बुधवार दि. 30 डिसें. ते मंगळ दि.5 जाने. 2021
नवीन वर्षावर बुध ग्रहाचा अंमल
31 डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे पण हा योग फक्त दिवसा असेल तरच सोने खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. संध्याकाळी 07:49 नंतर हा योग सुरू होणार आहे फक्त धार्मिक कार्यासाठी शुभ समजावा, गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून सोने खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करतात, पण दिवसभर पुनर्वसु नक्षत्र आणि सूर्यास्तापर्यंत वैधृती योग आहे. रात्री सुरु होणारा गुरुपुष्यामृत योग फक्त मंत्रजप, पूजा यासाठी अतिशय उत्तम मानलेला आहे. बंद पडलेला व्यवसाय सुरू करणे, कर्जफेडीसाठी उपासना, नवग्रह स्तोत्र वाचन यासह कोणत्याही पूजा या योगावर करता येतात. दिवसभर पुनर्वसु नक्षत्र आहे. त्यामुळे काहीजण गुरुपुष्यामृत योग आहे, असे समजून सोने वगैरे खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. गुरुपुष्यामृत योगावर विवाह करू नये, असा एक गैरसमज आहे त्याला बरीच धार्मिक कारणे असतील पण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी या योगावर विवाह केलेले आहेत ते लोक अत्यंत सुखात आहेत. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आहे त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत कोणतेही अनिष्ट प्रसंग निर्माण झालेले नाहीत गाडी, बंगला, विमानप्रवास, नावलौकिक, कुबेराचे ऐश्वर्य सर्वकाही त्यांना प्राप्त झालेले आहे. त्यामुळे योगावर विवाह केल्यास काही त्रास होणार नाही. पूर्वीच्या काळातील धार्मिक कारणे हल्लीच्या काळात लागू पडत नाहीत हे देखील लक्षात घ्यावे लागेल. शुक्रवारी एक तारखेला 2021 साल सुरू होत आहे. या वर्षावर बुध ग्रहाचा अंमल आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय घटना घडतील. विद्यार्थ्यांना उत्तम जाईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष फार चांगले जाणार आहे. आर्थिक व्यवहार सुधारतील. व्यापार-उद्योग, नोकरी-व्यवसाय, रोजगार या क्षेत्रात भरभराट झालेली दिसून येईल. या वर्षात नवीन काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रयत्न करा. संक्रांतीनंतर आगामी दोन अडीच महिने अतिशय खडतर ग्रहमान आहे. या काळात सर्व राशीच्या लोकांनी सर्व बाबतीत जपून रहावे. वादावादी, गैरसमज, मतभेद, भांडण मारामाऱया, यापासून दूर राहावे. वाहन चालविताना काळजी घ्यावी. जर एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत हे लक्षात ठेवावे. चैनीवृत्ती, फाजील खर्च, भ्रष्टाचार, मोबाईल गैरवापर, कटाक्षाने टाळावा. कुटुंबातील स्त्रियांचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. कारण बुध ग्रहाचा संबंध काहीअंशी स्त्रीवर्गावर असतो, त्यामुळे काही कारणाने निष्कारण एखाद्या स्त्रीचे मन दुखावले गेल्यास त्याचा आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होईल हे लक्षात ठेवावे.
मेष
चतुर्थस्थानी होणारा गुरुपुष्यामृत योग कुटुंबात काहीतरी शुभ घटना घडवील. एखादे होणारे काम होईल. मानसिक समाधान मिळेल. नोकरीसाठी केलेल्या अर्जाला अपेक्षित उत्तर येईल. मातापित्यांचा, वडीलधाऱयांचा सल्ला अवश्य ऐका. त्यातच तुमचा उत्कर्ष होईल. आगामी दोन महिन्यात दीर्घकाळ निपुत्रिक असलेल्यांचा अपमान चुकूनही करू नका, तसेच वास्तुशास्त्राच्या नावाखाली कोणतीही पाडापाडी अथवा नवीन फेरबदल करू नका, अन्यथा नको त्या समस्या उद्भभवतील. कुलदेवतेची आराधना या सप्ताहात फार मोठे फळ देऊन जाईल.
