अधिक मासाचे महत्त्व
बुधवार दि. 16 ते मंगळवार दि. 22 सप्टेंबर 2020
अधिक मास म्हणजे काय त्याचे महत्त्व वगैरे माहिती हल्लीच्या पिढीला माहीत नसते. दाते पंचांगकर्त्यांनी कालसुसंगत आचारधर्म या पुस्तकात अधिक मासाविषयी फार सुंदर माहिती दिली आहे. ती प्रत्येकाने आवर्जून वाचावी. कारण त्यात जे सविस्तर विश्लेषण आहे तसे इतर कोणत्याही पुस्तकात पहावयास मिळत नाही. येत्या 18 सप्टेंबरपासून अधिक मासाला सुरुवात होत असून 16 ऑक्टोबरपर्यंत हा महिना राहील. या महिन्यात तांबूल दान दिल्यास सौभाग्यप्राप्ती, देवापुढे अखंड दीप ठेवल्यास लक्ष्मीप्राप्ती, गंगास्नान सर्व पापनिवृत्ती, तसेच मौनभोजन केल्याने पापांचे निरसन अशी फळे दिली आहेत. या महिन्यात पोर्णिमा, कृष्णअष्टमी, नवमी चतुर्दशी, अमावस्या, व्यतिपात व वैधृती योग असेल, त्यादिवशी अनारसे दान करावे. त्यामुळे विपुल धनसंपत्ती प्राप्त होईल. ह्या महिन्यात कोणती कामे करावीत व कोणती करू नयेत, हे प्रत्येक पंचांगात दिलेल आहे. त्यानुसार निर्णय घ्यावा. जी कामे करणे आवश्यक आहेत, ती करावीत. देवाची पुनरप्रति÷ापना, ग्रहण, श्राध्द, नामकरण, बारसे, अन्नप्राशन, तीर्थश्राध्द, दर्शश्राद्ध नित्यश्राद्ध ही कामे करावीत. महादान,नूतन गृहारंभ, वास्तुशांती, नूतन व्रत, ग्रहण, विवाह, मुंज, विशिष्ट हेतूसाठी यज्ञ वगैरे गोष्टी करू नयेत.
यापूर्वीच या गोष्टी ठरवलेल्या असतील तर त्याला कोणताही दोष लागत नाही मंगल कार्यापूर्वीची ग्रहमख वगैरे अंगभूत कर्मे करता येतात. वयाची साठी, पंच्याहत्तरी यासारख्या शांती करू नयेत. महालय श्राद्ध करू नये. साखरपुडा, डोहाळ जेवण, लौकिक गृहप्रवेश, जागा, वास्तूखरेदी-विक्री व्यवहार इत्यादी गोष्टी करता येतात. गंगा-गया-गोदावरी या तीर्थक्षेत्री ‘नारायण नागबली त्रिपिंडी’ यासारखी शांतीकर्मे करता येतात. अधिक मास हा धार्मिक कामाशी संबंधित असल्याने त्याचा व्यावहारिक बाबीशी फारसा संबंध येत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यावहारिक कामासाठी हा महिना वर्ज्य नाही. गाडी-वाहन घेणे, नोकरीसाठी प्रयत्न करणे, वाहन शिकणे, दुकान अथवा संस्थेचे उद्घाटन, नवीन कामावर रुजू होणे, अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया, महत्त्वाची देणे-घेणे, कर्जफेड, कर्ज काढणे, घराची स्वच्छता, साफसफाई, रंगरंगोटी, नवीन कोर्सेसना प्रवेश या बाबी करता येतात याला कोणतीही आडकाठी नाही. काहीजण अधिक महिना आहे म्हणून महत्त्वाची कामे करू नका असे सांगतात पण, तसे करू नका. रस्त्यावर 500 रुपयाची नोट पडली असेल पण अधिक महिना म्हणून ती घेण्याचे कुणी सोडणार आहे का? त्यामुळे साधक-बाधक गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. काहीजण या महिन्यात जावयाला काय काय देऊ? असे विचारतात. आपल्या मनाला जे पटेल व जे परवडेल तेच द्यावे. अमुकच दिले पाहिजे असे अजिबात नाही. कुणालाही सल्ला देताना त्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा. केवळ एखाद्याने सांगितले म्हणून हे द्या ते द्या असे सांगू नये. कोणी प्रेमाने दिल्यास ते घेण्यास हरकत नाही पण, धर्माची भीती घालून जबरदस्ती करून अमुक दान दिले पाहिजे अशी भीती घालू नये. त्या पापाचे ओझे डोक्मयावर बसते व त्याचे पुढे अनिष्ट परिणाम होतात हे लक्षात ठेवावे.
मेष –
येत्या 19 तारखेला राहू धनस्थानी येत असून केतू अष्टमात आहे. आगामी दीड वर्षे तेथे तो राहील. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. पण, सतत काही ना काही खर्च निघत राहतील. एखाद्याला पैसे दिलेले असतील तर ते अडकतील. एखाद्याच्या सांगण्यावरून नवीन धंदा सुरू कराल पण, तो नुकसानीत राहील. त्यासाठी जपून वागावे. पूर्वजांच्या हातून जर काही चुका घडल्या असतील तर त्याचा प्रभाव जाणवेल.
