बुधवार दि. 11 ते मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020
या आठवडय़ातील महत्त्वाचे दिवस
12 पासून 16 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची धामधूम राहणार आहे. या काळातील प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. दि. 12 नोव्हेंबर-गुरुद्वादशी, वसुबारस. सायंकाळी सवत्स गाईचे पूजन करावे, म्हणजे कुटुंबाचे कल्याण होते. दि. 13 नोव्हेंबर-धनत्रयोदशी, .प्रदोष, दीपदान. या दिवशी दक्षिणेकडे दिवा लावल्यास अरिष्टनाश होतो. तसेच मृत्यूसम भय नाहीसे होते. या दिवशी उल्कादर्शन झाल्यास ते भाग्यकारक मानले जाते. तसेच दीपदान केल्यास कुटुंबातील अनेक दोष नष्ट होतात. या दिवशी लक्ष्मीचे रूप समजून काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. दि. 14 नोव्हेंबर-नरकचतुर्दशी व लक्ष्मीकुबेर पूजन आहे. सर्वतऱहेची अरिष्टे, मतभेद, संघर्ष, वाद-विवाद, भ्रष्टाचार, अनैतिक धनार्जन, अन्नदात्याला फसविणे, घरातील केरकचरा, मनातील वाईट विचार यासह सर्व अनिष्ट बाबी म्हणजेच नरकासुर! या सर्व गोष्टांrचे निर्दालन करणे म्हणजे नरकासुराचा वध असा अर्थ आहे. या दिवशी पहाटे मंगलस्नान करून सर्वांचे भले व्हावे, अशा एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात. कुटुंबातील मंडळींनी एकमेकांशी प्रेमाने व आनंदाने राहावे. सर्व कटुता दूर करावी. गैरसमजाला मूठमाती द्यावी. आणि वर्षभर त्याचे पालन करावे. सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करावे. शनिवारी दुपारी 2.18 नंतर अमावस्या सुरू होते आणि रविवार सकाळी 10.37 वाजता संपते. या काळात आपल्याला जमेल तेव्हा केव्हाही लक्ष्मीपूजन करावे. अनेक लोक लक्ष्मीपूजनाचा चांगला मुहूर्त कोणता असे विचारत असतात. लाभ व अमृत मुहूर्त तसेच सिंह लग्न, पद्मयोग, स्थिरयोग असे काही मुहूर्त असतात, पण पूर्वतयारी नसणे व गुरुजींना वेळ नसणे यासह काही कारणांमुळे दिलेल्या मुहूर्तावर पूजा होत नाही असे बऱयाच वेळा दिसून आलेले आहे. त्यासाठी लक्ष्मीपूजनाला अमुकच मुहूर्त पाहिजे असे नाही. अमावस्या तिथी ही लक्ष्मीची अतिशय आवडती आहे, त्यामुळे जोपर्यंत अमावस्या आहे, तोपर्यंत केव्हाही पूजन केले तरी ते चालू शकते. शास्त्राsक्त लक्ष्मीपूजनाला कमीत कमी सहा ते सात तास लागतात, पण हल्ली पाच-दहा मिनिटात पूजा आटोपली जाते. वास्तविक लक्ष्मीपूजन हे वार्षिक असल्याने अत्यंत योग्य पद्धतीने शास्त्राsक्त व घाई, गडबड न करता केले तरच त्याचे फळ मिळते. अन्यथा कसेतरी पूजन केल्यास वर्षभर त्याचा त्रास होऊ शकतो. उस्त्रोगधंदे, कारखाने, व्यवसाय बंद पडू शकतात. मागील काही वर्षातील अनुभव पहा, त्याची सत्यता पटेल. पूजेची सर्व तयारी झाल्यानंतरच भटजींना बोलवावे, म्हणजे त्यांचाही खोळंबा होणार नाही. ते उपलब्ध नसतील तर तुम्हाला जसे जमेल तसेच पण जे कराल ते अत्यंत श्रद्धेने करा. शांतपणाने व स्वतः केलेले लक्ष्मीपूजन नक्कीच फळते. दिवाळी लक्ष्मीपूजनाला श्रीसूक्त व देवीसहस्त्रनाम पठण करून पूजा करावी. दि. नोव्हेंबर-15 गोवर्धन पूजन आहे. त्यादिवशी महालय समाप्ती होते. दि. नोव्हेंबर 16 रोजी दिवाळी पाडवा. बलिप्रतिपदा वहीपूजन आणि भाऊबीज आहे. हल्ली सर्वत्र कोरोनाचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे फटाक्मयांची आतषबाजी कटाक्षाने टाळावी. आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्मयात घालू नका. गणेश चतुर्थीच्या काळात काही अतिउत्साही लोकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून फटाक्मयांची मोठय़ाप्रमाणात आतषबाजी केली आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. अन्यथा ते भावी काळात तुमच्यावर उलटू शकते. दिवाळी हा दिव्यांचा व प्रकाशाचा सण आहे. कर्णकर्कश आवाजाचा व प्रदूषणाचा नाही हे लक्षात ठेवावे.
