पाणी वापरता कसे यावर भाग्य अथवा दुर्भाग्य अवलंबून!
बुधवार दि.16 ते मंगळवार दि.22 जून 2021
पाण्याला ‘जीवन’ म्हटले आहे. आपण पाणी कसे वापरतो, त्याचा उपयोग कसा करतो यावरून आपले भाग्य किंवा दुर्भाग्य ठरत असते. घरातील नळ जर गळके असतील आणि पाणी सतत गळत असेल तर हाती पैसा टिकत नाही. पाण्याचा अपमान झाल्यास आर्थिक प्रगती होत नाही. यासाठीच पाणी जपून वापरावे असे पूर्वीची माणसे म्हणत असत. घरात जर अनधान्य नसेल तर पूर्वीची माणसे रात्री झोपताना रिकामी पातेल्यात अथवा भांडय़ात पाणी भरून ठेवत असत. त्यामुळे लक्ष्मीची कृपा राहते अशी समजूत होती. आपण पाणी पिताना आपल्या मनात जे काही चांगले-वाईट विचार असतात त्याचा प्रभाव पाण्यावर पडतो आणि तेच पाणी आपण जर पिल्यास त्याप्रमाणे आपले आयुष्य घडत असते. त्यासाठीच जेवण करताना अथवा बाहेर कुठेही पाणी पिताना पाण्याचा एक विशिष्ट मंत्र आहे, तो मनातल्या मनात म्हणून जर पाणी पिले तर पाण्याचे अत्यंत शुभ परिणाम दिसून येतात. मुळातच लक्ष्मी ही जलदेवता आहे. त्यामुळे पाण्याचा अपमान म्हणजे म्हणजे जलदेवतेचा अपमान हे लक्षात ठेवावे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाच्या वेळी पाण्याचां वापर कसा करावा याचे काही शास्त्रीय संकेत आहेत. त्याप्रमाणे वागल्यास निश्चितच आपले जीवन सुखी होऊ शकते. स्नान करताना देखील कोणत्या वेळी स्नान केल्यास काय होते आणि त्याचे बरेवाईट परिणाम कसे होतात, याचेही आडाखे पूर्वीच्या ऋषिमुनींनी लिहून ठेवलेले आहेत. पण कालमानानुसार त्या सर्व गोष्टी पाळता येणे शक्मय नसते. नदीस्नान, समुद्रस्नान, विहिरीतील पाण्याने स्नान यासह स्नानाचे अनेक प्रकार आहेत. त्या सर्व गोष्टी येथे स्थलअभावी देता येणे शक्मय नाही, पण तरीही पहाटे चार ते सकाळी सातपर्यंत स्नान केल्यास ते अत्यंत शुभ आणि मंगलदायक व भाग्योदयकारक ठरते. घरात, ऑफिसात अथवा कार्यालयात जिथे पाणी ठेवले जाते ती जागा अत्यंत पवित्र राहील याकडे लक्ष द्यावे. शक्मय असेल तर त्याला रोज नमस्कार करावा. आपण ज्या कामासाठी जात आहोत त्यात चांगले यश मिळावे, अशी प्रार्थना करून लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र अथवा मंत्र मनातल्या मनात म्हणावा. नंतर ते पाणी प्यावे हा उपाय करून पहा .तुमचे विचार जसे असतील त्याप्रमाणे फळ देण्याची शक्ती पाण्यात असते. त्यासाठीच कोणतेही धार्मिक कार्य करताना पाण्याचे पूजन अवश्य करावे लागते. त्याशिवाय त्या कार्यात यश मिळत नाही. बाहेरगावी जाताना कारगाडीमध्ये पायातच पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या दिसतात. कळत नकळत त्याला पाय लागतो. त्यामुळे पुढे संकटे येतात. त्यासाठी पाय लागणार नाहीत अशा ठिकाणी पाणी ठेवावे. तसेच कोणत्याही गावाला गेल्यावर जर कुठे पाणी दिसल्यास त्याला मनोभावे नमस्कार करावा. म्हणजे कोणत्याही अडचणी येत नाहीत. शिवाय हाती घेतलेली कामेही होतात. हा उपाय करून पाहण्यास हरकत नाही, पण इथे श्रद्धा मात्र अपेक्षित आहे. काहीच प्रयत्न न करता काम न करता देव कधीही यश देणार नाही, हे पण लक्षात ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या हातून घरात अथवा बाहेर कोणत्याही वेळी पाण्याचा चुकूनही अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. इतके केले तरीही खूप झाले.