वृषभ
अनेक बाबतीत ग्रहांचे भ्रमण चांगले असले तरी कालसर्प योगाचा प्रभाव तीव्र आहे. त्यामुळे कोणतेही काम वेळेवर होईलच, असे नाही. मन शांत ठेवून अत्यंत विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्यावा लागेल. गुरुपुष्यामृत योग पत्रव्यवहार, बोलणी, वाटाघाटी तसेच नातेवाईक व शेजारी संबंध सुधारण्यासाठी अनुकूल आहे. जे काही सांगाल त्याचा मान ठेवला जाईल. नवीन काही करणार असाल तर त्याचा आराखडा आतापासूनच तयार करा. मी दोन अडीच महिने अति दूरचे प्रवास करू नका, असे सुचवीत आहे. या कालखंडात स्वतःची गाडी, मोबाईल, कागदपत्रे कुणाच्याही हाती पडणार नाहीत याची दक्षता घ्या.
मिथुन
धनस्थानी होणाऱया गुरुपुष्यामृत योगाचा आर्थिक फायदा मिळेल. जर कुठे पैसे अडकले असतील तर तेथील पूर्वीच्या गुंतवणुकीचा परतावा लाभदायक स्वरूपात मिळेल. मनातील गोष्टी साध्य होतील. आतापर्यंत तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करणारे लोक आपण होऊन तुमच्या संपर्कात येतील. विद्यार्थ्यांना उत्तम काळ. कौटुंबिक जीवनात शुभ घटना. पण आगामी दोन अडीच महिन्याचा कालखंड आरोग्य अपघात, गंडांतर, शत्रूंच्या कारवाया, ताणतणाव वाढवणारा आहे. या कालखंडात सर्व बाबतीत काळजी घ्या. आपले कोण परके कोण हे ओळखून वागा. रात्री-बेरात्री विनाकारण कुठेही फिरू नका, कारण काही अनिष्ट ग्रहांचा प्रभाव मध्यरात्री जाणवतो त्यासाठी ही सूचना.
कर्क
तुमच्या राशीत होणारा गुरुपुष्यामृत योग अनेक बाबतीत लाभदायक ठरेल. आरोग्य सुधारणा, मानसन्मान, आर्थिक लाभ, नोकरीत प्रमोशन अथवा उच्चपद, विवाह ठरणे, गेलेली नोकरी पुन्हा मिळणे, कुटुंबातील सदस्यातील दुरावा नष्ट होणे, अशा अनेक शुभ घटना घडतील, पण आगामी दोन अडीच महिन्याचा कालखंड सर्व बाबतीत काळजी घेण्यास सुचवीत आहे. वारंवार प्रवास करणाऱया लोकांनी तसेच कोर्टकचेरी संबंध असणाऱयांनी जरा काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका.
सिंह
गुरुपुष्यामृत योग देवधर्म आध्यात्मिक बाबतीत फार मोठे यश देणारा आहे. जर कुणाची वाईट नजर असेल तर ती दूर होईल. खर्चावर नियंत्रण येईल. मानसिक समाधान देणाऱया घटना, दूरवर गेलेल्या काही व्यक्तींची भेट होईल. जर तुमच्या विरोधात कुणी काही नकोते प्रकार करीत असतील तर ते उघडकीस येतील. आगामी दोन अडीच महिन्याचा कालखंड आर्थिक बाबतीत चांगला असला तरी इतर बाबतीत त्रासदायक आहे. कुणावरही विसंबून न राहता तसेच कामाचे प्रदर्शन न करता जी कामे कराल ती निश्चित यशस्वी होतील. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल. काहीजण तुमचे मन अस्वस्थ करण्याचा मुद्दाम प्रयत्न करतील, अशावेळी अत्यंत जागरूक व शांत राहून निर्णय घ्या. कुणाच्या बोलण्यावर एकदम विश्वास ठेवू नका.
