रविवार दि.4 ते 10 जुलै 2021
मेष
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. गिऱहाईक अथवा इतर व्यक्तींबरोबर वाद वाढवू नका. रागावर ताबा ठेवा. नोकरीत तुमचे काम कौतुकास्पद ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे डावपेच यशस्वी होतील. जवळच्या लोकांना कमी लेखू नका. मैत्री सांभाळून ठेवा. घरात खर्च वाढेल.
वृषभ
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात नवे काम मिळवता येईल. वसुली करा. नवीन ओळखीचा उपयोग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रशंसनीय ठरतील. लोकप्रियेत वाढ होईल. नोकरीत प्रगती होईल. संसारात आनंदाची बातमी मिळेल. कठीण कामे मार्गी लावा.
मिथुन
या सप्ताहात तुमच्या राशीत बुधप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या कमी करू शकाल. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणीवर मात करावी लागेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात किचकट प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. प्रति÷ा, लोकसंग्रह वाढेल. घरातील वाटाघाटी संबंधी प्रश्न लवकर मार्गी लावा.
कर्क
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, शुक्र, शनि प्रतियुती होत आहे. धंद्यात हिशोबात गेंधळ करू नका. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल, असे बोलणे टाळा. कायदा पाळा. संसारात वृद्धव्यक्तीची चिंता वाटेल. नोकरीत काम करताना सावध रहा. अरेरावी करू नका.
सिंह
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात भागिदार समस्या तयार करेल. खर्च वाढेल. वस्तुंच्या दुरुस्तीचा बोजा वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परतेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. विरोधक तणाव करतील. प्रति÷ा सांभाळता येईल. घरातील चर्चेत तणाव होईल. खाण्याची काळजी घ्या.
कन्या
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल, वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठाना खूष कराल. महत्त्वाचे काम रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात योग्य संधीचा फायदा उठवा. तुमचे कार्य वेगाने पूर्ण करा. संसारात जीवनसाथीमुळे तुमच्याबद्दल आदर ठेवतील. खूष रहाल.
तुळ
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या कमी करण्यासंबंधी प्रयत्न करता येईल. मागील गैरसमज दूर करता येईल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. योजनांना गती द्या. लोकप्रियता वाढेल. संसारातील तणाव कमी होईल. उत्साह वाढेल. नोकरी मिळेल.
वृश्चिक
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, शुक्र-शनि प्रतियुती होत आहे. धंद्यात गोड बोलून फायदा करून घ्या. कायद्याच्या कचाटय़ात अडकणार नाही याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचे मुद्दे गृहीत धरले जाणार नाही. नोकरी टिकवा. संसारात लक्ष द्या. प्रश्न सोडवा.
धनु
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात मोह टाळा. फसगत टाळा. नवे काम मिळवता येईल. नोकरीत इतरांच्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखणारे लोक जवळचेच असू शकतात. प्रति÷ा टिकवता येईल. संसारात मनस्ताप होऊ शकतो. प्रकृति सांभाळा.
मकर
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात काम वाढेल. दगदग होईल. चिडचिड होईल. राग आवरा. नोकरी टिकवा. कायद्यात बसणारेच काम करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टिकात्मक चर्चा होईल. अरेरावी न करता मैत्रीच्या भाषेत बोला. संबंध टिकवा.
कुंभ
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात तणाव होईल. अचानक खर्च वाढेल. वस्तू बिघडतील. आपसातील गैरसमज संसारात वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. सहकारी वर्गाला कमी लेखू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीच्या कामात यश येईल. मैत्री कमी होईल.
मीन
या सप्ताहात मिथुनेत बुधप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात टिकून राहता येईल. अरेरावी करू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात क्षुल्लक तणाव होईल. तडजोडीची भूमिका घ्या. चूक समजून घ्या. गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका.