फेब्रुवारी महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 2,3,6,7,10-स. 8 नं, 11, 14, 16, 17, 23 – दु. 2 प., 24, 25, 26 – दु 4 प., 28
2 अशुभ दिवस 1, 5, 8, 9, 12, 13, 15, 18, 19, 20, 21, 22
3 अनिष्ट दिवस 1, 8, 9, 12, 13, 18, 22
4 सण/ उत्सव/विशेष तिथी 1-जया एकादशी, 2 -प्रदोष भीष्मसंतान द्वादशी, गोंदवलेकरमहाराज जन्म, 3-विश्वकर्मा जयंती, 5- कुलधर्म पौर्णिमा, माघस्नान समाप्ती, रेणुका यात्रा सौंदत्ती, 6- गुरुप्रतिपदा, 7- काळभैरव यात्रा गडहिंग्लज, 9- संकष्ट चतुर्थी, 10- मायाक्का यात्रा चिंचली, 13- कालाष्टमी, 15- श्रीरामदास नवमी, 16- विजया-स्मार्त एकादशी, 17- भागवत एकादशी, 18- शनी प्रदोष, महाशिवरात्री, 19- छ. शिवाजीमहाराज जयंती (ता.नु.), 23 – विनायक चतुर्थी, 27- दुर्गाष्टमी
5 अमावास्या 19-02-2023 सायंकाळी 4.15 ते 20-02-2023 दुपारी 12.36 पर्यंत
6 पौर्णिमा 04-02-2023 रात्री 09.29 ते 05-02-2023 रात्री 11.57 पर्यंत
7 साखरपुडय़ाचे मुहूर्त 6- दु 3 नं, 7- सायं. 5.45 प., 10, 11, 16, 24
8 बारसे (नामकरण) मुहूर्त 3, 10-स. 8 नं, 24
9 जावळाचे मुहूर्त 3, 5 स. 11 ते दु 12.40, 10 स. 8 नं., 24
10 भूमिपूजन/पायाभरणीचे मुहूर्त 2- दु 12.30 प., 17, 24
11 पाया खणणे मुहूर्त 5 दु 12.25 नं., 6, 17, 26 दु 4 प.,
12 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहूर्त) 3, 10 स. 8 नं, 11, 22,24
13 वास्तूशांतीचे मुहूर्त 2, 3, 4, 10, 11, 16, 17, 24
14 व्यापार सुरू करण्याचे मुहूर्त 4- स 9.30 नं, 10- स. 8 नं, 11, 24
15 वाहन खरेदीचे मुहूर्त 1, 3, 5, 10, 20, 27
16 शेत जमीन/जागा/प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 1, 5, 6, 16
17 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 6, 7, 25
18 डोहाळे मुहूर्त 3, 10, 24, 28
19 पंचक सोमवार 20-02-2023 उ.रा. 01.15 ते शुक्रवार 24-02-2023 उ.रा. 3.45 प.
वशेष सूचना- वरील मुहूर्त आणि इतर माहिती ही वेगवेगळय़ा पंचांगांच्या आधारे आणि स्वानुभवाने दिलेले आहे. लौकिक मुहूर्त म्हणून याकडे बघावे. विवाह आणि उपनयन याचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण पत्रिकांचा सखोल अभ्यास करून हे मुहूर्त काढावेत असे माझे मत आहे.
मेष
प्रवासातून ओळखी होतील आणि त्याचा फायदा होईल. लेखकांना उत्तम दिवस आहेत. लहान भावंडांची आणि शेजाऱयांची साथ मिळेल. मोठे काम हाती येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. करमणुकीकडे किंवा मौज मजेकडे कल असेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावे. नोकरदार वर्गाला जास्त कष्ट करावे लागतील. एखादी गुप्त बातमी कळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
उपाय लहान मुलीला हिरव्या बांगडय़ा द्याव्यात
वृषभ
जे काम कराल ते आत्मविश्वासाने कराल. नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक सुख उत्तम असेल. कुटुंबातील सदस्य एकमेकाला सहयोग करतील. सहलीला जाताना ते ठिकाण धोकादायक नाही ना याचा विचार करा. आईची थोडी चिंता वाटेल. गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ दऊ नये. जोडीदाराशी मतभेद संभवतात. व्यवसायात प्रगती होईल.
उपाय पंचगव्याचे सेवन करावे
मिथुन
तब्येतीला सांभाळून राहणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा आजार त्रास देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सगळय़ांना घेऊन काम करणे योग्य ठरेल. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकते. धनाचे आगमन आणि व्यवस्थापन उत्तम असेल. कौटुंबिक समाधान लाभेल. वाहन किंवा जमिनीविषयी व्यवहार पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला वरि÷ांकडून सहकर्य मिळेल.
