येत्या 20 रोजी गुरुचा मकरेत प्रवेश
ग्रहमालेतील बलाढय़ आणि अत्यंत शुभ मानला गेलेला गुरु ग्रह येत्या 20 तारखेस मकर राशीत प्रवेश करेल आणि तिथे तो एप्रिल 2021 पर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रात मकरेचा गुरु हा नीच मानलेला आहे. नीच ग्रह छळतात अशी एक गैरसमजूत आहे. पण ती पूर्णपणे चुकीची आहे. जे ग्रह नीच असतात ते आपल्या उच्चस्थानी पाहत असल्याने ते जेथे पाहतील तेथे त्यांचे अतिशय चांगले फळ मिळते, व ते ज्या स्थानी पडतात तेथे त्याचे अनिष्ट फळ मिळते, असा सिद्धांत आहे. गुरु हा मुळातच अत्यंत सात्विक आणि पवित्र ग्रह असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत. पण आपल्या चुकीने जर त्याचे पावित्र्य भंग झाल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. तो ज्या नक्षत्रात ज्या अंशावर असेल त्यानुसार पाहून त्याचे शुभ-अशुभ फळ निश्चित समजू शकते. तुमची रास कोणतीही असो तुमच्या पत्रिकेत ज्या स्थानी चार आकडा पडलेला असेल त्या स्थानासंबंधित तुम्हाला अत्यंत शुभ फळ मिळणार आहे, तर जेथे दहा आकडा पडला असेल तेथे मात्र जरा त्रास होऊ शकतो. शनि आणि गुरु सहा महिने एकत्र राहणार आहेत. असा योग अनेक वर्षानंतर येतो. त्यामुळे आगामी सहा महिन्यांच्या कालखंडात या शनि-गुरुची अत्यंत महत्त्वाची व स्थिर स्वरूपाची फळे सर्वच राशींना मिळणार आहेत. कोणतेही व्यसन, मद्यपान, मांसाहार, अनैतिक धनार्जन, सावकारी, छळवाद, भ्रष्टाचार, गैरव्यवहार इत्यादी बाबींचा त्याग केल्यास या गुरुची अत्यंत शुभ फळे मिळतील. सर्वच गोष्टी साध्य होत नाहीत, पण जेवढे शक्मय आहे तेवढे पाळण्याचा प्रयत्न करा. गुरुचरित्राचे वाचन, ज्ञानदान, मंगल कार्यासाठी सहाय्य, गरीब मुलांसाठी शिकवण्या करणे, कोर्ट प्रकरणात सत्याची बाजू उचलून धरणे, खोटय़ा साक्षीपुराव्यापासून दूर राहणे वगैरे बाबींचा अवलंब केल्यास या शनि-गुरुची कोणतीही अनिष्ट फळे मिळणार नाहीत. मुळातच कोणताही ग्रह अनिष्ट नसतो. आपल्याला जे काही चांगले किंवा वाईट अनुभव येतात ते आपल्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ असते व ग्रहतारे त्याचा हिशोब तपासून आपापल्या भ्रमणानुसार त्याची बरे-वाईट फळे देत असतात. लॉटरी लागणे, अनुरूप पती-पत्नी मिळणे, उत्तम नोकरीचा लाभ, व्यवसायात प्रगती, नशीब फळफळणे, विमान प्रवास, वाहन घरदार होणे, नावलौकिक, प्रसिद्धी, आकर्षक व्यक्तिमत्व, जीवनात आनंदी वातावरण राहणे, कमी श्रमात मोठे धनलाभ या साऱया बाबी घराण्यातील अथवा पूर्वजन्मातील चांगल्या कर्माची फळे असतात. याच्या उलट ज्या अनिष्ट घटना असतात, त्या देखील पूर्वजन्मातील कर्माची फळे असतात. या आठवडय़ात दिलेले सर्व राशींचे भविष्य गुरु पालटशी संबंधित असून त्याचा प्रभाव आगामी सहा महिन्यापर्यंत राहील. प्रत्येकाने आपापला अनुभव पहावा.
मेष
दहाव्या गुरु-शनिमुळे नोकरी-व्यवसायात आमूलाग्र महत्त्वाचे बदल घडतील. काहीजणांना नोकरी-व्यवसाय बदलण्याचा योग. वडिलांच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना. वाहन खरेदी वगैरे व्यवस्थित. अत्यंत शुभ काळ. कौटुंबिक सुख वाढेल, आर्थिक विवंचना कमी होतील, घरात जर काही ही दोष असतील तर ते या काळात नष्ट होऊ शकतील. राजकारणात असाल तर महत्त्वाचे पद मिळू शकते. सर्व क्षेत्रात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. दीर्घकाळ रखडलेल्या अनेक महत्त्वाकांक्षा यापुढे पूर्ण होऊ लागतील. वास्तुसंदर्भातील काही समस्या असतील तर त्या कमी होऊ लागतील.
