रवि, शनिचा त्रास टाळण्यास रथसप्तमीचे व्रत करा
बुध. दि. 29 जाने. ते 4 फेबु. 2020
सध्या रवि, शनि मकर राशीत आहेत. या दोन ग्रहांची युती शुभ मानली जात नाही. नोकरी व्यवसाय, आरोग्य बिघडणे, अपघात, ताटातूट, सरकारी प्रकरणात अडकणे, पिता- पुत्रात कडाक्मयाचे मतभेद, यासह अनेक अनिष्ट घटना अशा योगावर घडतात. ऐनवेळी नको त्या व्यक्ती घरी येऊन त्रास देतात किंवा नको असलेल्या फोनकॉलचा भडिमार होतो. वैवाहिक जीवनात तरी नको ते प्रसंग येतात. अशावेळी मन शांत ठेवून निर्णय घ्यावेत. कितीही कठीण प्रसंग आले तरी मनाचा संयम ढळू नये. अनोळखी व्यक्ती, फिरते विपेते, घरी येऊन नको त्या वस्तू गळी घालणाऱयांपासून सावध रहावे. आपली बाजू बरोबर असली तरी पैशासाठी काहीजण आपल्या बुद्धिचातुर्याचा उपयोग करून केर्टप्रकरणे उलटवू शकतात. साध्या सुध्या आजारासाठी भरमसाठ फी आकारणी केली जाऊ शकते. या रवि, शनि दोषासाठी रथसप्तमीपासून रोज सूर्यनारायणाची उपासना करून काही विशिष्ट स्तोत्रे वाचल्यास या रवि- शनिच्या अनिष्ट प्रकोपापासून बचाव करता येतो. येत्या 1 तारखेला रथसप्तमी आहे. त्या दिवशी अरुणोदयाला स्नान करून सूर्याची उपासना करावी. डोळय़ांचे विकार असतील तर या दिवसांपासून रोज श्री चाक्षुषोपनिद स्तोत्र 12 वेळा वाचण्यास प्रारंभ करावा. आम्ही लोकांशी चांगले वागूनही लोक सरळ वागत नाहीत, त्यांच्यावेळी मदत करूनही आमच्यावेळी मात्र ते येत नाहीत. काही हवे असेल तर समोर गोड बोलतात व मागून टोमणे मारत असतात. कितीही चांगले वागा लोक आम्हाला अनुकूल नाहीत, अशा तक्रारी सतत ऐकू येत असतात. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक पेरु खरेदी करताना गोड आहे का विचारतात पण मीठ लावूनच खातात. लोकांचा स्वभाव बदलणे आपल्या हातात नसते. प्रत्येकाला काही ना कारणे असतातच. आपण जसे वागतो तसे जग वागत असते. लोकांना आपण सुधारू शकत नाही, पण स्वत:ला सुधारू शकतो. ज्यावेळी लोक आपल्यामागून बोलतात, जळफळतात, मत्सर करतात, त्यावेळी तुमच्याकडे काही तरी चांगले गुण असतात व त्यांच्याकडे ते नसतात हे कारण असते. समोर येऊन बोलण्याचे धाडस नसणारेच मागे बोलत असतात. तुम्हाला मनस्ताप व्हावा, तुमचे मन चलबिचल व्हावे, यासाठीच हे लोक तसे वागत असतात. पण त्याचबरोबर आपले काय चुकते हे पहाणेही तितकेच महत्त्वाचे असते. शक्मयतो कुणाच्याही मागे त्याच्याविषयी वाईट बोलू नये अथवा त्याची निंदा करू नये. कारण ‘जे कराल ते भराल’ या निसर्गनियमाप्रमाणे आपण जर कुणाविषयी बरे-वाईट बोललो तर ते आपल्यावरच उलटते. सर्वांगीण प्रगती करून घ्यायची असेल तर चांगल्या कार्याबद्दल मत्सराने जळण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्यास शिका. ज्यावेळी तुम्ही चांगला भाव बाळगाल, त्याच क्षणापासून तुमच्या भाग्योदयास सुरुवात होईल. कुणी शत्रूही राहणार नाहीत. शत्रू निर्माण होतात, ते आपल्याच चुकीमुळे हे लक्षात ठेवावे. हा रथसप्तमीचा संदेश आहे. त्या दिवशी सूर्याचे मिळेल ते स्तोत्र वाचा. सूर्य जसा सर्वांवर समभाव दृष्टी ठेवतो, तसे वागण्याचा प्रयत्न करा. सर्व समस्या मिटतील. रथसप्तमीला केलेले सूर्याचे पूजन घराण्यातील अनेक दोष नष्ट करते. तुमचे जे कुणी पुरोहित, भटजी असतील त्यांच्याकडून रथसप्तमीचे पूजन करून घ्या. हे पूजन व्यवस्थित झाल्यास भाग्य उजळायला वेळ लागणार नाही.
मेष
रवि, शनि युती दशमात, हा लाभदायक योग आहे. विद्येत अपेक्षेप्रमाणे यश. मानसिक सुख चांगले राहील. जुनी नोकरी सुटली असेल तर नवीन नोकरी मिळेल. भावंडांची मदत मिळवून कार्यात यश. शिक्षणासाठी परदेश योग. पण प्रत्येक कामात विरोध जाणवेल. त्यासाठी सावध राहून कामे केल्यास चांगले. या आठवडय़ात लोकांच्या बोलण्यावर बारीक लक्ष ठेवा.
