बुधवार दि 10 ते मंगळवार दि.16 मार्च 2021
कुटुंबातील शापित दोष निवारक महाशिवरात्री
प्रत्येकाच्या कुटुंबात काही ना काही शापित दोष असतातच. ते ज्यांना समजते ते शांती करून मोकळे होतात, पण काहीजणांना परिस्थिती अथवा इतर काही कारणामुळे शांती वगैरे करता येत नाही अथवा त्यावर विश्वास नसतो. पण त्रास मात्र होत असतात. आपल्या पूर्वजांच्या हातून नक्की काय घडले असेल ते आपल्याला माहीत नसते व काहीजण अमुक गोष्ट तुमच्या पूर्वजांच्या हातून घडलेली आहे असे सांगतात. त्याची शहानिशा करणे ही शक्य नसते. कर्माचे बर-sवाईट फळ हे प्रत्येकाला कधी ना कधीतरी भोगावेच लागते. त्यातून सुटका नाही. जोपर्यंत आपली वेळ चांगली असते, तोपर्यंत काहीही त्रास होत नाही. पण वेळ फिरताच अनिष्ट घटना घडण्यास सेकंदही लागत नाही. महाशिवरात्री व्रत पूजन वरील कुटुंबातील सर्व शापित दोष निवारण करण्यासाठी अति उत्तम मानले आहे. महाशिवरात्रीला जागृत तीर्थक्षेत्राच्या मंदिरात महादेवाची पूजाअर्चा करण्याबरोबरच तेथे जर पिंपळाचे झाड असेल तर तिथे बसून श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. हे शक्मय नसेल तर विष्णूचा कोणताही मंत्र 1008 वेळा म्हणावा. त्याचा अनुभव चांगला येतो. केवळ एक दिवस वाचल्याने त्याचे फळ ताबडतोब मिळते असे नसते. कमीत कमी तीन वर्षांपर्यंत रोज हे स्तोत्र वाचावे. ज्यावेळी आपण पूजाअर्चा, मंत्रपठण, स्त्राsत्र वाचन करतो, त्याच वेळेपासून तुमचे दोष निवारण होण्यास सुरुवात होते आणि ज्यावेळी हे दोष पूर्ण नष्ट होतात. त्यावेळी तुम्हाला त्या स्तोत्रात सांगितलेली सर्व फळे अवश्य मिळतात. पापाचे डोंगर पूर्ण पार केल्याशिवाय कोणत्याही देवपूजेचे फळ कधीही मिळत नाही. आज बी पेरले म्हणून उद्या झाड उगवत नाही. त्याला तशी निगाही राखावी लागते व वेळही यावी लागते. याच न्यायाने कोणतेही धार्मिक कार्य अथवा मंत्रपठण सातत्याने सुरू ठेवल्यास त्याचा अनुभव आज ना उद्या निश्चित येतो. उद्या दुपारी 2.40 पासून शिवरात्रीला सुरुवात होते. मध्यरात्री बारा 12.24 ते 1.13 पर्यंत महाशिवरात्रीचा अत्यंत प्रभावी काळ आहे. या काळात केलेले शिवपूजन घराण्यातील अनेक शापित दोष नष्ट करते. महामृत्युंजय मंत्र, श्री शिवलीलामृत यासह कोणत्याही स्तोत्र अथवा मंत्राने महादेवाचे पूजन करा पण, त्याचबरोबर विष्णुसहस्रनाम देखील अवश्य वाचा. उद्यापासून अखंडित किमान एक वर्षभर तरी हा उपाय करून पहा. अनेक चांगले अनुभव निश्चित येतील. हल्ली कोरोनाचा दुष्प्रभाव सर्वत्र वाढलेला आहे. त्यामुळे जत्रा यात्रा यांच्या मागे न लागता घरातच जरी शिवपूजन केले तरी चालू शकते. महाशिवरात्री अथवा अंगारकी संकष्टी, नवरात्र अशा वेळेस लोक तीर्थक्षेत्री जाऊन तेथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी करतात. तसे चुकूनही करू नका. करोनाचाचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवून श्रद्धेने परमेश्वराचे स्मरण करा. चुकून जर एखाद्याला संसर्ग झालाच तर ते निस्तरणे अतिशय महागात पडू शकते.
