वाचायचे आहे राशींचा देश टॅरोचा संदेश
18 डिसें. 2021
मेष
या सप्ताहात कुटुंबातील एखादी व्यक्ती, एखादी स्त्री तुमच्यावर दबाव आणू शकते. तुमचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करू शकते. पण तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्या. तब्येत सर्वसामान्य राहील. एखादा आजार असेल तर सेकंड ओपिनियन जरुर घ्या. आर्थिक तंगी कमी होणार आहे. जर सिंगल असाल तर नवीन नातेसंबंध जुळून येऊ शकतील. कामाच्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावे लागेल.
वृषभ
वृषभवाल्यांना कामाच्या व्यापामुळे परिवाराकडे आणि घराकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. बाहेरच्या गोष्टी घरात आणू नयेत हा संदेश देणारा आठवडा आहे. मानसिक ताणतणाव, वेळेचे नियोजन, योग्यपणे न केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. या आठवडय़ात पैसे येतील पण खर्चही वाढतील. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराची अरेरावी सहन करू नका. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
मिथुन
आपण समजतो तसे जग नसते याचा अनुभव तुम्हाला या आठवडय़ात येणार आहे. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीमुळे घरातील वातावरण तणावाचे असणार आहे. मुलांच्या चुकांबद्दल दुसऱया व्यक्तींबरोबर चर्चा करू नका. तुमच्या स्वभावातील रसिकतेमुळे जोडीदार खूष होईल. पैशाची आवक वाढेल. सिंगल असलेल्यांनी प्रस्ताव देताना विचार करावा. कामाच्या ठिकाणी सल्ला घेऊनच कामे करावीत.
कर्क
एकत्र कुटुंबात राहणाऱयांना या आठवडय़ात वादविवादाला सामोरे जावे लागू शकते. एखादी व्यक्ती जाणता-अजाणता अपमान करू शकते. अशावेळी मन शांत ठेवून वागायची गरज आहे. तशी तब्येत सुधारत असली तरी कुपथ्य करू नका. या आठवडय़ात तुम्ही ऊर्जावान असाल. पैशाच्या बाबतीत बचतीकडे कल राहील. कामाच्या ठिकाणी इतरांच्या चुकीमुळे मनस्ताप होईल.
सिंह
संसारिक जबाबदाऱया पूर्ण करता करता दमछाक होणार आहे. त्यात अपेक्षित व्यक्तीचे सहकार्य न मिळाल्याने निराश होऊ शकता. ज्यांची तब्येत गेल्या काही दिवसात साथ देत नव्हती0 त्यांच्यासाठी सुवार्ता म्हणजे येणाऱया दिवसात तब्येत सुधारेल. प्रेमेंसाठी हा आठवडा नात्यामध्ये अनपेक्षित वळण घेऊन येईल. पैशाच्या बाबतीत कुठलीही जोखीम सध्या नको.
कन्या
या आठवडय़ात घरात विरोधाभासी वातावरण असेल. तुम्हाला जे हवे ते कुटुंबाला नको असेल आणि त्यांना जे हवे त्याला तुम्ही विरोध कराल. असो. सांभाळून घ्या! तब्येत ठीकठाक राहील. प्रेमींना आठवडा मजेत जाईल. एखादी रक्कम मिळाली तर नियोजन पूर्वक गुंतवा. कामाच्या ठिकाणी सगळी कामे आपल्या अंगावर घेऊ नका. टीमवर्कला महत्त्व द्या.
तूळ
या आठवडय़ात तुम्ही अध्यात्माकडे झुकाल. आत्मनियंत्रण आणि स्वतःला शिस्त लावण्याकडे तुमचा कल असेल. काही नवीन नाती निर्माण होतील. काही जुनी नाती पुन्हा जुळतील. या आठवडय़ात तब्येतीची तक्रार होणार आहे. स्वतःच्या मनाने औषध घेण्यापेक्षा डॉक्टरला दाखवलेले बरे. पैशांची चिंता करू नका. उत्तम स्थिती आहे. बक्षीसही मिळू शकते.
वृश्चिक
कुटुंबातील लहान मोठय़ा भांडणांना सोडवावे लागणार आहे. ‘दरवेळी मीच का?’ असा विचार करून चालणार नाही. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील पण ताणतणावामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबींबद्दल संयम बाळगण्याची गरज आहे. परिस्थिती कोंडल्यामुळे निराश होऊन चालणार नाही. शुक्रवार, शनिवार नवीन कामे मिळतील.
धनु
कुटुंबातील बेबनाव संपुष्टात येईल. एखाद्या व्यक्तीशी अबोला धरला असेल तर नाते पुन्हा जुळेल असे पहा. टॅरोचा मुख्य संदेश हा आहे की क्षमतेपेक्षा जास्त केल्याने आणि ताण घेतल्यामुळे तब्येतीची तक्रार येऊ शकते. प्रामुख्याने झोपेची समस्या, मुंग्या येणे असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या आणि ताजेतवाने व्हा. आर्थिक बाबतीत या आठवडय़ात काही समस्या नाही.
मकर
या आठवडय़ात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांच्या मदतीची गरज लागणार आहे. एखाद्या मित्राच्या मदतीचाही स्वीकार करा. हेतूवर संशय घेऊ नका. तब्येतीविषयी जागरूक राहून नवीन चांगल्या सवयींविषयी विचार कराल. जे सिंगल आहेत त्यांनी इतक्मयात नवीन प्रेमसंबंधाविषयी निर्णय घेऊ नये. आर्थिक तंगी जाणवेल. आपले काम मात्र चोख करा.
कुंभ
टॅरोचा संदेश आहे की, जर तुम्ही तुमच्या परिवारापासून एखादी गोष्ट लपवत असाल तर त्यांना सांगण्याची हीच वेळ योग्य आहे. लहान सहान तब्येतीच्या तक्रारींचा बाऊ करू नका. तब्येतीचा बहाणा करून सांत्वना मिळवण्याचा प्रयत्न फसला जाऊ शकतो. प्रेमीजन नात्याला वेगळय़ा पातळीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतील. आर्थिक नुकसानीपासून सावध रहा. दुसऱयाच्या कामात दखल देणे महागात पडेल.
मीन
नात्यांचे व्यवस्थापन कसे करावे हे तुमच्याकडून शिकले पाहिजे. पण त्याचबरोबर नात्याचा गैरफायदा तर उचलला जात नाही ना हेही तुम्ही पहायला हवे. गुडघेदुखी, टाचदुखी त्रास देतील. प्रेमीजनांना हा आठवडा संमिश्र आहे. अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आर्थिक बाबतीत बचत आणि गुंतवणूक दोन्हीकडे लक्ष द्याल. कामाच्या ठिकाणी वरि÷ांमुळे त्रास होईल.