उद्याचे सूर्यग्रहण महत्वाचे पण वेध पाळण्याची जरूरी नाही
बुधवार दि. 9 जून ते मंगळवार दि. 15 जून 2021
गुरुवार दि. 10 रोजी सूर्यग्रहण होणार आहे. ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे वेधादी कोणतेही नियम पाळण्याची जरुरी नाही. आशिया, अमेरिका व आफ्रिका खंडाचा उत्तरेकडील भाग, अटलांटिक महासागर व आक्&िटक प्रदेशात हे ग्रहण दिसेल. दुपारी 12.59 वाजता सुरू होऊन सायंकाळी 4.17 वाजता संपेल. या ग्रहणाचे धार्मिकदृष्टय़ा नसले तरी ज्योतिषशास्त्रदृष्टय़ा मात्र निश्चितच महत्त्व आहे. कारण सूर्य हा जगाचा पालन करणारा असल्याने पृथ्वीवर कुठेही त्याचे ग्रहण झाले तरी प्रत्येक राशीवर त्याचा बरा-वाईट प्रभाव पडतोच. त्यातही शनिअमावस्येला हे ग्रहण होत असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढते. ग्रहणाच्या संबंध राहू-केतूशी आहे. शनि व राहू यांचे सख्य सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या अमावस्येला होणारे ग्रहण काय प्रभाव टाकेल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वृषभ राशीत मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणावर तसेच शनि-मंगळाच्या प्रतियोगात होणारे ग्रहण नक्की काय फळ देईल हे पहावे लागेल. शनिपुत्र गुलिक राशीच्या तिसऱया स्थानी मंगळाच्या युतीत आहे. भावंडे, नातेवाईक, शेजारी वगैरेंशी मतभेद होऊ शकतात. अपघात व दुर्घटना तसेच सोशल मीडिया, पत्रकारिता व वृत्तपत्रे यावर अनिष्ट प्रभाव जाणवेल. या कालखंडात प्रवास वगैरे टाळता आल्यास उत्तम. शनि अमावस्येला होणारे ग्रहण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही महत्त्वाचे बदल घडवेल. ग्रहण दिसो अथवा न दिसो त्याचा कमी-जास्त प्रभाव प्रत्येक राशीवर जाणवतोच असे ज्योतिषशास्त्र मानते. ग्रहणाचे परिणाम पुढील अमावास्येपर्यंत जाणवतात. त्यामुळे आगामी काही दिवस सर्वांनी काळजी घ्यावी. त्यातही मतभेद, भांडण, गैरसमज, टोचून बोलणे, एखाद्याचे मन दुखवणे, निष्कारण आरोप करणे, कुणाचा तरी राग कुणावर तरी काढणे, वाहन जोरात चालवणे अशा गोष्टी कटाक्षाने टाळा. सध्या सांसर्गिक रोगाचा प्रभाव वाढत आहे. आज भेटलेली व्यक्ती उद्या दिसेलच याची खात्री नाही. माणसे जोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या वेळी कुणीतरी मदतीला येतील. प्रसंग बाका आहे. त्यामुळे साध्यासुध्या कारणावरून कुणाचेही मन दुखवू नका. प्रत्येकाचे नोकरी-व्यवसाय थंड पडले आहेत. त्यामुळे सर्वांची परिस्थिती गंभीर आहे. काहीजण लज्जेस्तव आपली परिस्थिती काय आहे हे कुणालाही सांगत नाहीत. कारण ‘सुख सांगावे जनात व दुःख ठेवावे’ मनात अशी म्हण आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक समजावे. सरकारने कितीही पॅकेज जाहीर केले तरी ज्यांना खरोखरच जरूर आहे, त्यांना काहीही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.हे विदारक सत्य कुणीही नाकारणार नाही
मेष
उद्याच सूर्यग्रहण धनस्थानी होत असून गुलिक प्रभाव ईशान्येकडे आहे. पुढील अमावस्येपर्यंत महिनाभर कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करा. कुणाला पैसे देताना घेताना तसेच, बँकेच्या कर्मचाऱयांनी वगैरे फार सावध राहणे आवश्यक आहे. कितीही गंभीर प्रसंग आले तरी मनाचा तोल ढळू देऊ नका. तसेच कुणालाही चुकूनही अपशब्द बोलू नका. तसे थट्टामस्करी, मार्मिक बोलणे वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका. बाकी इतर बाबतीत ग्रहमान उत्तम आहे.
वृषभ
उद्याचे सूर्यग्रहण तुमच्या राशीत होत असून गुलिक प्रभाव पराक्रमात आहे. मानसिक स्थिती चंचल राहील. कोणताही ठाम निर्णय घेणे अवघड होईल. काही जणांच्या वागण्यामुळे मनस्थिती बिघडण्याची शक्मयता आहे. भावंडे व नातेवाईक यांच्याशी कोणतेही महत्त्वाचे व्यवहार करताना जरा सावध राहणे आवश्यक आहे. पुढील अमावास्येपर्यंत काळजी घ्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात काही दिवस रजेवर जाणे टाळा.
मिथुन.
अनिष्ट स्थानी होणारे सूर्यग्रहण आणि गुलिक वास्तव्य शुभ नाही. गुप्तशत्रूंच्या कारवाया, नको त्या लोकांकडून बदनामी, मानसिक चांचल्य, हाती घेतलेल्या कामात अडथळे असे प्रकार अनुभवास येतील. कुणी काहीही म्हटले तरी कुणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. पत्रव्यवहार, मोबाईलवरील मेसेज, करारमदार, देणी-घेणी, खर्चाच्या बाबी या सर्वबाबतीत सावध रहा. कोणकोणत्या रूपाने येऊन त्रास देईल सांगता येणार नाही. देवाधर्माकडे विशेष लक्ष द्या. म्हणजे संकटाची तीव्रता जाणवणार नाही.
कर्क.
लाभस्थानी होणारे सूर्यग्रहण अत्यंत शुभ फलदायक आहे. सर्व कामात यश. मित्र-मैत्रिणींचे उत्तम सहकार्य. रेंगाळलेल्या कामांना गती, मानसिक समाधान, प्रेमप्रकरणे, आर्थिक व्यवहार या सर्व बाबतीत उत्तम यश मिळेल. पण आरोग्याच्या बाबतीत जपावे. किरकोळ अपघाताची शक्मयता आहे. शनि-मंगळ यांचा प्रभाव वैवाहिक जीवनावर पडणार आहे. मतभेद टाळा. कितीही कटू प्रसंग आले तरी सामंजस्याने मार्ग काढा. कुणालाही तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावू देऊ नका. अन्यथा संसारीक अडचणी वाढतील.
सिंह
दशमस्थानी होणारे सूर्यग्रहण आगामी महिनाभर तुम्हाला नोकरी व्यवसायासह सर्व बाबतीत मोठे यश मिळवून देईल. नोकरी-व्यवसायातील अडचणी कमी होतील. काही कारणाने निर्माण झालेले गैरसमज आपोआप दूर होतील. जर काही कामे अडकली असतील तर ती पूर्ण करून घ्या. गुलिक प्रभाव धोकादायक असल्याने काही नको असलेल्या व्यक्ती घरी येण्याची शक्मयता आहे. त्यांच्यामुळे मनस्ताप होईल. कोणीतरी पूर्वीचे खुसपट काढून वाद-विवाद निर्माण करण्याची दाट शक्मयता. विचित्र स्वप्न तसेच घरात अस्वस्थता जाणवेल.
कन्या
उद्याचे सूर्यग्रहण भाग्यस्थानी होत आहे. शिवाय गुलिक प्रभाव लाभस्थानी आहे. त्यामुळे काहीतरी अतिमहत्त्वाच्या घटना या महिन्यात घडू शकतात. विमान प्रवास, भाग्योदय, विवाह, संततीलाभ, आरोग्य सुधारणा, गंभीर संकटातून सुटका यांचा त्यात समावेश असेल. तुमचे महत्त्वाचे कागदपत्र अथवा एखादी वस्तू हरवली असेल तर ती परत मिळू शकेल. नोकरीसाठी प्रयत्न केला असेल तर त्यात यश मिळेल. कुटुंबातील मानसिक ताण तणाव कमी होतील. हे सारे अनुभव महिन्याभराच्या कालखंडात येतील. वाहन मात्र कुणालाही देऊ नका.
तूळ.
उद्याचे ग्रहण अष्टमस्थानी होत आहे. आगामी महिनाभर त्याचे परिणाम जाणवत राहतील. आरोग्य, कामात अडथळे, विलंब, शत्रुपीडा, बाधिक दोषांचा परिणाम असे त्याचे स्वरूप राहील. त्यासाठी कोणाशीही कोणतेही व्यवहार करताना जास्तीत जास्त सावधगिरी बाळगा. शनिपुत्र गुलिक दशमस्थानी आहे. त्यामुळे नोकरीविषयक उन्नती, मुलाबाळांचं उत्तमसौख्य, मंगलकार्य सर्व तऱहेने यश तसेच धार्मिक अथवा मंगलकार्यात भाग घ्याल. एखादे रिकामे झालेले पद किंवा नोकरी तुम्हाला मिळू शकते.
