व पु काळे यांचे एक फार सुंदर वाक्मय आहे. ‘आमचा देव दगडाचा नाही आम्ही दगडातसुद्धा देव बघणारी माणसे आहोत.’ हिंदू धर्माने झाडात पाण्यात समुद्रात वाऱयात आकाशात माणसात अग्नीत सगळीकडे देव बघितला. तो अनुभवला. आणि ज्यात चैतन्य नाममात्रसुद्धा नाही त्या दगडाचा उपयोग देवाची प्रतिमा करण्यासाठी केला. यात आमच्या ऋषीमुनींचा सर्वव्यापी दृष्टिकोन समोर येतो. देव आहे की नाही हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. आपण तो अनुभवायच्या योग्यतेचे आहोत का हा खरा प्रश्न आहे. या लेखात माझ्या पद्धतीने पूजेची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कृत ही देवभाषा मानली जाते. म्हणजे देव या भाषेमध्ये बोलतात. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनी संस्कृतातली गीता प्राकृतात आणली आणि ज्ञानेश्वरी लिहिली. का तर ज्यांना संस्कृत येत नाही त्यांना त्याचा अनुभव यावा. भावेविण भक्ती भक्ती वीण मुक्ती बोलू नये हे महाराजांनी सांगूनच ठेवलेले आहे. हा लेख लिहिण्यापूर्वी दीनानाथ कुलकर्णी गुरुजी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सोपा विधी सांगितला. आपणा सर्वांना सर्वांगसुंदर पूजा करता यावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे, गोड मानून घ्यावा आणि काही चुकल्यास मोठय़ा मनाने क्षमा करावी. सुरुवात करण्याआधी काय करावे आणि काय करू नये हे सांगतो. यात कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही, टीका करण्याचा तरी अजिबात नाही. गणेश उत्सव जेव्हा टिळकांनी सुरू केला तेव्हा लोकांनी त्यांच्यावर टीका केली की घरातल्या गणपतीला तुम्ही रस्त्यावर आणले. त्यावेळची गरज होती ती. लोकांना एका ठिकाणी एकत्र आणून स्वातंत्र्याबद्दलचे विचार जागृत करणे हे गरजेचे होते. आज त्याचे स्वरूप हे आनंदोत्सव असे झालेले आहे आणि त्यात काही गैरही नाही. अपेक्षा इतकीच आहे की या आनंदाला भक्तीची जोड मिळावी आणि गैरव्यवहाराचे गालबोट लागू नये.
1. एकदा गणेशोत्सव घरात सुरू केला की प्रत्येक वषी तो केलाच पाहिजे नाहीतर काहीतरी अनिष्ट घडते हा एक मोठा गैरसमज आहे. 2. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर अमुक इतक्मया दिवसांनी विसर्जन केले पाहिजे हा दुसरा मोठा गैरसमज आहे. चतुर्थी झाल्यानंतर गणेश विसर्जन केले तरी चालते. 3. मूर्ती ही केवळ शाडूची किंवा मातीचीच असावी, पीओपीची असू नये. उत्तर भारतामध्ये गोबर गणेश ही सुद्धा प्रथा आहे. त्यामध्ये देशी गाईच्या शेणात माती मिसळून मूर्ती करतात. सर्वोत्तम मूर्ती ही नदीकडच्या मातीची असते. मूर्तीला दिलेले रंग शक्मयतो नैसर्गिक असावेत. 3. मूर्ती अवाढव्य नसावी. 4. एखाद्या राक्षसाचा वध करत असलेली मूर्ती शक्मयतो नसावी. 4. मूर्ती प्रसन्न असावी, अभय हस्त असलेली असावी आणि तिच्या मागे कुंकवाने स्वस्तिक काढलेले असावे. 5. मूर्ती आणताना जर धक्का लागून एखादा अवयव भंग झाला तर त्या मूर्तीचे विसर्जन करून दुसरी मूर्ती आणावी, यात काहीतरी अपशकून आहे हे मनातदेखील आणू नये 6. मूर्ती आणून प्राणप्रति÷ा झाल्यानंतरसुद्धा चुकून जर धक्का लागून मूर्ती भंग झाली तरीदेखील कुठलाही वाईट विचार मनात न आणता गणाधीशाची कळकळीने क्षमा मागून, गुरुजींना बोलावून अद्भुत शांत करून घ्यावी, मूर्तीचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती बसवावी. 