राशींचा देश- टॅरोचा संदेश
26-12.-2021
मेष
कर्तृत्वाला झळाळी मिळणार आहे. त्यामानाने कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुटुंबातील मंगलकार्यात भाग घ्याल. एखाद्या व्यक्तीच्या कटू बोलण्याकडे दुर्लक्ष करा. स्वभावात निश्चयीपणा येईल. रागावर आवर घाला. त्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. पण जोडीदाराला ग्राहय़ धरू नका. पैशाच्या दृष्टीने हा आठवडा सर्वसाधारण आहे.
वृषभ
वृषभवाल्यांवर या आठवडय़ात संधींचा पाऊस पडेल. पण इतक्मया पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडण्यात गफलत होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या क्यक्तीच्या आडमुठय़ा वागण्याचा त्रास होऊ शकतो. पण सांभाळून घ्यावे लागेल. प्रेमसंबंधात वाद संभवतात. भांडण ताणू नका. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणीच करा. या आठवडय़ात कामाच्या ठिकाणी वातावरण तंग असेल.
मिथुन
बुद्धीला चालना देणाऱया घटना घडतील. पेचप्रसंगातून हुशारीने मार्ग काढाल. पूर्वी एखाद्याला दिलेले वचन आता पाळावे लागेल. कुटुंबातील वातावरण निर्मळ राहील. सामान्य डोकेदुखीसारखा आजार त्रास देऊ शकतो. प्रेमींनी एकमेकाला नीट समजून घेण्याची गरज आहे. जे सिंगल आहेत त्यांनी घाईगडबड करू नये. पैशाची आवक चांगली राहील. कामाच्या ठिकाणी वरि÷ांमुळे त्रागा होईल.
कर्क
या आठवडय़ात हळवे होऊन चालणार नाही. तुम्ही तुमच्या भावना बोलून दाखवत नाही. त्यामुळे इतर लोक तुम्हाला ग्राहय़ धरू शकतात. वैवाहिक जोडीदाराच्या अति सल्ला देण्याच्या सवयीला कंटाळाल. हाडांची किंवा सांध्यांची दुखणी दुर्लक्ष करू नका. या आठवडय़ात तुम्हाला पैशांची किंमत कळेल. पैसे वाचवण्याचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा.
सिंह
भेटीगाठीसाठी, कामानिमित्त बैठकींसाठी, मित्रांबरोबर बाहेर जाण्यासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. जुनी येणी वसूल होतील. कुटुंबातील सदस्यांची मर्जी सांभाळावी लागेल. एखादी नवीन खरेदी होईल. नवीन जोडप्यांकरता आनंदाचा काळ आहे. एकमेकाला समजून घेत वेळ घालवाल. आर्थिक आवक चांगली राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांना मदत करावी लागेल.
कन्या
गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली चलबिचल कमी होईल. या आठवडय़ात प्रत्येक गोष्टीकरता तुमच्याकडे पर्याय असतील. पण निर्णय घेताना विचारपूर्वक आणि पुढचा विचार करून निर्णय घ्या. कुटुंबात महिला व्यक्तीमुळे वादाचे प्रसंग येऊ शकतात. बाहेरचे खाण्यामुळे तब्येत बिघडू शकते. लांब मुदतीच्या गुंतवणुकीतून कायदा होईल. कामाच्या ठिकाणी चहाडखोरीमुळे नुकसान.
तुळ
उत्साहवर्धक घटना घडतील. एखादी ज्ये÷ क्यक्ती ऐनवेळी मदत करेल आणि त्यामुळे कामे होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत करावी लागेल. तब्येत ठीक राहील. पण पायाला जखम होऊ शकते. पैशाच्या बाबतीत निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. कामाच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण राहील. पुढे काम वाढणार आहे. तयारीत रहा.
वृश्चिक
नवीन प्रकल्प आणि संधींचा आठवडा आहे. फायदा घ्या. समजून उमजून धोका पत्करू नका. सहकाऱयांच्या बाबतीत कटू अनुभव येतील. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. आतापर्यंत अडलेले काम पूर्ण होईल. या आठवडय़ात अनिदेचा त्रास होऊ शकतो. आवडत्या छंदासाठी वेळ काढाल. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. कामांचा कंटाळा येईल.
धनु
अनपेक्षित लाभ आणि अचानक नुकसान असे विचित्र प्रसंग घडू शकतात. घरात मंगलकार्य होईल. घरातील वातावरण हसरे असेल. सजावटीचे सामान खरेदी कराल. तब्येतीच्या एखाद्या तक्रारीमुळे त्रस्त असाल तर दुसऱया डॉक्टरचा सल्ला घ्या. हाती घेतलेले एखादे काम पुढे गेल्यामुळे चिडचिड होऊ शकते. ओळखीमुळे धनलाभ. कोणत्याही परिस्थितीत साक्षी, जामीन राहू नका.
मकर
संयम आणि चिकटीच्या जोरावर अवघड कामे पूर्ण कराल. धाडस आणि बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. इतरांच्या वागण्याचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. परिवारातील एखाद्या सदस्याची मनधरणी करावी लागू शकते. प्रेमींसाठी संयम बाळगणे गरजेचे. पैशाची आवक उत्तम राहील. पण निरुपयोगी वस्तूंवर खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतावर ठाम रहा.
कुंभ
तुमच्याकडे माहितीचे भांडार आहे. पण त्याचा योग्य उपयोग होत नाही. या आठवडय़ात तुमच्या सल्ल्यामुळे अनेकांचे प्रश्न सुटतील. छोटी कौटुंबिक यात्रा घडेल. कुटुंबाला वेळ द्या. त्यांनाही तुमची गरज आहे. वैवाहिक आयुष्यात रोमांच आणण्याचा प्रयत्न करा. पैशांच्या देण्याघेण्यात सावध राहण्याची गरज आहे. एखाद्या लोभाला किंवा आमिषाला बळी पडून नुकसान होण्याची शक्मयता.
मीन
तुमच्या कलागुणांना वाव देणारा आठवडा आहे. त्याचबरोबर या आठवडय़ात तुम्ही खूप व्यस्त असणार आहात. या व्यस्ततेचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करताना दमछाक होईल. तब्येतीच्या छोटय़ा मोठय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पण पाठीमागे चुगली करणाऱयांपासून सावध रहा.