मेष
या आठवडय़ात दिवाळीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल व ते यशस्वी करण्याचा
प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत सप्ताह उत्तम आहे. गुरुकृपेने मंगल कार्यातील अडचणी कमी होतील. शुक्र-मंगळाचे भ्रमण वैवाहिक सौख्यात वाढ करील. जोडीदाराच्या हौसेखातर बराच खर्च कराल. काही जुनी प्रकरणे निकालात निघतील. नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत नवीन कालखंड सुरू होईल. मानसिक समाधान मिळेल. दिवाळी आनंदात जाईल, पण तरीसुद्धा रवि-शनी केंद्रयोगाकडे दुर्लक्ष करू नका. किरकोळ चुका देखील महागात पडू शकतात. खर्चावर नियंत्रण आणि प्रदूषणमुक्त दिवाळी हे ध्येय ठेवल्यास काहीही त्रास होणार नाही. दिवाळीचे लक्ष्मीपूजन कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण करील.
वृषभ
शुक्र, मंगळाच्या प्रतियोग महत्त्वाच्या कामात चांगले यश देईल. पूर्वापार चालू असलेली कटुता संपून
प्रेमाचे व सौहार्दाचे वातावरण तयार होईल. काही अनिवार्य प्रसंगामुळे मोठय़ा खर्चाचे प्रश्न उद्भवतील, तसेच काही नव्या समस्या देखील अडचणी निर्माण करू शकतात. पण इतर ग्रहमान अनुकूल असल्याने या सर्वातून योग्यरीतीने बाहेर पडाल. जुनी कर्जवसुली या आठवडय़ात होऊ शकते. दिवाळी अमावस्या आरोग्याच्या बाबतीत उत्तम आहे. जुनाट रोग अथवा विकार असतील तर ते कमी होऊ लागतील. भगीरथ प्रयत्न करूनही हरवलेली वस्तू सापडत नसेल तर या आठवडय़ात साफसफाई करताना ती अचानक सापडेल. त्यामुळे मानसिक स्थिती उत्तम राहील. पाहुणे व सणासुदीच्या निमित्ताने खर्च वाढतील, पण ते अनिवार्य असेल. एखाद्या व्यक्तीविषयी झालेला गैरसमज या आठवडय़ात नाहीसा होईल. कामाचे प्रमाण वाढेल. नवनवीन ऑर्डरी मिळतील. या कालखंडात काही जणांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. एखाद्याची वाचा आशीर्वादाप्रमाणे मोठे काम करून जाईल व त्याचा जीवनावर चांगला प्रभाव पडेल. नोकरीत स्थानपालट अथवा कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्मयता आहे. एखादी व्यक्ती काम सोडून गेली असेल तर त्याची जबाबदारी तुमच्यावर पडेल.