वृषभ –
19 तारखेला राहू तुमच्या राशीत येत आहे, व केतूचे सप्तमात वास्तव्य राहील. आगामी दीड वर्षे तुम्ही सर्व बाबतीत जपून रहाणे आवश्यक आहे. मनात एक व जनात एक अशी वागणूक राहील. गुप्तपणे शत्रूचा काटा काढा. काही भाग्यवंतांना दत्तकातील इस्टेट मिळण्याची शक्मयता. वर्षभर वाहन अपघातपासून काळजी घ्या.
मिथुन –
19 तारखेला राहू अनिष्ट स्थानी येत आहे. आगामी दीड वर्षापर्यंत खर्चाचे प्रमाण वाढेल. गुप्तशत्रूंच्या कारवाया जाणवतील. घराण्यात काहीजणांच्या वागण्यात आमूलाग्र फरक झालेला दिसून येईल. या काळात कुलदेवतेची आराधना चालू ठेवा. खर्च व कमाई यांचे प्रमाण योग्य ठेवा. केतूमुळे नेत्रविकार निर्माण होतील.
कर्क –
19 ला राहू लाभात येणार आहे. आगामी दीड वर्षापर्यंत सर्व बाबतीत शुभ आहे. मानाची नोकरी व पैसा देईल. वाहन खरेदी कराल. लॉटरी व अचानक धनलाभाच्या मागे लागू नका. नुकसान होईल. मुलाबाळांच्या बाबतीत जरा अडचणी जाणवतील. कानाचे विकार असल्यास विशेष काळजी घ्यावी.
सिंह –
19 तारखेला राहू दशमात येणार आहे. फार मोठे यश मिळवून देईल. सर्व कार्यात मोठे यश मिळेल. कीर्ती व नावलौकिक होईल. ज्या क्षेत्रात असाल त्यात उच्च अधिकार प्राप्त होईल. नाना प्रकारची सुखे मिळतील. कितीही गंभीर परिस्थिती आली तरी त्यावर निश्चित मात कराल.
कन्या –
उद्याच्या 19 ला भाग्यात येणारा राहू आगामी दीड वर्षापर्यंत वारंवार प्रवास योग, तसेच धार्मिक कार्यात यश देईल. नोकरी-व्यवसाय अथवा तत्सम कारणासाठी नको त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. सरकारी नोकरी असेल तर त्यात निश्चित बदल होईल. नातेवाईकांच्या मुलांसाठी बराच खर्च करावा लागेल. सध्या असलेला नोकरी व्यवसाय बदलू नका.
तूळ –
19 ला अष्टमात येणारा राहू आगामी दीड वर्षापर्यंत जरा त्रासदायक आहे. सर्व बाबतीत काळजी घ्या. मृत्युपत्र किंवा तत्सम मार्गाने इस्टेट व धनलाभ होईल. आगामी दीड वर्षात अति दूरवरचे प्रवास एकटय़ाने करू नका. धोका आहे. राहुच्या या कालखंडात नातेवाईक व शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील, याची काळजी घ्या.
वृश्चिक –
19 तारखेस सप्तम स्थानी येणाऱया राहूमुळे वैवाहिक जीवनात विचित्र घटना घडतील. आंतरजातीय विवाह योग. भागीदारी व्यवसाय असेल तर काहीतरी गडबड घोटाळा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत आपण सावध होणे आवश्यक आहे, तसेच आगामी दीड वर्षात अनोळखी व्यक्तीने काहीही खाण्यापिण्यात दिले तर ते घेऊ नका. ऑनलाईन खरेदी-विक्री, मोबाईल संदेश या बाबतीत आपण जास्तीतजास्त सावध राहणे आवश्यक आहे.
धनु –
19 तारखेस सहाव्या स्थानी येणाऱया राहूमुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील पण, इतर बाबतीत चांगले फळ देईल. आर्थिक भरभराट. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. जे काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. पण, ठरलेल्या विवाहात अचानक काही अडचणी निर्माण होऊ शकतात. घरात जर काही गंजलेल्या वस्तू असतील तर त्या बाहेर काढा, म्हणजे राहूचा कोणताही परिणाम जाणवणार नाहा.r
मकर –
19 तारखेस पंचमात येणारा राहू आगामी दीड वर्षापर्यंत अनेक समस्या निर्माण करणारा आहे. पूर्वीचे काही व्यवहार असतील तर ते गोडीगुलाबीने हाताळण्याचा प्रयत्न करा. नको त्या ठिकाणी केलेली गुंतवणूक अंगलट येऊ शकते. घरातील पूर्वाजीत दोष डोके वर काढतील. त्यामुळे मन:शांती मिळणार नाही. मुलाबाळांच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. प्रेमप्रकरणात असाल तर मोठा धोका होऊ शकतो.
कुंभ –
19 तारखेस राहू चतुर्थात येणार आहे. आगामी दीड वर्षापर्यंत बऱयाच अतिमहत्त्वाच्या घटना घडवील. प्रिय व्यक्तीचा विरह, घरात वाद-विवाद, विषबाधा असे याचे अनुभव असतात पण, जमिनी विषयक सर्व कामे होतील. घराण्यातील दोष काढण्याचा प्रयत्न करा.
मीन –
19 तारखेस तृतीयात येणारा राहू आगामी दीड वर्षे तेथे राहील. या काळात तुमचा उत्साह वाढेल. अनेक अवघड कामे हातावेगळी कराल. इतरांना जमणार नाही ते साध्य कराल पण, भावंडांशी मतभेद होईल, व शेजारी-पाजारी कपटी बुद्धीने वागू लागतील. तुमची कमाई अथवा घरातील श्रीमंती कुणालाही दाखवू नका. नजरबाधा होऊ शकते.