होलाष्टक अत्यंत अशुभ काळ सावध रहा
बुध. दि. 3 ते 10 मार्च 2020
दरवषी फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून होळीपर्यंतचा काळ ‘होलाष्टक’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा काळ अत्यंत अशुभ मानलेला आहे. त्यामुळे या काळात कोणतीही शुभ अथवा मंगलकार्ये करीत नाहीत. 3 मार्चपासून 9 मार्चपर्यंत हा काळ आहे. विवाह, लग्नाच्या वाटाघाटी, मोठे व्यवहार, बारसे, मुंडन, संस्कार, घर बांधणे, हवन यज्ञ, नवी नोकरी धरणे, वाहन खरेदी अथवा ऍडव्हान्स बुकींग वगैरे कामे करीत नाहीत. होलाष्टक काळात केलेली महत्त्वाची शुभकार्ये अपशकुन निर्माण करतात असे म्हणतात. यामागे पुराणात अनेक उदाहरणे व कारणे दिलेली आहेत. पूर्वीच जर कामे ठरली असतील तर त्याचा दोष नाही, पण एकदम नवीन कामे या काळात करू नयेत. हिरण्यकश्यपू व प्रल्हाद यांच्या कथेत व शिवपुराणात याचे दाखले मिळू शकतात. जन्म व मृत्यू नंतरची आवश्यक ती सर्व कार्ये या काळात करता येतात. होळी म्हणजे आसुरी शक्तींचे दहन असा अर्थ आहे. अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत दर दिवशी निरनिराळे ग्रह उग्र व रागीट तसेच संतापी होत असतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती र्नाण होते. अष्टमीला चंद्र बिघडतो. नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ व पौर्णिमेला राहू असे हे ग्रह उत्तरोत्तर अधिक अनिष्ट होत जातात. या काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव लाखो पटीने वाढलेला असतो. त्यामुळे महत्त्वाच्या शुभ कार्यात म्हणावे तसे यश मिळत नाही. अनंत अडथळे येतात. पौर्णिमेला होलीका दहन झाल्यावर हा अशुभ काळ कमी होत जातो. होळीच्या दिवशी माध्यान्ही स्त्रिया होळीचे, पूजन करतात व सायंकाळी सूर्यास्तानंतर 7 ते 9 पर्यंत होळी दहन मुहूर्त आहे. मध्य प्रदेशातील मालवांचल प्रांतात ‘प्रणयपर्व’ साजरा करतात. या काळात प्रियकर-प्रेयसी घरातून पलायन करतात. संदर्भासाठी इंटरनेटवर होलाष्टकावरील माहिती पहावी. जवळजवळ सर्वच ग्रह या होलाष्टाक काळात बिघडत असल्याने चांगले फळ देण्याची त्यांची शक्ती क्षीण होते व अनिष्ट शक्तींचे प्राबल्य वाढते, त्यामुळे सर्व राशीच्या लोकांना या होलाष्टकाचा प्रभाव जाणवेल. या काळात काय करावे व काय करू नये, याचा तारतम्याने निर्णय घ्यावा. शस्त्रक्रिया, परदेश प्रवास, नोकरावर रुजू होणे अथवा मुलाखती, अति दूरवरचे प्रवास, बस अथवा टेनचे रिझर्वेशन, महत्त्वाची देणेघेणी, करार-मदार, वगैरे पूर्वीच ठरलेले असतील तर ते बदलता येणे शक्मय नसते. या आठ दिवसांच्या काळात अनिष्ट ग्रहांचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी कुलदेवासह देवदेवतांचे मंत्रपठण पूजाअर्चा करीत रहा, म्हणजे संकटे येणार नाहीत व आली तरी त्यातून काही तरी मार्ग दिसेल. वादावादी, भांडणतंटे, गैरसमज टोचून बोलणे, मार्मिक टीका टिप्पणी, अनैतिक कामे, भ्रष्टाचार, छळवाद, दंगेधोपे, शत्रुत्व यांच्या मागे लागू नका. कारण या काळात देवादिकांना बळ नसते, तसेच कुणा अनोळखीच्या घरात काहीही खाताना, पिताना काळजी घ्या. या काळात अनिष्ट कार्यात गुंतल्यास ते आपल्यावरच प्रचंड वेगाने ‘बुमरँग’ सारखे उलटते व त्याचे परिणाम फार वाईट असतात.
मेष
अशुभ होलाष्टकाचा प्रभाव सुरू आहे. अनिवार्य असेल तरच महत्त्वाची कामे करा. होळीपौर्णिमा व करिदिनादिवशी जुन्या प्रकरणातून वादावादी होईल, पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ राहतील. त्यासाठी जपावे. अति दूरवरचे प्रवास टाळावेत. अनोळखी व्यक्तीनी प्रसाद वगैरे सांगून काही खायला दिल्यास घेऊ नयेत.
वृषभ
अशुभ होलाष्टक योग सुरू आहे. आर्थिक गुंतवणूक करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारातून मतभेद, गोंधळ हेण्याचे योग दिसतात. अचानक फायद्याच्या बाबी नुकसानकारक शकतील. त्यासाठी सावधगिरी बाळगावी. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होईलच याची खात्री नाही. आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील.