मिथुन
रवि-चंद्र-बुधाचा शुभयोग प्रगतीस हातभार लावेल. अनपेक्षितपणे काही पाहुणे येथील. त्यामुळे महत्त्वाचे बेत बदलतील. शुभकार्यासाठी प्रवास योग. मुलाच्या कल्याणासाठी नव्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची ऑफर येईल. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील.
शुक्र-मंगळ प्रतियोग नोकरी-व्यवसायात ऐषआराम आणि मोठय़ा प्रमाणात पैसा मिळवून देईल. जो व्यवसाय कराल तो चांगला चालेल. मशिनरीशी संबंध असेल तर काहीतरी महत्त्वाच्या घडामोडी घडतील. विवाहाच्या बाबतीत अनुकूल काळ आहे. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात चारचौघांचा सल्ला अवश्य घ्या. घाईगडबडीत किमती सामानाची अदलाबदल होण्याची शक्मयता आहे. गुरुची अनुकूलता संपत आहे. त्यामुळे वीस तारखेच्या आत कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात करा. म्हणजे पुढे अडचणी येणार नाहीत.
कर्क
गुंतागुंतीची प्रकरणे या आठवडय़ात हातावेगळी होतील. जमीन, मालमत्ता व तत्सम इतर व्यवहारास अनुकूल काळ आहे. प्रेमप्रकरणे असतील तर त्याचे विवाहात रूपांतर होऊ शकते. लाभातील राहुमुळे नोकरी, उद्योग, व्यवसाय जोरात चालेल. हाती पैसा खेळू लागेल. काही बाबतीत लक्षात ठेवण्यासारखा फायदा होईल. पण गुप्तशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. गुरुचे भ्रमण अनुकूल नसल्याने चुकीच्या कल्पना आणि धर्मवेडेपणा यामुळे मनस्ताप होईल. काही चुका वेळीच लक्षात आल्यामुळे अडचणी कमी होतील व भाग्योदयास सुरुवात होईल. जिवावरचे गंभीर प्रसंग टळतील. दिवाळीच्या कालखंडात सर्व तऱहेच्या
प्रदूषणापासून दूर राहा. एखादी किरकोळ चूक देखील गंभीर समस्या निर्माण करू शकते. या आठवडय़ात लक्ष्मीपूजनाकडे विशेष लक्ष द्या.
सिंह
मनात असलेल्या गोष्टी मूर्तस्वरूप धारण करतील. काहीजणांना संततीप्राप्तीचे योग. प्रकृतीत सुधारणा होईल. वस्त्रप्रावरणे घेण्याचे योग. बँकेतील शिल्लक वाढेल, पण खर्चाला ताळेबंद राहणार नाही. महत्त्वाची कामे या आठवडय़ात होतील. संकटावर मात कराल. प्रयत्न आणि कर्तव्य यांचा संगम साधल्यास फार मोठे यश मिळेल. नावलौकिक, लोकप्रियता या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. सामाजिक कार्यात यश मिळेल. रक्तक्षय, ब्लडप्रेशर असलेल्यांनी जरा काळजी घेणे आवश्यक आहे. धर्माचरणी असाल तर अनेक बाबतीत विनासायास यश मिळण्याचे संकेत दिसतात. विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. पुढील काळ कठीण आहे. सांसर्गिक विकार वाढतील. त्यासाठी योग्य पथ्यपाणी ठेवावे लागेल.
कन्या
नोकरी करणाऱयांना परगावी बदली बढतीचे योग. बेकारांना चांगल्या नोकरी व्यवसायाची संधी मिळेल. बहीण-भावंडाबाबत एखादी महत्त्वाची घटना घडू शकेल. दूरच्या प्रवासात सावधगिरी बाळगावी. दिवाळी सण आहे, अनेकांचे लक्ष तुमच्याकडे असेल. त्यामुळे चैनी आणि छानछोकी वृत्ती टाळण्याचा प्रयत्न करा. अचानक घडलेल्या काही प्रसंगामुळे कुटुंबातील वातावरण दूषित होण्याची शक्मयता दिसते. गैरसमजाला वाव देऊ नका. ऐन दिवाळीच्या काळात काहीजण मुद्दाम उधार उसनवार अथवा पैसे मागण्याची शक्मयता आहे. पण ते परत मिळतीलच याची खात्री नाही. यासाठी सावध रहा .अध्यात्मिक मार्गात असाल तर त्यात चांगली प्रगती होईल. त्याचा दैनंदिन जीवनावर चांगला परिणाम दिसून येईल. वास्तूच्या कोणत्याही व्यवहारास अनुकूल काळ आहे.
