21-12-2022 ते 27-12-2022
तेरे मेरे सपने (स्वप्न शास्त्रः भाग 4)
स्वप्नामध्ये साप दिसणे त्यातही नाग साप दिसणे, सापाने दंश करणे, घरभर साप दिसणे, आपल्या घराला आग लागलेली दिसणे, घर पडताना दिसणे, जवळच्या माणसाचा मृत्यू झालेला दिसणे, टेन सुटलेली दिसणे, परीक्षेची दृश्ये दिसणे, जुने देऊळ दिसणे, मेलेली व्यक्ती स्वप्नात दिसणे, अनोळखी व्यक्तीशी भांडण झालेले दिसणे, आपण आजारी पडलेले दिसणे, अपघात झालेला दिसणे, स्वतःला नग्न पाहणे, शृंगारिक दृश्ये दिसणे अशा प्रकारची स्वप्ने तुम्ही पाहिली आहेत का? जी स्वप्ने आपल्याला पडतात त्यापैकी जास्तीत जास्त स्वप्ने ही वाईट, विचित्र किंवा अभद्र प्रकारची असतात. चांगली स्वप्ने खूप कमी पडतात. हा तर सगळय़ांचाच अनुभव आहे. त्यामुळे या स्वप्नांना घाबरण्याचे मुळीच कारण नाही. याकरता ज्योतिषाकडे, भगताकडे, देववाल्या कडे (!) जाण्याची किंवा काही उपाय करण्याची तरी अजिबात आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे शरीराला जखम झाली की ती बरी करण्याकरता खपली धरते किंवा शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याकरता शरीर प्रयत्न करते त्याप्रमाणे मनातील असलेले विकार बरे करण्याकरता मन स्वप्नांचा आधार घेते. एक प्रकारे वाईट स्वप्ने पडणे म्हणजे मनातील विकारांना वाट करून देण्याची प्रोसेस किंवा अवस्था आहे. आपल्या मनात राग, कामवासना, एखाद्याबद्दलची घृणा, तिरस्कार, एखाद्या माणसाबद्दलची किंवा परिस्थितीबद्दलची भीती या सगळय़ा वैचारिक विकारांना दूर करण्यासाठी मनाने मनाची घेतलेली ही काळजी आहे. त्यामुळे एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला वाईट स्वप्न पडले असे दिसले तर त्याला झोपेतून उठवण्याच्या भानगडीत मुळीच पडू नका. एकाच प्रकारची स्वप्ने किंवा एकच स्वप्न वारंवार पडत असेल तर मात्र खोलात जाऊन विचार करावा लागतो. आणि स्वप्नांचा परिणाम जर आपल्या दैनंदिन आयुष्यावर पडत असेल आणि तो तीव्र असेल, त्यामुळे दैनंदिन आयुष्य खराब होत असेल तर समुपदेशकाला भेटणे क्रमप्राप्त असते. काही स्वप्ने सूचक असतात यात शंकाच नाही. कोणत्या सूचक स्वप्नांचा कसा अर्थ काढायचा, कोणते स्वप्न बघितले की काय होते याबद्दलची विस्तृत माहिती फेब्रुवारी महिन्याच्या साधारण दुसऱया किंवा तिसऱया बुधवारी खजानामध्ये मी देईनच पण त्याआधी स्वप्नांचे जे तीन प्रकार आहे ते समजून घेऊया. पहिला प्रकारः ज्यामध्ये कुठलीही विसंगती नसते आणि त्यात घडणाऱया घटना या वास्तविक स्वरूपाच्या असतात. जसे की मी एखाद्या सिनेमाला गेलो आहे. यात वास्तविक जीवनाशी काहीही विसंगती नाही आणि आश्चर्यही नाही. दुसऱया प्रकारात सुसंगती नसते पण घडणाऱया घटना वास्तविक स्वरूपाच्या नसतात. जसे की मी मेलो आहे. तिसऱया प्रकारात पूर्ण विसंगती आणि वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नसतो. जसे की मी जिना चढत असताना तीन पायाचा साप दिसला आणि आम्ही गप्पा मारल्या! या स्वप्नामध्ये वास्तविकता आणि ती सुसंगती याचा लवलेशही नसतो.
महा उपायः
वृषभ राशीसाठी उपासना आणि कवचः कृष्ण चतुर्दशीला देवीला पिवळी लाल काठाची साडी अर्पण करावी. मंदिरामध्ये एक लिटर दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद म्हणून देवळातच वाटावा. ॐ दुं दुर्गाय नमः मंत्राचा 1008 जप रोज करावा
सोपी वास्तु टीप
घराच्या मुख्य दारासमोर पाय पुसणे असेल तर त्याखाली तुरटीचा एक तुकडा ठेवावा.
मेष
आर्थिकदृष्टय़ा हा आठवडा थोडा चढउतार असलेला असणार आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याअगोदर पूर्ण विचार करावा लागेल याचबरोबर चार चौघांचा सल्ला घ्यावा लागेल. कौटुंबिक नात्यांना बळकटी जरी मिळत असली तरी प्रेमसंबंधांमध्ये ताणतणाव जाणवेल. नवीन व्यापार सुरू करताना जर तुम्ही भागीदारीमध्ये करत असाल तर सावध राहण्याची गरज आहे. गुप्त शत्रूंपासून सुटका होईल.