वृषभ
मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. काही चुकीच्या धोरणांमुळे अचानक नुकसान होण्याची शक्मयता. जीवनात काही गुंतागुंतीची प्रकरणे निर्माण होतील. संततीसुखात अडचण येऊ शकते, पण पारंपरिक शत्रुत्व नष्ट होईल, शेजारीपाजारी व नातेवाईक तसेच आप्तमित्र यांच्याशी संबंध सुधारतील, महत्त्वाच्या कामासाठी प्रवास हे सारे अनुभव आगामी सहा महिन्यापर्यंत येतील. विद्यार्थ्यांनी यावषी मोठे यश मिळाल्यामुळे देवाचे आभार मानण्यास हरकत नाही. वैवाहिक बाबतीत काही महत्त्वाच्या घटना.
मिथुन
आठव्या शनि-गुरुमुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही चुकीच्या गोष्टी हातून होतील. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. पण आर्थिक भरभराट, नोकरीविषयक उन्नती, इस्टेटीचा लाभ, व्यापार-उद्योगात मोठे लाभ, कर्जफेड यादृष्टीने उत्तम काळ आहे. या गुरुच्या कालखंडात कोणत्याही बुवा, महाराज वगैरे यांच्या नादी लागू नका. अन्यथा बरेच नुकसान होईल व होणारी कामेही खोळंबतील. या गुरुमुळे राहूचा अनिष्ट परिणाम काही प्रमाणात कमी होईल. कोणत्याही अडचणी अथवा संकटे आली तरी त्यातून आपोआप सुटका होईल. हे सारे अनुभव एप्रिलपर्यंत येतील. दत्तपूजन व गुरुचरित्र वाचन करा. त्यामुळे गुरुचा त्रास होणार नाही.
कर्क
आरोग्य चांगले राहील. कोणतीही संकटे आली तरी ती दैवी सहाय्याने त्यातून सुटका होईल. वय झाल्यामुळे लग्नात येणाऱया अडचणी कमी होतील. काही बाबतीत तडजोड करावी लागेल. विवाह झाला असेल तर उत्कर्ष होईल. मानसिक रोग, हिस्टेरिया वगैरेपासून जपा. सामाजिक क्षेत्रात वावरताना काळजी घ्या. नको ते प्रकार घडण्याची शक्मयता आहे. संततीच्या बाबतीत चांगले अनुभव येतील. काही आर्थिक समस्या असतील तर त्यावर मार्ग निघेल. नावलौकिक, प्रसिद्धी, प्रवास याबाबत चांगले अनुभव येतील. कोर्ट प्रकरण सुरू असेल तर तुमची बाजू योग्य असेल तर निश्चित अनुकूल निकाल लागेल.
सिंह
राशीच्या षडाष्टकात येणारा गुरु आध्यात्मिक बाबतीत चांगले यश देईल. नोकरी, उद्योग, व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. हाती पैसा टिकू लागेल. शिक्षणाची अडचण असेल तर ती कमी होईल. कितीही संकटे आली तरी त्यातून मार्ग कसा काढावा हे गुरु-शनि शिकवतील. त्याचा पुढील जीवनात बराच फायदा होईल. या गुरुच्या कालखंडात सर्व प्रकारच्या अनिष्ट बाबींपासून दूर राहा. एखादी किरकोळ चूक देखील गंभीर समस्या निर्माण करू शकते. आरोग्याच्या बाबतीत असलेले त्रास कमी होऊ लागतील. नोकरीच्या शोधात असाल तर त्यात यश मिळेल. विवाहाच्या बाबतीत ग्रहमान अनुकूल नाही. त्यामुळे काही महिने वाट पहावी लागेल.
कन्या
पंचमात येणारा गुरु आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम आहे. मित्रमंडळींचे सर्व बाबतीत उत्तम सहकार्य मिळेल. वाहन वगैरे खरेदी करू शकाल. हाती पैसे येऊ लागतील, पण त्याबरोबर कौटुंबिक सुखात अडचणी निर्माण होतील. पती-पत्नी अथवा मुले यांच्या बाबतीत काही मतभेद निर्माण होऊ शकतात. दैनंदिन कार्यात किरकोळ अडचणी निर्माण होतील. महत्त्वाच्या कागदपत्रावर सही करताना काळजी घ्यावी लागेल. एखादा छोटा व्यवसाय सुरू करू शकाल व तोच व्यवसाय पुढे तुम्हाला उच्चस्थानी नेईल. शिक्षणाच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. क्रिकेट व तत्सम खेळाकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. अन्यथा काही आवडी निवडी शिक्षणावर प्रतिकूल परिणाम घडवतील.
तूळ
चतुर्थात येणारा गुरु नोकरी व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल आहे. तात्पुरती नोकरी असेल तर ती कायमची होईल. उच्चपदासाठी प्रयत्न करा. वेतनवाढ होण्याचे योग. राजकारणात जाण्याची इच्छा निर्माण होईल. कलागुणांना जनतेसमोर सादर करण्याची संधी मिळेल. कुटुंबाचे वातावरण शांत व समाधानी राहील, पण पैसा किंवा संतती ह्यापैकी एका बाबतीत चिंता राहील. माता-पिता यांच्या बाबतीत काळजीचे प्रसंग. जीवनात अनेक महत्त्वाच्या उलाढाली व त्यामुळे संपूर्ण जीवन बदलून जाईल. हे सारे अनुभव एप्रिलपर्यंत येतील. वास्तुविषयक कामे असतील तर ती पूर्ण होतील. काही भाग्यवंतांना चार चाकी वाहनाचे योग.