तूळ
दरवषी तुमच्या राशीतच दिवाळी येते व त्याचवेळी लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे या राशीवर लक्ष्मीची अखंड कृपा असते. त्यासाठी दिवाळी लक्ष्मीपूजन व्यवस्थित करा. त्याचा संपूर्ण वर्षभर चांगला फायदा होईल. कुटुंबातील अनेक क्लेश कमी होतील. मुलाबाळांचा भाग्योदय होईल. कुटुंबातील वातावरण बदलेल. काही नव्या पाहुण्याचे आगमन होईल. नोकरीत अपेक्षित बदल करतील. बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. विवाहासाठी अनुकूल काळ असल्याने चारी कडून सावध राहून मगच प्रयत्न करावा. एखादेवेळेस फसवणूक होण्याची शक्मयता आहे. दूरवरचे प्रवास आणि वास्तुविषयक कोणतेही काम हातावेगळे होईल. जर कोठे पैसे अडकलेले असतील तर ते येऊ शकतात. मानसिक समाधान देणाऱया अनेक घटना या आठवडय़ात अनुभवाल. किरकोळ आजारांचे प्रमाण वाढणार आहे. काळजी घ्या. देवाधर्माबाबतीत काही चुकले असेल तर ते निवारण करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक
या आठवडय़ापर्यंतच गुरुचे पाठबळ आहे. या काळात विवाह, नोकरी, धनलाभ, मंगलकार्य यासह कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. त्यानंतर आगामी चार-पाच महिने तुम्हाला सर्व कथित बाबतीत जपून राहावे लागेल. खर्चावर कटाक्षाने नियंत्रण ठेवा. पैशाची उधळपट्टी अजिबात नका. नवा स्नेह होताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गुरु-शनिचा योग काही बाबतीत शुभ आहे, पण प्रत्येक कामात विलंब होईल. महत्त्वाची किंमती वस्तू कुणाकडेही ठेवताना विश्वासार्हता तपासा. महत्त्वाची सर्टिफिकेट वारंवार तपासून ठेवा. चेकबुक, पासबुक तसेच शेअर सर्टिफिकेट कोणाच्या हाती पडू देऊ नका. ग्रहमान अनिष्ट नाही, पण बेसावधगिरी एखादे संकट निर्माण करू शकते हे लक्षात ठेवा. मुलाबाळांच्या हाती वाहन चुकूनही देऊ नका. त्यांच्या चुका तुम्हाला निस्तराव्या लागतील.
धनु
वास्तू, घर, जागा, भाऊबंदकी, देणी-घेणी याबाबतीतील कोणतीही कामे त्वरित करून घ्या, यशस्वी होतील. पुढील आठवडय़ापासून गुरु शनिच्या आर्थिक फायदा तुम्हाला मिळू लागेल, पण त्याची पूर्वतयारी आतापासूनच करून घ्या. शिक्षणातील अडथळे कमी होतील. कोर्टप्रकरणे योग्यरीतीने हाताळल्यास यशस्वी व्हाल. तुमची कमाई, श्रीमंती, घरदार, वाहन यांचे कोठेही प्रदर्शन करू नका. नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. या जगात कुणालाही कमी लेखणे धोक्मयाचे ठरू शकते. आर्थिक व्यवहारात निवास योजना राबविल्यास त्याचा मोठा फायदा होईल. नोकरी-व्यवसायात स्थिरता येईल. हंगामी तत्त्वावर कामावर असाल तर नोकरीत कायमचे व्हाल. विवाहासाठी अनुकूल काळ आहे. महत्त्वाची कोणतीही कामे आगामी सहा महिन्यात करून घ्या. अतिउष्णता, पित्त, रक्तदोष, डोळय़ांची जळजळ यांचा त्रास होईल. कोणत्याही बाबतीत निष्काळजी राहू नका. दिवाळीसण असला तरी ग्रह गतिकडेही दुर्लक्ष करू नये. परिस्थितीमुळे अडचणी आल्या असतील, पण यापुढे सर्व वर्षे पूर्ण करू शकाल. वाहन, घरदार, जमिनीचे व्यवहार यात मोठे लाभ संभवतात.