उपाय हनुमान चालीसाचे पाठ करावे
वृषभ
कौटुंबिक वातावरणामध्ये गोडवा येईल. परस्परांच्या सहयोगाने बरीच कामे पूर्ण होतील. या आठवडय़ामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जोडीदाराबरोबर सामंजस्याने वागावे. आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक चढउतार या आठवडय़ामध्ये पहावा लागेल. प्रॉपर्टीसंबंधी प्रश्न मार्गी लागतील. प्रेमसंबंध सुधारतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
उपाय वाहत्या पाण्यात बत्तासे सोडावेत
मिथुन
करिअरच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. सुरुवातीला व्यापारात जे अडथळे आले होते ते आता कमी होतील. कामानिमित्त प्रवास घडण्याची शक्मयता आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली असेल पण त्याचबरोबर खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. काही नाती सुधारतील तर काही नात्यांमध्ये कटूता येण्याची शक्मयता आहे. लहान मोठय़ा अपघातापासून सावध रहा.
उपाय चांदीचा चौकोन तुकडा जवळ ठेवावा
कर्क
आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अंगदुखी किंवा इन्फेक्शन यासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तो उपचार वेळेत केल्यास जास्त फायदा होईल. आर्थिकदृष्टय़ा समाधानी असाल. छोटी मोठी गुंतवणूक पुढे जाऊन चांगले परिणाम देईल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष असेल. प्रवासातून आनंद प्राप्त होईल. प्रॉपर्टीच्या कामांना गती मिळेल. शेअर बाजारापासून दूर रहा.
उपाय पाण्यातील चंद्र प्रतिमेचे दर्शन घ्यावे
सिंह
खूप दिवसापासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतील. करिअरच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. आर्थिक दृष्टीने चांगली संधी मिळेल. कामानिमित्त प्रवासाची शक्मयता आहे. प्रॉपर्टीची कामे सध्या टाळावीत. आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवल्यास कटू घटना घडणार नाही. प्रेमसंबंधांमध्ये कटुता येण्याची शक्मयता आहे. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला उत्तम काळ असेल.
उपाय लहान मुलांना पेपरमिंट वाटा
कन्या
कुटुंबामध्ये शुभ कार्य घडेल. तब्येत उत्तम असेल. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम असेल. प्रेमसंबंधांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. प्रॉपर्टीच्या कामांकरता योग्य काळ नाही. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. गुप्त शत्रूंपासून सावध रहा.
उपाय अन्न दान करावे
तूळ
कामाच्या ठिकाणी आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ प्राप्त होईल. नवीन प्रोजेक्ट हाती येण्याची शक्मयता आहे. तब्येतीचा बारीक-सारीक तक्रारी सोडल्या तर बाकी चिंता करण्याचे कारण नाही. कुटुंबात थोडी वादावादी होण्याची शक्मयता आहे. एखाद्या व्यक्तीचे वागणे खटकू शकते. प्रवासाच्या संधी जरी असल्यातरी शक्मयतो प्रवास टाळावा. कागदोपत्री व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे.
उपाय देवीला कुंकुमार्चन करावे.
वृश्चिक
मानसिक ताण-तणावांचा सामना करावा लागू शकतो. पण ज्याचे टेन्शन वाटते ते तसे काहीही घडणार नाही. या काळात तब्येतीला जपावे लागेल. पोटाचे विकार संभवतात. तुमच्या वागण्यामुळे घरात वादावादी होऊ नये याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तींबरोबर पिकनिकला जाण्याचा प्लॅन कराल. प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये नशीब साथ देईल. छोटय़ा गुंतवणुकीतून कायद्याची शक्मयता नाही. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे.
उपाय दुर्गा चालीसाचा पाठ करावा
धनु
शेअर बाजारासारख्या धोकादायक गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवण्याचा मोह होईल पण अत्यंत सावध राहून निर्णय घ्यावा. प्रेमसंबंधात खोटेपणाचा सामना करावा लागू शकतो. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. लांबच्या नातेवाईकाची भेट होऊ शकते. रोजच्या कामापासून दूर जाऊन आनंद मिळवण्याकरता प्रवास करण्याचा बेत आखाल.
उपाय पिंपळाला दूधमिश्रित पाणी घालावे
मकर
सगळे ठीक असून सुद्धा काहीतरी चुकल्यासारखे वाटण्याची शक्मयता आहे. एक अनामिक हुरहूर मनात घर करून राहील. तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नाही. आर्थिकबाबतीत बेसावध राहून चालणार नाही. आर्थिक व्यवहार करत असताना सावध रहावे. कुटुंबीयांची वेळेवर साथ मिळण्याची शक्मयता आहे. कागदोपत्री व्यवहारात सही करताना पूर्ण वाचून मगच करावी. प्रॉपर्टीची कामे होतील.
उपाय महादेवाला गंगाजलाने अभिषेक करावा
कुंभ
खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे आर्थिक तंगी वाटू शकते. मिळकत सर्वसामान्य असेल. पण यामुळे कुटुंबात वादावादी होण्याची शक्मयता आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रॉपर्टीच्या कामांना सध्या टाळलेले बरे. शेअर बाजारापासून दूर रहा. प्रेमप्रकरणांमध्ये अपयश येण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा त्रास सहन करावा लागू शकतो. वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल.
उपाय गरजूला मिठाई दान द्यावी
मीन
करिअरच्या दृष्टीने येणारा काळ हा महत्त्वपूर्ण ठरेल. आर्थिक आवक उत्तम असेल. कुटुंबीयांच्या मदतीमुळे अवघड कामे पूर्ण होतील. तब्येतीला जपावे लागेल. प्रवासामध्ये नुकसान होऊ शकते. जमिनीच्या कामात अडथळा आल्यामुळे मन उदास होऊ शकते. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. लहान-मोठय़ा अपघातापासून सावध रहा. व्यापारी वर्गाला लाभ होण्याची शक्मयता आहे.
उपाय मंदिरात हळकुंड ठेवावे.