कन्या
लाभस्थानी होणारा गुरुपुष्यामृत योग सर्वच बाबतीत लाभ, धनलाभ, मानसिक समाधान, मित्र-मैत्रिणींचे सहकार्य, मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना, शिक्षणात यश या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. परिस्थितीमुळे काही इच्छा पूर्ण होत नाहीत पण या योगावर मात्र त्या निश्चित पूर्ण होऊ शकतात. आगामी दोन महिन्यांचा कालखंड अत्यंत संमिश्र फळ देणारा आहे. समोर यश असेल पण त्याचा लाभ होईलच असे नाही. प्रेमप्रकरणात अनपेक्षित नवी कलाटणी मिळेल. काही जणांच्या आयुष्यात सोनेरी क्षण येणार असे वाटत असतानाच नको त्या घटना घडतील, सावध रहा. हा सप्ताह सर्व बाबतीत अतिशय उत्तम जाणार आहे.
तूळ
सर्व बाबतीत मोठे यश देणारा सप्ताह. अनेक इच्छा पूर्ण होतील. जर तुमचे कष्ट व प्रकल्प योग्य मार्गाने जाणार असतील त्याचे उत्तम फळ मिळेल. जीवनात काहीतरी करून दाखवेन, अशी जिद्द निर्माण कराल. तुमच्या कामाचा धडाका पाहून इतरांना देखील हेवा वाटेल. दशमस्थानात होणारा गुरुपुष्यामृत योग उद्योगात काहीतरी नवीन करून दाखवील त्याची सुरुवात या आठवडय़ापासून होईल, पण आगामी दोन महिन्यात कारखाना. वास्तुविषयक आणि कौटुंबिक जीवनात गडबड गोंधळ, गैरसमज, ताटातूट असे प्रसंग निर्माण करील. कधीही न येणारी व्यक्ती सतत येऊ लागल्याने मनात संशयाचे वातावरण निर्माण होईल. तरीही अशा व्यक्तीपासून महत्त्वाच्या गोष्टी जपून ठेवा. कितीही प्रसंग आले तरी मनातील गोष्टी कोणालाही सांगू नका.
वृश्चिक
भाग्यस्थानात होणारा गुरुपुष्यामृत योग काही नव्या संधी देईल, ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलेल. मानसिक समाधान देणाऱया घटना, नोकरी व्यवसायात उत्कर्ष, अपेक्षित व्यक्तींची गाठभेट होईल. नोकरी उद्योगात महत्त्वाचे फेरबदल कराल. तुमच्यासाठी एखादे नवीन पद निर्माण केले जाऊ शकते. बुद्धिमत्ता, हुशारी आणि चातुर्य याचा योग्य संगम साधल्यास फार मोठे यश तुमच्या पदरी पडेल, पण आगामी दोन-अडीच महिन्याचा कालखंड इतर बाबतीत शुभ असला तरी नातेवाईक, शेजारी व काही अनोळखी लोकांपासून धोका निर्माण करणार आहे. सावध राहून कोणतीही महत्त्वाची कामे करा. मनातील गोष्टी दुसऱयांना समजणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत पित्त, अपचन, डोळय़ांचे विकार यांचा त्रास.