मकर
उद्योगाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते असे म्हणतात. या आठवडय़ा तसे अनुभव येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती चांगली राहील, पण लॉटरी, मटका सट्टाबाजार यातील गुंतवणूक हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे या गोष्टींचा पूर्ण अभ्यास नसेल तर त्याकडे चुकूनही वळू नका. नोकरी-व्यवसायात अचानक बदल किंवा महत्त्वाचे फेरफार घडतील. महत्त्वाच्या जागेवर तुमची शिफारस केली जाईल. मालकाची मर्जी राहील, पण शनि-गुरुच्या आगामी कालखंडात कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. कोणतेही व्यसन, वादावादी, टीकाटिपणी व दुसऱयाकडून निर्माण केले जाणारे गैरसमज या पासून दूर राहणे आवश्यक आहे. आगामी कालखंडात काही नव्या रोगांचे प्रमाण वाढणार आहे. त्यासाठी प्रकृतीची काळजी घ्या. एखादी चूक देखील गंभीर प्रसंगाला निमंत्रण देऊ शकते.
कुंभ
एकाच वेळी अनेक कामे करण्याची तुमची क्षमता आहे, पण कुणाचा पाठिंबा नसेल तर त्यात यश मिळणार नाही. त्यासाठी तुमच्या कल्पना आणि क्षमता योग्य व्यक्तीला दाखवून त्याचा उपयोग करून घ्या. जीवनात चांगले बदल करतील. या आठवडय़ात गुरुकुल आहे, तोपर्यंत कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. त्यानंतर पुढील काळ अग्निपरीक्षेचा असेल. प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगावी लागेल. तथाकथित साधुसंतांच्या मागे लागल्याने मोठा आर्थिक फटका बसेल. कुटुंबातील काही पूर्वार्जित मालमत्तेची कागदपत्रे हाती लागतील. कोर्टमॅटर, मध्यस्ती, वादावादी, मतभेद यापासून दूर राहा. कुणी कितीही गळ घातली तरी कुणालाही जामीन राहू नका. नोकरी-व्यवसायात सर्वांचे मन सांभाळूनच काम करावे लागेल. या आठवडय़ात एखाद्या व्यक्तीकडून मोठी कामे मिळण्याची शक्मयता दिसते.
मीन
दशमात गुरु आहे, तोपर्यंत नोकरी-व्यवसाय, घरदार याबाबतीत रखडलेली कामे करून घ्या. त्यानंतर शनि-गुरु योग तुमच्या जीवनाला वेगळी कलाटणी देईल. कामाची जबाबदारी वाढणार असल्याने मानसिक शांतीला तडा जाण्याची शक्मयता आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवाळी सणानिमित्त मोठय़ा प्रमाणात खरेदी कराल, पण त्यात अनावश्यक वस्तू अधिक असतील. मित्र-मैत्रिणी व कुटुंबासाठी हात सैल सोडावा लागेल. वाहन खरेदीची शक्मयता. काहीजणांना नव्या जागेत जाण्याचा योग येईल. घराची रंगरंगोटी करून रुपरंग बदलल्यास पूर्वीच्या काही कटकटी कमी होतील. नोकरी-व्यवसायात कामाच्या नव्या संधी मिळतील. काहीजणांना परदेश प्रवासाचे योग येतील. आतापर्यंत माहीत नसलेल्या अनेक गोष्टी समजतील.