वृश्चिक
गुरुचे तृतीयात होणारे आगमन फक्त प्रवास, लिखाण व संबंध सुधारणे यास अनुकूल आहे. नवीन शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. कोणत्याही संकटात जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. जीवाला जीव देणारी मित्रमंडळी भेटतील. सामाजिक कार्यात यश. व्यापार-उद्योग जोरात चालेल, पण कोर्ट प्रकरणे, जामीनकी, पोलीस केसेस, मध्यस्थी व नको त्या व्यक्तीला सहाय्य करणे यामुळे संकटात पडाल. सावध रहा. बौद्धिक क्षेत्रात असाल तर चांगली प्रगती होईल. दैवी कृपेचा योग. घराण्यातील पूर्वपुण्याईमुळे जीवनात अचानक सर्वकाही मिळत जाईल, पण काही लोकांशी व्यवहारी दृष्टिकोनातूनच संबंध ठेवावे लागतील. स्तुती करणाऱया लोकांपासून दूर राहणे आवश्यक समजावे.
धनु
धनस्थानी येणाऱया गुरुमुळे आर्थिक बाबतीत महत्त्वाच्या संधी येतील. आतापर्यंत न झालेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ लागतील. अचानक धनलाभाचे योग. आरोग्यात सुधारणा होईल. पूर्वी जर कुणाला जामीन राहिला असेल तर त्यातून बाहेर पडण्यास अनुकूल काळ. मालमत्तेसंदर्भातील कोणतेही प्रश्न सुटतील, पण थोडे सामंजस्य आणि तडजोड करावी लागेल. नोकरी-व्यवसायात शक्मयतो बदल करू नका. जागेसंदर्भातील कागदपत्रे नीट जपून ठेवावी लागतील. विवाहाच्या बाबतीत अनुकूल काळ आहे. जरा तडजोड केल्यास बरेच काही साध्य करू शकाल. कोर्ट मॅटर पासून दूर राहा. मित्रमंडळींच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे आवश्यक. विमा प्रकरणातून मोठय़ा धनलाभाचे योग. ते सारे अनुभव एप्रिलपर्यंत येतील.
मकर
तुमच्या राशीला येणारा गुरु जीवनात आमूलाग्र बदल घडविल. एखादे न होणारे काम होऊन जाईल. मुलाबाळांच्या विवाहाचा प्रश्न सुटेल. कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर प्रतिपक्षाचे काहीही चालणार नाही. प्रवास, भागिदारी, महत्त्वाच्या वाटाघाटी, आर्थिक व्यवहार, मध्यस्थी यास अनुकूल काळ आहे. तुमच्या प्रयत्नामुळे एखाद्याचा संसार उभारला जाईल. तसेच बेकाराना नोकरी मिळेल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी पडण्याची शक्मयता आहे. काहीवेळा आपण ठरवतो एक आणि होते दुसरेच असा अनुभव येऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. एप्रिलपर्यंत हे सारे अनुभव येऊ शकतात.
कुंभ
दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे गुरु व शनि दोघेही अनिष्ट स्थानी आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व बाबतीत अत्यंत जपून राहणे आवश्यक आहे. आर्थिक आवक मंदावेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्याचा कुणी विपर्यास करू नये याची काळजी घेणे आवश्यक. नोकरी-व्यवसायात ताणतणाव वाढवू नका. एखादवेळेस दुसऱयांच्या चुका तुमच्या माथी मारल्या जातील, पण इतर बाबतीत ग्रहमान उत्तम आहे. रोजच्या जीवनात त्याचा फारशा अडचणी येणार नाहीत, पण तरीही बेफिकीर राहू नका. तुमच्या अडचणींचा इतर लोक गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कोणासमोरही आपली संकटे व अडचणी यांचे प्रदर्शन करू नका.
मीन
लाभात येणारा गुरु मित्रमंडळींच्याकडून त्रास व आर्थिक हानी दर्शवतो, पण मुलाबाळांच्या बाबतीत शुभघटना. त्यांचा उत्कर्ष तसेच परदेशी जाण्याची संधी मिळेल. दूरवरचे प्रवास अचानक रेंगाळल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. घराची दुरुस्ती वगैरे करताना अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे स्वतः करा. इतरांवर सोपविल्यास बऱयाच अडचणी निर्माण होतील. काही वेळा आपल्याकडे शिक्षण, बुद्धिमत्ता, कष्ट, चातुर्य व कलाकौशल्य असूनही कुणाचा पाठिंबा नसल्यामुळे यश मिळत नाही पण, आगामी चार-पाच महिन्यात काही नव्या व्यक्ती आयुष्यात येतील व त्यांच्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. जगासमोर तुमचे नाव आल्याने तुमचे आर्थिकमान उंचावेल. सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील.
.