मेष
लाभस्थानी होणारी महाशिवरात्री आणि अमावस्या हा अत्यंत शुभ फलदायक व सर्व कामात यश देणारा योग आहे. या रोगावर सर्व कल्याण होऊ शकते. अत्यंत अवघड कामे यशस्वी होऊ शकतात. आर्थिक फायदा होईल. मित्र-मैत्रिणींचे उत्तम सहकार्य राहील. जागा किंवा वाहन खरेदीची हौस पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश तसेच नोकरी व्यवसायात अपेक्षेपेक्षा मोठे यश प्राप्त कराल. पण आर्थिक व्यवहार मात्र जपून करावेत.
वृषभ
महाशिवरात्री आणि अमावास्या दशमस्थानी होत आहे. आर्थिक व्यवहारात चांगले यश मिळवाल. काही जुनाट व्यवहार मार्गस्थ होतील. जागा व नोकरीसंदर्भातील अडलेली कामे होऊ लागतील. नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. राहू-मंगळाचे भ्रमण अनिष्ट योगात आहे. त्यामुळे बोलण्यातून गंभीर चुका होऊ शकतात. कोणाही व्यक्तीशी मोबाईलवर बोलताना सावध राहा. कोणीतरी निष्कारण बदनाम करण्याचा प्रयत्न करतील.
मिथुन
भाग्यस्थानी होणारी महाशिवरात्री व अमावस्या देव धर्माच्या बाबतीत शुभ आहे. घराण्यातील दोष नष्ट करण्यासाठी याचा उपयोग करता येईल. काही अवघड कामे या सप्ताहात दूर करू शकाल. अतिदूरचे प्रवास मात्र कटाक्षाने टाळावेत. आर्थिक व्यवहारातील समस्या दूर होतील. शारीरिक आजार अथवा त्रास नव्याने निर्माण होतील. यासाठी काळजी घ्यावी. नवीन नोकर-चाकर ठेवणार असाल तर जरा सावधगिरी बाळगावी लागेल.
कर्क
अष्टमस्थानी महाशिवरात्री व अमावस्या होत आहे. घराण्यातील शापित दोष, आजार, अपघात, बदनामी, गैरसमज, आर्थिक अडचणी यासह अनेक त्रास असतील, नोकरी-व्यवसाय सरळ चालत नसेल तर या महाशिवरात्रीला महादेव आणि विष्णूचे आवश्य पूजन करा. तसेच पशुपक्ष्यांना अन्नदान, गरजूना शिक्षण व बिघडलेले संसार जोडणे अशी कल्याणकारी कामे केल्यास सर्व काही चांगले होईल. पत्रिकेतील शापित दोषही कमी होतील.
सिंह
सप्तमस्थानी होत असलेली महाशिवरात्री आणि अमावस्या हा एक प्रकारचा अत्यंत शुभयोग. साक्षात शंकर-पार्वतीच्या विवाहाचा दिवस. लग्नात येणारे अडथळे, बाधा, दोष, मंगळदोष, संसार बिघडले असतील तर या महाशिवरात्रिला केलेले शंकर व विष्णु पूजन तुम्हाला सर्वबाबतीत कल्याणकारी ठरणार आहे. आरोग्याच्या तक्रारी असतील तर मृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करा. मटका, लॉटरी, शेअर बाजार अशा ठिकाणी गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल.
कन्या
महाशिवरात्री राशीच्या प्रीती षडाष्टकात होत आहे. आर्थिक बाबतीत चांगले योग पण अमावस्या योगामुळे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नवीन नाती जुळताना सावधगिरी बाळगा. प्रवास, कर्जफेड यादृष्टीने ग्रहमान उत्तम आहे पण त्याचबरोबर बाधित दोषांचाही प्रभाव वाढणर आहे. त्यासाठी शिवलीलामृत आणि विष्णुसहस्रनाम यांचे वाचन चालू ठेवा. त्यामुळे आगामी काळात येणारी संकटे परस्पर नष्ट होतील व तुम्हाला त्याची काहीही झळ लागणार नाही.