7. घरी प्राण प्रति÷ित गणपती असेल आणि अशौच आले तर (म्हणजे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा घरात एखादे बाळ जन्मले) दुसऱयाकडून पूजा करून घेऊन उत्सव पूर्ण करावा. 8. काही ठिकाणी उंदीरबी साजरी करतात. म्हणजे गणपतीच्या डोळय़ांवर पट्टी बांधून किंवा उंदरामध्ये आणि गणपतीमध्ये पडदा टाकून उंदराला मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. हे हास्यास्पद आहे. म्हणजे इतर दिवशी दिसला उंदीर घाल काठी, उंदीर मारण्याचे औषध ठेवा, पिंजरा ठेवा आणि त्या दिवशी मात्र मातीच्या उंदराला मांसाहाराचा नैवेद्य हे योग्य नाही. 9. गणेश विसर्जनानंतर कृपाकरून मूर्तींची विटंबना टाळा.
मेष
कितीतरी गोष्टींबाबत भाग्यवान म्हणता येईल अशी तुमची रास येणाऱया काळात असेल. मुख्य म्हणजे तब्येतीची काळजी मिटेल आणि धनप्राप्ती सुगम होईल. पैशाचा योग्य वापर तुमच्या हातात होऊ शकतो. प्रवास घडेल जमिनीचे व्यवहार मात्र पुढे ढकललेले बरे. प्रेमप्रसंगात निराश होऊ शकता. नोकरदार वर्गाला थोडा त्रास सहन करावा लागेल. भाग्य आणि मानसन्मान वृद्धी होईल.
उपायः तांबे दान करावे
वृषभ
तब्येत उत्तम राहील. व्याधी दूर होतील. कुटुंबात नवचैतन्य येईल. प्रवास सांभाळून करावा. मात्र चिंता वाटेल. धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहण्यात शहाणपणा आहे. नोकरदार वर्गाने वरि÷ांची मर्जी राखलेली बरी. वैवाहिक जीवनात ताण तणावाचे प्रसंग येऊ शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. धार्मिक यात्रेबद्दल चर्चा कराल. कोर्ट मॅटरमध्ये सफलता मिळेल.
उपाय ः गुरुवारी दत्त दर्शन घ्यावे
मिथुन
आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती जी तुमचे पैसे लुबाडण्याच्या मार्गावर आहे तिच्यापासून दूर राहावे. प्रवास टाळावा कारण त्यातून धन हानी होऊ शकते. वाहनासंबंधी तक्रार येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत चूक घडण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. अचानक धनप्राप्तीचे योग होत आहेत. मित्रांपासून लाभ होईल.
उपाय ः लहान मुलीला फळ भेट द्यावे
कर्क
तब्येतीच्याबाबतीत पुन्हा सावध राहण्याची गरज आहे. गेले काही दिवस तब्येतीची तक्रार सुरू होती तिकडे दुर्लक्ष करू नका. आपलेच पैसे परत मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश येण्याची संभावना आहे. नोकरदार वर्गाला फायदेशीर असा काळ आहे. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय ः मजुरांना दुधाचे दान द्यावे
सिंह
एरवी सुदृढ असलेली तुमची प्रकृती सध्या नाजूक झाली आहे. चिंता करण्याची गरज नसली तरी अंगावर काढू नका. कुटुंबात गैरसमजुतीमुळे वाद होतील. प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये सध्या अपेक्षा न केलेली बरी. खेळाडूंना आणि कलाकारांना चांगले दिवस आहेत. संततीकडून चांगली वार्ता मिळेल. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळू शकते.
