बुधवार दि. 13 ते शनिवार दि.19 जानेवारी 2021
संक्रांतीपासून सर्व राशींच्या लोकांनी जपून रहावे!
संक्रांतीपासून रवि-शनि-गुरुसह अनेक ग्रह मकर राशीत वास्तव्य करणार आहेत, हा योग म्हणावा तितका चांगला नसतो. त्यामुळे सर्व राशींच्या लोकांनी आगामी दोन-अडीच महिने सर्व बाबतीत संभाळून राहावे. भरीसभर म्हणून कालसर्प योगाचाही प्रभाव आहे. या कालखंडात ज्या काही घटना घडतील, त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत. यासाठी मन शांत ठेवून वागा. मारामाऱया, हल्ले, दंगली, गोळीबार, भाऊबंदकी, गैरसमज, भूकंप, मोठे अपघात, जमिनीवरील सर्व दुर्घटना यासह बऱयाच गोष्टी या ग्रहयोगांवर होऊ शकतात. स्वतःच्या गाडय़ा घेऊन दूरचे प्रवास, यात्रा वगैरे करणार असाल तर सावधगिरी बाळगा. लोकांच्या हाती गाडय़ा देऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करा. कोर्टमॅटर, पोलिसकेसेस यापासून दूर राहणे चांगले. एका राशीत हे ग्रह जरी आले तरी त्यांच्यातील परस्परातील अंतर लाखो किंवा करोडो मैल असणार आहे. ग्रह जितके लांब असतील तितका त्याचा प्रभाव अधिक जाणवेल. प्रत्येकाच्या राशीत 10 आकडा ज्या स्थानी पडला असेल, तिथे त्याचे फळ दिसून येईल. मिथुन आणि कुंभ या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मृत्युंजय मंत्राचा सतत जप करावा. कुलदेवाची आराधना करावी. सर्व संकटातून सुटका व्हावी, अनिष्ट ग्रहांचा कोणताही त्रास होऊ नये, अशी प्रार्थना करावी. ज्यांना काहीही करणे शक्मय नसेल अथवा देवावर विश्वास नसेल त्या लोकांनी फक्त ओमकार जप जरी केला तरी अनिष्ट ग्रहमानाचा कोणताही त्रास होणार नाही. देवधर्म, पूजाअर्चा यापेक्षा सावधानता बाळगणे हे योग्य ठरेल. घरातून कुठेही बाहेर जाताना घरातील देवांना अथवा कुलदेवाला नमस्कार करून त्याची करुणा भाकून मग बाहेर पडा. फक्त पाच ग्रह एकत्र असते तर फारशी काळजी नव्हती, पण प्रखर कालसर्प योगात ही ग्रहस्थिती अडकल्याने त्याचा प्रभाव सहस्त्रपटीने वाढतो, त्यासाठी ही माहिती दिलेली आहे. कुणी घाबरावे म्हणून दिलेली नाही. स्वतः वाचा व तुमच्या इतर लोकांनाही सांगा, त्यांचेही बरे होईल व सर्व संकटातून सर्वांचे रक्षण होईल. या आठवडय़ातील भविष्य रवि-शनि योगावर दिलेले आहे.
मेष
आजची अमावस्या भाग्यात होत आहे. नोकरीत शुभ. उच्चपद प्राप्ती आणि पगार वाढ, अपेक्षित ठिकाणी बदली या दृष्टीने अनुकूल. सर्व कामात यश मिळेल. सतत पैसा येत राहील. शनि-गुरु-रवि काही कसोटीचे प्रसंग आणतील. कुणीतरी मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. सरकार कडून येणे रक्कम वसूल होईल, पण मानसिक त्रास होईल. आगामी तीन महिने आपणास सर्वदृष्टीने सावध राहावे लागेल. शनि-रविच्या कालखंडात देवाच्या नावाने बळी वगैरे चुकूनही देऊ नका. दारिद्रय़ाला आमंत्रण द्याल.
वृषभ
अष्टमातील अमावास्या चांगली नाही. सर्वबाबतीत काळजी घ्यावी. कोणाशी शत्रुत्व घेऊ नका. वास्तूविषयक व्यवहारात सावध रहा. भाग्यस्थानात रवि-शनि-बुध हे ग्रह यांत्रिक सामग्रीवर प्रभाव टाकणार आहेत. अपघातापासून जपावे. अचानक काही अडचणी उद्भवतील. महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. आरोग्याच्या बाबतीत बेसावध राहू नका. आगामी काही महिने सावधानता बाळगावी लागेल.
मिथुन
सप्तमस्थानी अमावस्या, हा योग वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यावर परिणाम करील. शनि-रवि-बुध-गुरु अष्टमस्थानी आहे. लोखंडासंबंधित वस्तूंचा व्यवसाय असेल तर काळजी घ्या. नवे घर घेणे अथवा नवा व्यापारी धंदा सुरू करणे टाळावे. आर्थिक बाबतीत कमतरता पडणार नाही. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. रवि-शनि हे दोन्ही ग्रह केव्हा कोणता गोंधळ करतील, हे सांगता येणार नाही. त्यामुळे बेफिकीर वृत्ती टाळा. संयम, शांतता आणि खर्चावर नियंत्रण, तसेच बोलण्या-वागण्यात एक सुसूत्रता इत्यादीचा अवलंब केल्यास ग्रहबाधेपासून त्रास होणार नाही.