मेष
प्रयत्नांना यश मिळवून देणारा आठवडा. अनेक मोठी व महत्त्वाची कामे हातावेगळी होतील. लिखाण व वक्तृत्वाची आवड असेल तर त्यात काहीतरी करून दाखवा. णुलाखती, करारमदार यात भाग घेण्याची संधी मिळेल. नोकरीसाठी जाणार असाल तर पूर्वतयारी करूनच जा. त्यात तुम्ही विजयी व्हाल. वैचारिक मानसिकता आर्थिक नियोजन करून खर्च, वेळ आणि उपलब्ध साधनसंपत्ती यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक समजावे. विवाह व मंगलकार्यासंदर्भात काही महत्त्वाची कामे असतील तर ती पूर्ण होऊ शकतील.
वृषभ
सर्व प्रकारची चैन, उदाळपट्टी, काही नको त्या स्पर्धा यात भाग घेण्याचा मोह आवरा. अन्यथा निष्कारण पैसे जातील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात वाव मिळेल .दूर असलेल्या नातेवाईकांची अचानक गाठ-भेट होण्याची शक्मयता. मॅनेजिंग डायरेक्टर एखादी मोठी संस्था चालवणे अथवा नेतृत्व करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक कामे गोड बोलूनच करून घ्या. शत्रू असो अथवा मित्र कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
मिथुन
बिघडलेली आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागेल. सरकारी कर्जरोखे अथवा एजन्सी विकत घेणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, घरातील अडगळ काढणे, नको त्या फायलींची विल्हेवाट लावणे, कायदेशीर व्यवहाराकडे लक्ष देणे यासाठी हा सप्ताह फायदेशीर आहे. नाटय़संगीत व कलाक्षेत्रात आवड असेल तर ती सादर करण्याची संधी मिळेल. तुमच्या मनात जर नोकरी-व्यवसाय, उद्योगाची काही नवीन आयडिया असेल तर ती राबविण्यास अनुकूल काळ आहे. जे काम हाती घ्याल ते स्वतः कराल तर नक्की पूर्ण होईल.
कर्क.
काही वेळा परिस्थितीने काही अनिवार्य कामे करावी लागतात पण तीच पुढे उर्जितावस्था येण्यास कारणीभूत ठरतात. याचा अनुभव या सप्ताहात येईल. नोकरी-व्यवसाय व आर्थिक व्यवहार हळूहळू मार्गस्थ होतील. मालमत्तेच्या कारणावरून वादावादी होऊ शकते. पण तरीही काही गोष्टी गुप्त ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. थोडी तडजोड केल्यास फार मोठे व समाधानकारक काम अथवा कंत्राट मिळेल. प्रभावी शनिमुळे कायदेशीर बाबीत तुमची बाजू वरचढ राहील.
सिंह
वास्तुसंदर्भातील कार्य, बांधकाम वगैरे सुरू करण्यास हरकत नाही. काही आर्थिक व्यवहाराची बोलणी चतुराईने करावी लागतील. इतरांनी सोडून दिलेली कामे हाती लागण्याची शक्मयता आहे. नोकरीसाठी प्रयत्न चालू असतील तर ते यशस्वी होतील. काही व्यवहार तडजोडीने मिटवणे योग्य ठरेल. पूर्वी जर कुणाला कागदपत्रे वगैरे दिली असतील तर ती परत घेण्यास योग्य काळ आहे. व्यवसायिक क्षेत्रात नवे आव्हान स्वीकारून ते पूर्ण करून दाखवाल.
कन्या
ग्रहमान काही बाबतीत अनुकूल आहे. कितीही प्रयत्न करून न झालेली कामे या आठवडय़ात होऊ लागतील. देवाणघेवाणीतून नवीन व्यावहारिक संबंध जुळतील. त्यातूनच नवीन व्यवसायासाठी एखादी चांगली संधी हाती लागेल. बेकारांना नव्या नोकरीचे योग येतील. उद्योग आणि व्यवसाय करणाऱयांना काही पूर्वापार धोरणे बदलणे अत्यावश्यक ठरेल. या महिन्यात सुरु होणारे दक्षिणायन सहा महिन्यापर्यंत तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवेल.