उपाय ः सूर्याला अर्घ्य द्यावे
कन्या
प्रकृती नाजूक आहे त्यामुळे छोटय़ा मोठय़ा आजारांना कमी समजून दुर्लक्ष करू नका. तसे केल्यास त्रास आणखी वाढू शकतो. पैशांच्याबाबतीत मात्र भाग्यवान असाल. अपेक्षा नसताना एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक फायदा होईल. प्रवासात वस्तू गहाण होण्यासारखा प्रकार घडू शकतो. व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीतून अपेक्षेइतका फायदा होईल. नोकरीत कौतुक होईल.
उपाय ः मारुतीच्या मंदिरात बुंदीचा नैवेद्य दाखवावा.
तूळ
दुखणे बरे झाल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्याकरता वेळ मिळेल. मित्रांकडून धन हानी होण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक वातावरणात वादविवादामुळे तणाव येण्याची शक्मयता आहे. स्थावर मालमत्तेच्याबाबतीत भाग्य साथ देईल. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. संततीकडून अपेक्षापूर्तीचे दिवस आहेत. नोकरीत मात्र सांभाळून रहा.
उपाय ः शुक्रवारी देवीला कुंकूमार्चन करावे.
वृश्चिक
आरोग्याच्या तक्रारी असतील तर कंटाळून न जाता योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पैशांच्या बाबतीमध्ये नशीब साथ देईल. कामे पूर्ण करण्याकरता वेळ कमी पडू शकतो. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळेल. प्रवासात फायदा होण्याची शक्मयता आहे. स्थावर मालमत्तेच्याबाबतीतसुद्धा भाग्यवान असाल. गुंतवणूक करणे टाळा. वैवाहिक जीवनात आनंदाची बरसात होईल.
उपाय ः खजुराचे दान जावे
धनु
डोकेदुखी किंवा अंगदुखीसारख्या आजारापासून सुटका होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये चर्चा घडून एखादे काम पूर्ण कराल. धनागम चांगले असेल. भावंडांच्या सहकार्याने कागदोपत्री व्यवहार पूर्ण होतील. आईच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. नोकरीमध्ये चांगल्या घटना घडतील ज्याने मन आनंदी होईल. गुप्तशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
उपाय ः लाल वस्तू दान द्यावी
मकर
शरीर स्वस्थ आणि मन आनंदी अशी स्थिती असेल. कौटुंबिक वातावरणामध्ये सुधारणा होण्याची शक्मयता आहे. पैशांच्या बाबतीमध्ये चिंता करण्याची गरज नाही. प्रवासामधून ओळखी होतील याचा पुढे फायदा होऊ शकतो. स्थावर मालमत्तेविषयी असलेले व्यवहार सध्या टाळावे. कागदोपत्री व्यवहार सांभाळून करा. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
उपायः दीप दान करावे.
कुंभ
घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या मनातील गोष्ट दुसऱयांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तब्येत ठीकठाक राहील. पैसे मिळवण्याकरता जास्त कष्ट करण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये दुसऱयाच्या चुकीमुळे बोलणी खावी लागू शकतात. वैवाहिक जोडीदाराशी भांडण होण्याची शक्मयता आहे.
उपाय ः गाईला चारा घाला.
मीन
तब्येतीची हेळसांड करू नका. दुखणे विकोपाला जाण्याची शक्मयता आहे. आर्थिक आवक ठीकठाक राहील. कामाकरता प्रवास करावा लागू शकतो. स्थावर मालमत्ता आणि वाहन याबाबतीत असलेली चिंता मिटेल. प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्मयता आहे. धोकादायक गुंतवणुकीपासून चार हात लांब रहा. नोकरीत राजकारणाचा कंटाळा येईल. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल.
उपाय ः केळीच्या झाडाची पूजा करावी.