उपाय गाईला चपाती आणि खीर खाऊ घालावी
कर्क
तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी बढती किंवा पगारवाढीची शक्मयता आहे. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. ऑफिसमध्ये राजकारण तापेल. या सगळय़ापासून दूर राहणेच ठीक असेल. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर औषधोपचाराने फायदा होईल. जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. छोटी गुंतवणूक धोकादायक ठरू शकते. संततीचा प्रश्न मार्गी लागेल.
उपाय तुळशीला हळदीचे पाणी घाला
सिंह
कोणाशीही व्यवहार करत असताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. परिचित किंवा अपरिचित लोक हातोहात फसवू शकतात. कौटुंबिक वातावरणात फरक पडेल. पैशांच्या बाबतीत गाफिल राहून चालणार नाही. येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रेमींना अनुकूल काळ नाही, सावध रहावे. वैवाहिक जीवनामध्ये कडू-गोड अनुभव येईल.
उपाय घरात गोमूत्र शिंपडावे
कन्या
तब्येत खुश तर आपण खुश असा मूड असेल. आरोग्याची तक्रार दूर होईल. येणी वसूल करायला प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी वाद होऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत. लहान भावाचे सहकार्य प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. धोकादायक गुंतवणूक करू नये. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून फायदा होईल.
उपाय हिरवे वस्त्र दान द्यावे
तूळ
जमिनीसंबंधी व्यवहार असतील तर ते पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. वाहन खरेदी किंवा विक्रीसाठीसुद्धा काळ अनुकूल आहे. नोकरदार वर्गाला खुशखबर मिळण्याची शक्मयता आहे मात्र गुप्त शत्रूपासून सावध रहावे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्ती होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रवास घडेल. कोणी नाव बदनाम करणार नाही याची काळजी घ्यावी.
उपाय गाईला गूळ चारावा
वृश्चिक
सगळय़ा प्रकारच्या लाभासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या मित्र मैत्रिणींसोबत आनंदाने वेळ घालवाल. आर्थिक नुकसान होता होता वाचेल. कौटुंबिक सुख उत्तम असेल. मिळकतीचे नवीन स्रोत सापडू शकतात. आवडत्या व्यक्तीसोबत प्रवास संभवतो. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक टाळावी.
उपाय गुरुवारी हळदीचे पाणी तुळशीला घालावे
धनु
नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. बढतीचे किंवा प्रशंसेचे योग आहेत. वैवाहिक जीवनात थोडा ताण तणाव संभवतो. वाणीवर अंकुश ठेवावा. तुमच्यामुळे एखादा माणूस दुखावू शकतो. धन प्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. तीर्थयात्रा किंवा धार्मिक स्थळाला भेट द्यायचा विचार कराल.
उपाय देवीच्या मंदिरात पाच बदाम अर्पण करावे.
मकर
छोटय़ा-मोठय़ा आजारापासून सावध राहण्याची गरज आहे. वेळीच उपचार करून घेतले तर फायदा होईल. आर्थिक आवक उत्तम. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता उत्तम काळ आहे. घरात एखादा छोटेखानी समारंभ साजरा कराल. प्रवासातून ओळखी होतील. वाहन खरेदीसाठी चांगली वेळ आहे. प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो. शेअरमध्ये गुंतवणूक नुकसानदायक ठरू शकते. हाताखालील लोकांचा त्रास होईल.
उपाय रुद्राभिषेक करावा
कुंभ
तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात एखाद्या तिसऱया व्यक्तीमुळे वाद होऊ शकतो. आर्थिक व्यवहार करत असताना सांभाळून राहण्याची गरज आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. भावंडांचे सहकार्य प्राप्त होईल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला मॅनेजमेंटकडून त्रास संभवतो.
उपाय जास्तीत जास्त पांढऱया रंगाचा उपयोग करा
मीन
काम करत असताना आत्मविश्वासात कमी जाणवेल. कामे वेळेवर पूर्ण होतील की नाही अशी शंका मनात येऊ शकते. आर्थिक लाभाच्या दृष्टीने सध्या अनुकूल काळ नाही. कुटुंबात वाद विवाद घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रवास टाळावा. कागदपत्रे गहाळ होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. प्रेम संबंधांमध्ये सुधारणा होईल. तुमच्यामुळे जोडीदाराचा फायदा होण्याची शक्मयता आहे.
उपाय गरजू व्यक्तीला काळे-पांढरे वस्त्र दान द्यावे