक रोगाने हाहाकार माजविलेला आहे. सध्या राहू मिथुन या वायूराशीत असल्याने वाऱयाप्रमाणे या रोगाचा प्रसार वाढत आहे. 19 सप्टेंबरला राहू बदलल्यावर सध्याचा सांसर्गिक रोग पूर्णपणे आटोक्मयात येईल. 13 एप्रिलला रवि ग्रह मेषेत आल्यावर 14 मे पर्यंत रोगाचा प्रादुर्भाव झाला तरी तो फारसा धोकादायक नसेल तरीसुद्धा सप्टेंबरपर्यंत स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी लागेल. या काळात हनुमान उपासना, महामृत्युंजय जप, अग्निहोत्र तसेच दुर्गासप्तशतीचे पठण चालू ठेवावे, भीमरुपी महारुद्रा, हनुमान चालीसा, हनुमान कवच, हनुमान सहस्त्रनाम अशी असंख्य स्तोत्रे आहेत. आपल्याला आवडणारे कोणतेही स्तोत्र वाचावे. त्यामुळे हनुमंताची कृपा निश्चित लाभेल. विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मीस्तोत्र यांची जोड दिल्यास बऱयाच आर्थिक अडचणीही कमी होऊ शकतील. सकाळी आठच्या आत व सायंकाळी सूर्यास्तानंतर रात्री 8 पर्यंत केलेली मारुती उपासना त्वरित फळते. देवाला तुम्ही काय देता हे देव पहात नाही पण तुमच्या उपासनेत भक्ती किती, श्रद्धा किती हे तो पहात असतो. जे काही घडते त्यात परमेश्वराचा काही तरी सुप्त हेतू असतो. काही वेळा वाईटातूनही चांगले होते. पवनपुत्राच्या आराधनेने सध्या फैलावत असलेला रोगही लवकरच आटोक्मयात येईल, अशी आशा करण्यास हरकत नाही.
मेष
धनस्थानी शुक्र असल्याने या सप्ताहात काही अपेक्षित यश मिळेल. वडिलधाऱयांची सेवा केल्याचे फळ या सप्ताहात मिळेल. जवळच्या नातेवाईक अथवा मित्र मैत्रिणीमध्ये गैरसमजूत होऊन वादवादीचे प्रसंग निर्माण होतील. उष्णतेचे कोणतेही आजार होणार नाहीत याची काळजी घ्या.
वृषभ
राशितच शुक्र असल्यामुळे धनलाभाच्या घटना घडतील. अडलेली सरकारी कामे हळुहळू मार्गस्थ होऊ लागतील. नोकरीत असणाऱयांना शुभसंकेत मिळतील. संततीची प्रगती हळुहळू मार्गावर येऊ लागेल. आजारपण कमी होण्यासाठी कडूनिंबाच्या पानाने आंघोळ करावी. इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील.
मिथुन
या सप्ताहात खर्चावर शक्मयतो नियंत्रण ठेवावे लागेल. दूरच्या प्रवासाला जाताना काळजी घ्यावी. कामामध्ये अडचणी निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करतील. सांसर्गिक व डोळय़ाच्या विकारापासून काळजी घ्या. घरातील वातावरण शुद्ध ठेवा. वादविवाद टाळा. शक्मयतो एकमेकांची मने दुखवू नका.
कर्क
काही महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करत असाल तर अडथळा येण्याची शक्मयता आहे. अचानक संधी साधून कामे आटोपून घ्या. आहारातील असंतुलनामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. अति विश्वासामुळे काही नातेवाईकच आपला घात करू शकतील. पति पत्नीतील वाद विकोपाला जाऊ नयेत, याची काळजी घ्या.
सिंह
पैसा राखून ठेवणे ही काळाची गरज आहे. असा अनुभव प्रत्ययास येईल. स्वत:च्या घरातील एखाद्या वयस्क क्यक्तिच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यसनापासून दूर रहा, अन्यथा काही आजारांना सामोरे जावे लागेल. उद्योग व्यवसायाची गाडी हळुहळु रुळावर येत जाईल. उत्तरार्धानंतर आर्थिक जम बसेल. काही रेंगाळलेली कामे लवकरात लवकर करून घ्यावीत.
कन्या
स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवणे ही मोठी बाब असेल अन्यथा सडेतोड बोलण्याने गैरसमज निर्माण होऊन नातेवाईकांपासून व मित्र मैत्रिणीपासून दूर रहावे लागेल. महत्त्वाच्या काही धार्मिक कार्यात हिरीरिने भाग घ्याल. या महिन्यात अचानक कोठून ना कोठून धनलाभ घडेल. दूरचे प्रवास शक्मयतो टाळा. नोकरीमध्ये अचानक काही महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडेल.
तूळ
स्वत:च्या मनस्तापावर नियंत्रण ठेवा. अन्यथा शत्रूचे बळ वाढेल. काही महत्त्वाचे व्यवहार सुरळीत होतील. श्री हनुमान जयंती असल्याने मारुतीचे कोणतेही स्तोत्र वाचावे. घरातील वातावरण आनंदी ठेवा. महत्त्वाच्या कामाच्या दगदगीमुळे थकवा जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 13 तारखेपासून बऱयाच अनुकूल घटना घडू लागतील.
वृश्चिक
सप्तमातील शुक्रामुळे प्रापंचिक जीवन चांगले राहील. भागीदारी व्यवसाय असेल तर फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. पराक्रमातील गुरु,मंगळ, शनिमुळे कामाचा ताण वाढेल. पण चांगले अनुभवही येतील. हनुमान जयंतीला हनुमान कवच वाचा.
धनु
धनस्थानी तीन महत्त्वाचे ग्रह असल्याने नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे फेरबदल घडतील. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. शष्टातील शुक्रामुळे एखादी नवी कला मंत्र तंत्र वगैरे शिकण्याची संधी मिळेल. राहू केतूमुळे सांसर्गिक रोगापासून जपावे लागेल.
मकर
पंचमात स्वगृहीचा शुक्र म्हणजे दैवी कृपेचा योग. सर्व कामात यश मिळेल. संततीचा भाग्योदय. तसेच आकर्षक संतती होण्याची शक्मयता. शनि, मंगळ, गुरु राशीतच असल्याने महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होईल.
कुंभ
चतुर्थात शुभ शुक्र असल्याने अनेक घरगुती समस्या मिटतील. घरात समृद्धी येण्याचे योग. शनि, मंगळ, गुरु अनुकूल नसल्याने महत्त्वाची कामे जपून करावीत. तसेच कुणाकडून कामे होतील, अशी अपेक्षाही करू नका. मारुती उपासना चालू ठेवा. बऱयाच समस्या आपोआप सुटतील.
मीन
लाभात शनि, मंगळ, गुरु म्हणजे अत्यंत अवघड कामात मोठे यश मिळणार. पण आपले प्रयत्नही त्या दिशेने हवेत. तृतियातील शुक्र प्रवास घडवील. साहित्यिक क्षेत्रात असाल तर अप्रतिम यश मिळवाल. गेले महिनाभर थंड पडलेले उद्योग पुन्हा सुरू कराल.