वृश्चिक
उद्याचे सूर्यग्रहण सप्तमस्थानी होत आहे. शिवाय शनिपुत्र गुलिक भाग्यस्थानी आहे. वैवाहिक जीवनात सामंजस्य ठेवा. गैरसमजाला वाव देऊ नका. भागिदारी व्यवसाय असेल तर व्यवहार वेळच्यावेळी तपासत जा. किरकोळ दुर्लक्ष देखील धोकादायक ठरू शकेल. जगावेगळी काहीतरी करून दाखवावेसे वाटेल. स्वतःच्या कल्याणासाठी कोणतीही नवीन कला शिकण्यास हरकत नाही. पण अशक्मयप्राय कलेकडे मात्र वळू नका. तुमच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल काळ आहे.
धनु.
उद्याचे सूर्यग्रहण सहाव्या स्थानी होत आहे. कितीही कडक शत्रू असले तरी ते थंडी पडतील. महिन्याभरात कुठून तरी पैसे मिळण्याचे योग. ‘इतरांचे विष ते दुसऱयाचे अमृत’, या म्हणीचा अनुभव येईल. इतरांना टाकाऊ वाटणाऱया वस्तू तुम्हाला लाभदायक ठरतील. शनिपुत्र गुलिक अष्टमस्थानी आहे. जरा अनिष्ट फळे देण्याची शक्मयता आहे. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. व्यसन व इतर बाबींपासून दूर रहा. कमी श्रमात मोठे नाव मिळवण्याच्या मागे लागू नका नुकसान होईल. पोटाच्या विकारापासून काळजी घ्यावी लागेल.
मकर
उद्याचे सूर्यग्रहण पंचमस्थानी होत आहे. मुलाबाळांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. त्यांचे लाड पुरवताना आपण धोक्मयात येणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. काही पूर्वाजीत दोष या ग्रहण काळात जागृत होण्याची शक्मयता दिसते. त्यासाठी पूर्वजांच्या बाबतीत काही चुकले असेल तर ते निस्तरण्याचा प्रयत्न करा. गुलिक बिंदू पश्चिमस्थानी आहे. अनैतिक मार्गाकडे मन वळणार नाही याची दक्षता घ्या. प्रेमप्रकरणे असतील तर त्यामुळे कुटुंबात वादावादी निर्माण होईल. प्रवास आणि भागिदाराशी संबंध असेल तर काहीतरी गडबड झालेली दिसून येईल.
कुंभ
उद्याचे सूर्यग्रहण सुखस्थानी होत आहे. तुमचे घर, वास्तु, कमाई, गाडी, वाहन आणि राहणीमान यांच्या बाबतीत जास्तीत जास्त साधे रहा. नजरबाधा होण्याची शक्मयता दिसते. आरोग्याची काळजी घ्या. आगामी महिनाभर वास्तुसंदर्भातील कोणतीही मोठी कामे करू नका. विहीर, बोर वगैरे करताना अपघात व दुर्घटनेची शक्मयता आहे. शनिपुत्र गुलिक भ्रमण चांगले नाही. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. खाण्या-पिण्यात अचानक बदल केल्याने पोटाचे विकार उद्भवतील. ईस्त्री, मिक्सर इलेक्ट्रॉनिक वस्तू जपून हाताळा.
मीन
उद्याचे सूर्यग्रहण राशीच्या तृतीय स्थानी होत आहे. काही बाबतीत अतिशय शुभ परिणामकारक असेल. अडलेली मोठे काम होतील. आर्थिक अडचणी दूर होतील. कर्ज वगैरे असेल तर ते फिटू लागेल, पण काही नातलग व्यक्तीशी खडाजंगी होईल. शेजारी व इतर लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. शनिपुत्र गुलिक संततीस्थानी आहे. शिक्षणात अडथळे, प्रेमप्रकरणात घोटाळे, ताणतणाव वाढणे, कुणीतरी तुमच्याविषयी गैरसमज निर्माण करणे असे प्रकार घडतील. वरील सारे अनुभव महिन्याभरात येतील.