धनु
अष्टमस्थानी होणारे गुरुपुष्यामृत योग आर्थिक बाबतीत शुभफल देईल. गंभीर आजारातून सुटका होईल. पुढील काही घटनांचे आगाऊ ज्ञान होण्याची शक्मयता आहे. पूर्वी जर एखादी महत्वाची वस्तू हरवली असेल तर ती या आठवडय़ात मिळेल. पूर्वापार चालू असलेले वैमनस्य संपुष्टात येईल. आगामी दोन अडीच महिन्याचा कालखंड आर्थिक बाबतीत सावध राहण्यास सुचवीत आहे. शेअर बाजार व तत्सम अचानक लाभणारे कोणते क्षेत्र असेल तर गुंतवणूक जपून करा. एखाद्याच्या चुकीचा सल्ला तुम्हाला उध्वस्त करू शकतो. त्यामुळे कोणी काही सांगितले तरी स्वतःच्या मनाने जे काही कराल, तेच उत्कृष्ट ठरेल. तुमच्या कामाचा पसारा आणि उरक पाहून अनेकजण तुमचे उदाहरण समोर ठेवतील इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे.
मकर
सप्तमस्थानी होणाऱया गुरुपुष्यामृत योगाचा मोठा फायदा मिळणार आहे. कोर्ट प्रकरणे, दूरचे प्रवास, भागीदारी, व्यवसाय, वैवाहिक जीवन याबाबतीत काहीतरी महत्वाचे नवे बदल जाणवतील. अपेक्षित यश पदरी पडेल. धनलाभ होतील. जोडीदाराचा उत्कर्ष असे अनुभव येतील, पण त्याचबरोबर आगामी दोन अडीच महिन्याचा कालखंड तुमची सत्वपरीक्षा पाहणार आहे. पूर्वीच्या काही चुकीच्या गोष्टी अचानक उफाळून वर येतील व त्याचा त्रास होईल. जर तुमचे व्यवहार स्वच्छ व पारदर्शक असतील तर कोणताही त्रास होणार नाही. श्रीमंतीचे प्रदर्शन करू नका, अन्यथा चोऱयामाऱया व तत्सम प्रकार घडण्याची शक्मयता आहे. काही अनपेक्षित प्रकार करून नोकरी-व्यवसाय, उद्योग बंद करण्याचा प्रसंग येईल. त्यासाठी सावधानतेने कोणतेही व्यवहार करावेत.
कुंभ
मृत्यूषडाष्टक योग होणारा गुरुपुष्यामृत योग आर्थिक बाबतीत चांगला ठरेल. दीर्घकाळ त्रास देणारे आजार संपुष्टात येतील, पण पोटाचे विकार, मानसिक संवेदना नष्ट होणे, अचानक अपघात, कामे रखडणे, गैरसमज, वादावादी असे प्रकार घडू शकतात. त्याची सुरुवात पुढील आठवडय़ापासून होईल. त्यासाठी आगामी दोन अडीच महिने सर्व प्रकारे संभाळून रहा. या कालखंडात जर नव्या नोकरीचे किंवा परदेश प्रवासाचे योग आल्यास त्या संधी सोडू नका. तुमची जीवनशैली बदलणाऱया त्या संधी असतील. मानसिक निराशेला मुळीच वाव देऊ नका. शनीची साडेसाती आहे म्हणून काहीजण भीती घालतीलण् पण त्याकडे लक्ष देऊ नका.
मीन
पंचमात होणारा गुरुपुष्यामृत योग मुलांबाळांच्या बाबतीत शुभ फलदायक आहे, प्रेमप्रकरणे, विवाह या दृष्टीने अनुकूल काळ. संतती नसणाऱयांना शुभवार्ता समजतील. आगामी दोन अडीच महिन्याचा कालखंड इतरांना कसाही असला तरी तुम्हाला मात्र सर्व बाबतीत मोठे यश देणारा आहे. बेकारांना नोकरी मिळेल. उद्योग क्षेत्रातील वाढ, आर्थिक समृद्धी, विवाह कार्य, परदेश प्रवास या सर्व बाबतीत तुमची घोडदौड चालू राहील. काही चांगल्या नोकरीच्या ऑफर्स येतील. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. निसरडय़ा व पाणथळ जागी चुकूनही जाऊ नका, गंभीर अपघाताची शक्मयता आहे, विद्युत उपकरणे जपून हाताळा.