तूळ
या महिन्यात होणारे दक्षिणायन तुम्हाला जीवनातील काही समीकरणे बदलण्यास भाग पाडेल. त्याचा परिणाम आगामी सहा महिन्यापर्यंत राहील. किती काम केले यापेक्षा ते काम किती यशस्वी केले याचा अंदाज लागेल. या आठवडय़ात बऱयाच महत्त्वाच्या घटना घडतील. त्यातील काही घटना कायमस्वरूपी टिकणारा चांगला अनुभव देऊन जातील. तुमच्याकडे जर हुशारी व कष्ट असेल तर जीवनाचे सोने करणाऱया संधी मिळतील. विवाहासाठी अनुकूल काळ. परिस्थितीमुळे कमाई आणि खर्च यांचे हिशोब योग्य ठेवा. नोकरी, व्यवसायधंद्यात कामाची जबाबदारी वाढेल पण त्या प्रमाणात त्याचा फायदा देखील होईल. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका.
वृश्चिक
दक्षिणायनाच्या प्रभावामुळे सहा महिन्यापर्यंत काही न काही विचित्र अनुभव येत राहील. स्नेहसंबंध जोडण्यासाठी अनुकूल संधी. पैशाची बचत करून धनसंचय करण्याकडे लक्ष देणे योग्य ठरेल. मालमत्तेसंदर्भात जर वाद चालू असतील तर काही बाबतीत तडजोड करावी लागेल. कठोरपणे वागल्यास हाती काही लागणार नाही. विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार नवीन विषयाकडे लक्ष देणे आवश्यक. या आठवडय़ात दूर प्रवासाची संधी मिळाल्यास ती सोडू नका.
धनु
या महिन्यात दक्षिणायन सुरु होत आहे. आगामी सहा महिन्यांपर्यंत त्याचा कालखंड राहील. जमिनीसंदर्भातील कामे यशस्वी होतील. दीर्घ मुदतीचे व्यवहार हाती घ्याल. त्यात मोठा फायदाही होईल. कौटुंबिक समस्यांचा नोकरी व्यवसायावर प्रभाव पडू देऊ नका. नवीन मशिनरी सुरू करण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळेल. काही जणांना नोकरी बदलण्याची संधी, तसेच प्रगतीत अडथळा येणाऱया बाबींचा शोध लागेल. त्यानुसार उपाययोजना केल्यास बऱयाच समस्या कमी होतील व मानसिक समाधानही मिळेल.
मकर
दक्षिणायन सुरु होत आहे. आगामी सहा महिन्यापर्यंत जीवनातील सर्व पैलूंवर त्याचा प्रकर्षाने प्रभाव दिसून येईल. काही जणांच्या गैरहजेरीत त्यांची कामे सांभाळून करावी लागतील. नोकरी-व्यवसायात मोठी ऑफर मिळेल. वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. पण जुनी वाहने मात्र खरेदी करू नका. मतभेदामुळे अडलेले काही व्यवहार मार्गस्थ होण्याची शक्मयता दिसते. वास्तूत जर काही बदल करणार असाल तर पुढील सहा महिन्यात करून घ्या. स्वयंप्रेरणेने काही कराल ते मोठे यश देऊन जाईल. आर्थिक स्थिती भक्कम राहील.
कुंभ
दक्षिणायन सुरू होत असल्याने आगामी सहा महिन्यापर्यंत आर्थिक स्थिती, आर्थिक व्यवहार, कर्जफेड, प्रवास, शिक्षण याबाबतीत काही महत्त्वाचे फेरबदल घडवील व संपूर्ण जीवनावर त्याचा परिणाम होईल. कामाची जबाबदारी वाढल्याने काही जणांची मदत घ्यावी लागेल. खरेदी-विक्री व करारमदार यासाठी अनेकांचे सहकार्य घ्यावे लागेल. वैवाहिक बाबतीत गुरुबळ, अनुकूल काळ असल्याने प्रयत्न करावा. वास्तुदुरुस्ती करताना काळजी घ्या.
मीन.
या महिन्यात सुरू होणारे दक्षिणायन आर्थिक, शारीरिक, मानसिक तसेच नोकरी व्यवसायावर आगामी सहा महिन्यापर्यंत बराच प्रभाव टाकण्याची शक्मयता आहे .जे काम हाती घ्याल ते निश्चित पूर्ण करून दाखवाल. घरमालक-भाडेकरू यांच्यात असलेले मतभेद कमी होऊन चांगले सामंजस्य राहील. विवाहाच्या बाबतीत नकारघंटा दर्शवणारी स्थळे देखील होकार दर्शवण्याची शक्मयता आहे. आर्थिक व्यवहारात बारीक-सारीक गोष्टीकडे लक्ष ठेवा. महत्त्वाचे करारमदार चालू असतील तर त्यातील लिखाणाकडे बारकाईने लक्ष ठेवा.