तूळ
महत्त्वाच्या त्रिकोण स्थानात महाशिवरात्री व अमावस्या होत आहे. पूर्वजांच्या काळातील शापित दोष असेल तर ते नष्ट करण्यासाठी हा योग चांगला आहे. या दिवशी कुलदेवाला अभिषेक करून नंतर जेथे जागृत महादेव मंदिर असतील तेथे जाऊन शिवसहस्रनाम अथवा विष्णुसहस्रनाम वाचावे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल व शापीत दोषही नष्ट होऊ लागतील. मुलाबाळांच्या बाबतीत काळजी घ्या. राहु-मंगळचा अशुभ योग विषारी पदार्थापासून धोका दर्शवितो.
वृश्चिक
वास्तुदोष व पूर्वजांच्या बाधिक दोषाने पीडित असाल तर सुखस्थानी होणारी महाशिवरात्र व अमावास्या या दिवशी घरातच कुलदेवतेचे पूजन करून शिवलीलामृत आणि विष्णुसहस्त्रनाम वाचावे. त्यामुळे वास्तूत शांतता राहील. जर कुणाची वाईट नजर असेल तर ती पण दूर होईल व शांतता आणि समृद्धी राहील. घाईगडबडीत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. तसेच वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत कोणतीही निर्णायक टीका टिप्पणी करू नका.
धनु
महाशिवरात्रि अमावस्या पराक्रमस्थानी होत आहे. महत्त्वाचे पत्रव्यवहार, वाटाघाटी, देणी-घेणी व स्नेहसंबंध जोडणे यादृष्टीने उत्तम योग आहेत, पण नातेवाईक व शेजारी-पाजारी यांच्याशी कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्या. आपला मोबाईल, दोन महत्त्वाच्या वस्तू शक्मयतो कोणालाही वापरण्यास देऊ नका, त्याचा दुरुपयोग होण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाबतीत मध्यम योग. त्यामुळे महत्त्वाच आर्थिक व्यवहार जपून करावेत.
मकर
धनस्थानी होणारी महाशिवरात्री व अमावस्या काही समस्या सोडविण्यास मदत करील, पण आर्थिक बाबतीत काही विचित्र अनुभव येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कुणाच्याही सांगण्यावरून अथवा प्रलोभनाला बोलून कोठेही गुंतवणूक करू नका अन्यथा पुढे पश्चाताप करण्याची पाळी येईल. गुरु-शनिचे शुभ योग काही महत्त्वाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्याची पाळी आणतील. अशावेळी घाई गडबड न करता आगामी काळाचा अंदाज घेऊन निर्णय घ्या, म्हणजे नुकसान होणार नाही.
कुंभ
तुमच्या राशीतच महाशिवरात्री व अमावस्या होत आहे. बोलण्याच्या भरात काहीतरी गंभीर चुका होतील व त्याचा परिणाम गंभीर असेल. त्यामुळे सावधानता ठेवा. पण महादेव पूजन आणि विष्णुसहस्त्रनाम वाचन केल्यास बऱयाच समस्यांतून निश्चितच मार्ग निघेल. आर्थिक अडचणी कमी होतील. घराण्यातील पूर्वजांच्या दोषांमुळे अडलेली प्रगती पुन्हा सुरू होईल. किंमती वस्तू खरेदी करण्याचा योग. काही कारणाने बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील.
मीन
अनिष्ट स्थानी होणारी महाशिवरात्री व अमावास्या तुम्हाला सर्व बाबतीत सावध राहण्यास सुचवित आहे. पण धार्मिक कार्यात मात्र उत्तम यश मिळवाल. महामृत्युंजय मंत्र आणि विष्णुसहस्रनाम यांचे पठण चालू ठेवा. त्यामुळे सर्व प्रकारचे शारीरिक-मानसिक व बाधिक दोष दूर होतील. कुटुंबात सुख समाधान राहील. आर्थिक समस्या कमी होतील. मुलाबाळांच्या बाबतीत समस्या असतील, तर त्याही कमी होतील. पण सर्व तऱहेच्या व्यसनांपासून दूर राहा, अन्यथा सभा-संमेलने खाजगी कार्यक्रम, जेवणावळी वगैरेतून गडबड गोंधळ होऊ शकेल.