कर्क
सहाव्या स्थानातील अमावस्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण करील. सप्तमात रवि-शनिसह असलेले ग्रहवैभव जीवनात समाधान निर्माण करील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तीकडून अडचणी निर्माण होतील. पैसा भरपूर मिळेल, पण विलास व चैनि वृत्तीसाठी खर्च होईल. आगामी कालखंडात प्रवास अत्यंत जपून करावा. बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार वारंवार तपासत रहावेत. एखादी किरकोळ चूक देखील मोठे नुकसान करू शकते.
सिंह
पंचमातील अमावस्या शिक्षण व मुलांच्या बाबतीत अडचणी निर्माण करील. आर्थिक बाबतीत उत्तम. राशीच्या षडाष्टकात रवि-शनि-बुध असे अनेक ग्रह आहेत. विवाहाच्या वाटाघाटी चुकूनही करू नका. मन भरकटणाऱया गोष्टी घडतील. गुप्तशत्रूंचे भय राहील. त्यांच्या कारवायाकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवनात वादावादी होईल. पती-पत्नी यांनी परस्परांच्या अपरोक्ष कोणतेही व्यवहार करू नयेत, अन्यथा गैरसमजाला मोठा वाव मिळेल.
कन्या
अमावस्या वाहन व वास्तुदुरुस्तीसाठी बराच खर्च करण्यास भाग पडेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग. पंचमातील रवि-शनि-बुधासह अनेक ग्रहांची मांदियाळी मुले-बाळे व आरोग्याच्या बाबतीत चांगली नाही, पण वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत जर काही मोठी कामे असतील तर ती आठवडय़ात होऊ लागतील. कारखानदारी असेल तर अपघात व दुर्घटना यापासून जपा. मुलाबाळांच्या हाती वाहन देऊ नका.
तूळ
अमावस्येमुळे मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात. काहीजणांच्या ओळखीमुळे अडलेल्या कामाला गती मिळेल. चतुर्थात रवि-शनि-बुध ग्रह आहेत. अनैतिक मार्गाने धनार्जन करण्याच्या मागे लागू नका. घरादाराचं काम चालू असेल तर रात्रीच्या वेळी जमीन वगैरे खोदू नका. आगामी दीड महिन्यात राग, द्वेष, मत्सर, खुनशीवृत्ती यापासून दूर राहा. किरकोळ वादातून गंभीर प्रसंग निर्माण होतील. त्यासाठी सावधानता आवश्यक.
वृश्चिक
धनस्थानी अमावस्या, म्हणजे आर्थिक बाबतीत काहीतरी गोंधळ समजावा. हिशोब व्यवस्थित ठेवा. ऑनलाईन खरेदी करणार असाल तर मोठी फसवणूक होऊ शकते. रवि-शनि-बुधासह अनेक ग्रह पराक्रमात आहेत. पाठीचा कणा, पाय दुखणे, कानाचे विकार तसेच वाहन यासाठी त्रासदायक आहे. आर्थिक बाबतीत ग्रहमान अतिशय उत्तम आहे. कोणत्या क्षेत्रात असाल तरी त्यात बऱयापैकी पैसा मिळेल.
धनु
तुमच्या राशीतील अमावस्या काही कामे विलंबाने करेल. कोणताही व्यवसाय सध्या सुरू करू नका. धनस्थानी रवि-शनिसह अनेक ग्रह बसलेले आहेत. त्यामुळे घाईगडबडीत काहीतरी गोंधळ होऊ शकतो, निर्णय चुकतात, विनाकारण हातून पैसा जातो. त्यासाठी आपण सावध राहावे. हा कालखंड दोन-अडीच महिन्यांचा आहे. शापितयोगही सुरू आहेच. कोणत्याही कामात स्वतः लक्ष घातले तरच यशस्वी व्हाल.
मकर
बाप-लेक दोघेही बलाढय़ व तेही एका राशीत, त्यामुळे मतभेद, संघर्ष, वाद-विवाद, नुकसान, मारामाऱया असे प्रकार घडू शकतात. आर्थिक बाबतीत काहीतरी गोंधळ होऊ शकतो. नोकरीवर गदा येऊ शकते. त्यामुळे आगामी दोन-अडीच महिने आपण सावध राहावे. कालसर्प योगाचा शापीत प्रभावही सुरू आहे. त्यामुळे हाती घेतलेली कामे होतीलच या भ्रमात राहू नका. काम लहान-मोठे असो, त्याचा दहावेळा विचार करूनच त्यात हात घालावा.
कुंभ
लाभातील अमावस्या नोकरी-व्यवसाय इत्यादी बाबतीत उत्तम आहे, पण शनि-रवि सह चार ग्रहांची युती अनिष्ट योगात आहे. त्यामुळे अचानक मोठे खर्च उद्भवतील. पूर्वीची काही जुनाट प्रकरणे पुन्हा डोके वर काढण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावध राहूनच कामे करावीत. कोण कोणत्या वेळी तुमचा गैरफायदा घेईल सांगता येणार नाही. अति दूरचे प्रवास शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा.
मीन
दशमातील अमावस्या अनेक बाबतीत शुभ फलदायी आहे. मनातील अधिक गोष्टी पूर्ण होतील. तुमच्या कर्तबगारीला योग्य वाव मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. लाभातील रवि-शनि युती इतर बाबतीत चांगली असली तरी फसवणूक, दगाफटका, अपघात, कागदोपत्री घोटाळा या दृष्टीने त्रासदायक आहे. आगामी दीड महिन्याचा कालखंड तुम्हाला सावध राहण्यास सुचवित आहे. काहीवेळा त्यापेक्षा आपल्या लोकांची नजर लागू शकते असे अनुभव येतील.