वृषभ
भाग्यात रवि, शनि युती जे काही घडेल ते आपल्या कर्मामुळे हा मूलमंत्र लक्षात ठेवा. शिक्षणात मध्यम यश. एखाद्या चांगल्या व्यक्तिकडून सल्ला मिळाल्यास तुमच्या भाग्योदयाची सुरुवात असू शकते. वाहन अपघात, चोरी, खोटे आरोप येणे, नको त्या मार्गाकडे मन वळणे, आरोग्यात बिघाड असे प्रसंग आल्यास सूर्याची उपासना करा.
मिथुन
रवि, शनि युती अष्टमात, हा चांगला योग नसतो. आरोग्य सांभाळा. स्वत:ची जागा होण्याचे योग. अपेक्षित धनलाभ, दानधर्मात वेळ जाईल. व्यवसायात मोठे लाभ होतील. पण मानहानी आरोग्य बिघडणे, ताप, वगैरेपासून जपावे. सरकारी कामे अडथळय़ाने होतील. एखाद्या मोठय़ा कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. नवे घर बांधाल. संगीतात यश मिळेल. कुटुंबात मंगलकार्ये होतील.
कर्क
सप्तमस्थानी रवि, शनि युती चांगली नसते. नको ते विषय डोक्मयात घोळत राहिल्याने सांसारिक जीवनात कटुता. नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास केल्यास मोठा पैसा मिळेल. सरकारी कृपा लाभेल, कुटुंबात कल्याण होईल. लक्ष्मीची प्रसन्नता मिळेल. गेलेली इस्टेट परत मिळेल. गाडय़ा खरेदी कराल. शस्त्रामुळे इजा, गोळीबार, दगडफेक यापासून जपावे.
सिंह
‘विषाला विष मारते’ या म्हणीनुसार रवि, शनि युती काही संकटाना आरोप दूर करील. प्रवास होतील, नव्या नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. पण जागेसंदर्भात घोटाळे माजतील. पोलीस केसीस, शत्रुत्व यामुळे मनस्ताप, आरोग्य सुधारेल. रद्द झालेला विवाह पुन्हा जुळण्याची शक्मयता. वाहन खरेदी कराल. कामातील काही चुकामुळे त्रास होण्याची शक्मयता.
कन्या
नोकरी व्यवसायासाठी मुलाखतीत यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाईने यश मिळेल. पडीक जागा खरेदी कराल. मुलाबाळांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नको ती विद्या शिकण्याचा विचार असेल तर तो सोडा. प्रवासात अडचणी, वाहनात बिघाड, असे प्रकार घडतील. महत्त्वाच्या ठिकाणी जाताना किमती वस्तुची काळजी घ्यावी. प्रमाणाबाहेर खर्च होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल.
तुळ
चतुर्थात रवि, शनि म्हणजे कौटुंबिक सौख्याला सुरुंग म्हणता येईल. कामाचे स्वरुप बदलल्यास उद्योग व्यवसायात चांगले यश मिळेल. मोठे प्रवास टाळावेत. महत्त्वाच्या व्यवहारात काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करताना त्याचे फायदे-तोटे तपासून घ्या. घाई-गडबड नको. लग्न समारंभ व तत्सम ठिकाणी जाण्याचा प्रसंग आल्यास किमती वस्तू विसरण्याची शक्मयता आहे.
वृश्चिक
पराक्रमात रवि, शनि युती सर्व कामात धाडसाने यश देईल. कार्यक्षमता वाढेल. महत्त्वाच्या कामानिमित्त दूरवरचे प्रवास होण्याची शक्मयता. आर्थिक व्यवहार खोळंबले असतील तर ते पूर्ण होतील. जागा अथवा जमिनीचे व्यवहार करताना काळजी घ्यावी. भागीदारी व्यवसाय करणार असाल तर सावध राहूनच करा. कोणत्या तीर्थयात्रेला, देवस्थानला गेल्यास तेथे नियमभंग करू नका.
धनु
रवि, शनि युतीमुळे कोणताही अतिरेक करू नका. बेफिकीरपणा अंगलट येईल. आजार वगैरे झाल्यास औषधोपचार दुर्लक्ष करू नका. या सप्ताहात जर काही लाभाच्या संधी आल्यास त्या फायदेशीर ठरतील. घातकी वस्तू घरी आणू नका. बाहेरील बाधेचा परिणाम होऊ शकेल. आर्थिक दृष्टय़ा हा आठवडा चांगला जाईल.
मकर
रवि, शनि तुमच्या राशीत हा योग मानसिक गोंधळ दर्शवितो. नोकरी, आरोग्य, शिक्षण, मुलाबाळांचे सौख्य व धनलाभ या बाबतीत अनुकूल वातावरण राहील. जे काम हाती घ्याल ते यशस्वी कराल. दूरवरचे प्रवास होण्याचे योग. काही जुन्या मित्रांची गाठभेट होईल.
कुंभ
रवि, शनि अशुभ स्थानी आहेत. पोलीस केसेस, मध्यस्थी, अवैध व्यवहार यापासून दूर रहा. प्रति÷sला धोका व वास्तूदोष निर्माण करणारे ग्रहमान आहे. बाहेरील कोणतीही जुनी वस्तू आणताना त्याच्याबरोबर अनिष्ट शक्ती येणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिकदृष्टय़ा चांगले योग आहेत. एखादे मोठे घबाड हाती लागण्याची शक्मयता आहे.
मीन
रवि, शनि लाभात असल्याने ‘हिमते मर्दा’ या म्हणीनुसार जे धाडस कराल त्यात यश मिळवाल. कामाची गोडी निर्माण होईल. संगीत, गायन, वादन, चित्रपट यात मोठे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. पैसा अडका, मानसन्मान, वाहन, घरदार या सर्व बाबतीत यशस्वी ठराल. पण कामे रेंगाळत ठेवू नका.