मिथुन
अशुभ होलाष्टक काळामुळे स्वभावात वैचित्र्य येण्याची शक्मयता आहे. कालसर्पयोगातून ग्रहांचा प्रवास सुरू आहे. कोणतेही धाडस जपून करा. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. मोठे फायदे दिसत असताना नुकसान होऊ शकेल. अग्निपासून सांभाळा. मित्रमंडळींच्या बाबतीत मोठे गैरसमजही निर्माण होतील.
कर्क
होलाष्टक योग सुरू असल्याने बोलताना चालताना सावधगिरी बाळगा. गैरसमज निर्माण करणारे ग्रहमान आहे. परस्पर विरोधी ग्रहांचा प्रतियोग संततीसौख्यावर परिणाम करील. तसेच या सप्ताहात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजीपूर्वक वागावे. आर्थिक बाबतीत मोठे लाभ संभवतात. व्यवसाय व वास्तुच्या बाबतीत काहीतरी महत्त्वाच्या घटना घडतील.
सिंह
होलाष्टक अशुभ योग, नोकरी व्यवसाय व घरगुती बाबींवर परिणाम करील. काही प्रकरणामुळे असलेली नोकरी बदलण्याचा प्रसंग येईल. शेजारी व नातेवाईक यांच्याशी असलेले संबंध बिघडविण्याची शक्मयता असल्याने सांभाळावे. कोणत्याही तिऱहाईताची संशयास्पद वस्तू घरात ठेवून घेऊ नका., वाहन, अपघात, अग्निभय व आर्थिक हानी या बाबी लक्षात ठेवाव्यात.
कन्या
अनिष्ट होलाष्टक योग होत आहे. भाजणे, कापणे, होरपळणे यापासून सांभाळावे. आर्थिक व्यवहारात नुकसान दर्शवित असल्याने मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल. बोलण्याच्या नादात कोणत्याही प्रकारे गैरसमजाला वाव देऊ नका. पूर्वीच्या काही मोठय़ा संकटातून बाहेर पडाल. आर्थिक स्थिती सुधारेल.
तुळ
होलाष्टकाचा प्रभाव व सध्या सुरू असलेल्या कालसर्पयोगामुळे काही महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. कोणतीही कामे जपून करा. आर्थिक दृष्टीने सुवर्णसंधी मिळेल. सतत काही ना काही लाभ होत राहतील. किंवा नोकरीत पगारवाढ होऊ शकते. व्यवसायात उर्जितावस्था येईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.
वृश्चिक
होलाष्टकाचा अशुभ प्रभाव सुरू आहे. हा शापित योग असल्याने सर्व बाबतीत जपून रहा. कुणाशीही बोलताना वागताना अतिशय काळजी घ्या. पण व्यावहारिक बाबतीत चांगला काळ. पूर्वी केलेल्या कष्टाचे फायदे मिळतील. पैसाअडक। मानसन्मान, आरोग्यात सुधारणा, विवाह, नोकरी, व्यवसाय या सर्व बाबतीत अनुकूल योग. काही जुनी येणी वसूल होतील.
धनु
अशुभ होलाष्टक प्रभाव व साडेसातीच्या शापीत योगात तुमची रास अडकलेली आहे. त्यामुळे जरा सावधानतेने वागल्यास चांगले. काही महत्त्वाच्या कामांची सुरुवात होईल. दैवीसहाय्य मिळण्याची शक्मयता कमी आहे. तुमच्या घरात व्रतवैकल्ये सुरू असतील, कुलदेवाचा कुलाचार व्यवस्थित चालू असेल तर हा आठवडा तुम्हाला सर्व बाबतीत यश देणारा आहे.
मकर
नवीन व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. कोर्टमॅटर व सरकारी कामे, धन व व्यवसाय, आरोग्याच्या बाबतीत प्रगती होईल. आर्थिक प्रश्न या सुटतील. विवाहाच्या वाटाघाटीना यश मिळेल. प्रवासाच्या संधी येतील. काही जुने व्यवहार पूर्ण करू शकाल. कौटुंबिक वातावरणात जरासा फरक जाणवेल. होलाष्टकचा अशुभ प्रभाव सुरू आहे. आरोग्य सांभाळा.
कुंभ
अशुभ होलाष्टक सुरू आहे. शनिचा प्रभाव वाढेल. सर्व बाबतीत शांत मनाने निर्णय घ्यावेत. व्यवसायात कुणाला रक्कम दिलेली असेल तर ती मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या मिटतील. नोकरी, लिखाण, देणीघेणी, महत्त्वाच्या वाटाघाटी व नातेसंबंधात काही चांगल्या घटना घडतील. धनलाभ व थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. अनावश्यक मोह मात्र टाळावा लागेल.
मीन
दशमातील गुरु, मंगळ, केतुच्या सहकार्याने भाग्योदयकारक घटना घडतील. हा आठवडा तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरीत अविस्मरणीय घटना घडतील. त्याचे अनुभव दोन तीन महिन्यात येतील. अशुभ होलाष्टक सुरू आहे. तरुण-तरुणींनी प्रेमप्रकरणात सावधानता बाळगावी. फसवणूक वगैरेची शक्मयता आहे. व्यसनापासून मुक्ती मिळेल.