हाती पैसा का टिकत नाही कारणे पहिला भाग
बुध. दि. 5 ते 11 फेब्रुवारी 2020
आम्ही इतके कष्ट करतो, पण हाती पैसा टिकत नाही, अशी भाषा अनेकांच्या तोंडी असते. प्रचंड उदाळपट्टी, नको तेथे खर्च, फाजिल प्रति÷ा, अनावश्यक वस्तुंची खरेदी, भरमसाठ वैद्यकीय खर्च, रोजचे प्रचंड खर्च, कर्जाचे हप्ते तसेच इतरांवर छाप मारण्यासाठी पदरचा पैसा खर्चून प्रदर्शन करणे, अशी अनेक कारणे असू शकतात. लोक नको तेथे खर्च करतील, पण एखाद्या मुक्मया प्राण्याला खाऊ घालणे, यांच्या जीवावर येते. वास्तविक फालतु खर्च करण्यापेक्षा मुक्मया प्राण्याला खाऊ घातल्याने साऱया देवदेवता खूष होतात, लक्ष्मी प्रसन्न होते, उद्योगधंदे जोरात चालतात, नोकरी व्यवसायात उर्जितावस्था येते, आपले पूर्वार्जित दोष नष्ट होतात, जीवावरची संकटे टळतात, हाती पैसा खेळू लागतो, निष्कारण त्रास देणाऱया व बदनाम करणाऱया शत्रूच्या मुसक्मया दैवीशक्तीने आवळल्या जातात. मुक्मया पशु -पक्ष्यांच्या आशीर्वादात फार मोठे सामर्थ्य असते. तसेच त्यांचा शापदेखील लाखोपटीने बाधतो, हे अनेकांना माहीत नसेल. पैसा न टिकण्यामागे अनेक कारणे असतात, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतघ्नता. संकटात असताना एखादी व्यक्ती देवाप्रमाणे आपल्याला मदत करते, त्याच्या मदतीमुळे मोठमोठे उद्योग उभारले जातात, पण त्याच्याविषयी, त्याच्या मागे नको ते बोलणे, त्याच्या गरजेला उपयोगी न पडणे, ऐनवेळी हात वर करणे, कागदोपत्री घोडे नाचवून त्याची फसवणूक करण,s व त्याला रस्त्यावर आणणे, त्याला शिव्याशाप देणे, अशा प्रकारांमुळे लक्ष्मीचा कोप होतो व वेळ फिरताच काहीतरी नैसर्गिक प्रकोप अथवा दैवीघटना घडून जेवढे कमावले ते सर्व नष्ट होऊन जाते. या दैवीकोपापुढे कुणाचे काहीही चालत नाही. आज ना उद्या कर्माचे फळ भोगावे लागते. जेथे सायकलने काम चालू शकते, तेथे महागडय़ा गाडय़ा कशाला वापरायच्या? सायकलने गेल्यास लोक काय म्हणतील ही भीती. पूर्वीच्या काळी कुणी सायकल घेतली की लोक त्याच्याकडे कौतुकाने पहायचे. आजकाल दिवस बदलले आहेत. सायकल सोडाच, महागडी कारगाडी अथवा विमानाने फिरलात तरी कुणी ढुंकूनही पहात नाहीत. पेट्रोल महाग झाले, म्हणून लोकांनी गाडय़ा वापरणे बंद करून सायकली काढल्या का? लोक जीमला जाऊन तेथे हजारो रुपये खर्चून सायकल चालवतात, पण रस्त्यावर चालवायला मात्र यांना लाज वाटते, प्रति÷ा आडवी येते. केरळमधील एक जिल्हाधिकारी कोणताही पोलीस फौजफाटा अथवा रक्षक न घेता अजूनही सायकलनेच कामावर जातात. इंग्लंड, अमेरिका, जपान, चीनचे राजे, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष व मोठमोठे उच्चपदस्थ अधिकारी, सर्व सुखसोयी असतानाही सायकलने फिरतात. त्यांचे हे गुण आपण का घेत नाही? खोटय़ा प्रति÷sमागे लागल्याने पुढे ज्यावेळी वाईट परिस्थिती येते, त्यावेळी यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. अजूनही शहाणे व्हा, खोटय़ा प्रति÷sमागे लागू नका, पैसा आज आहे, उद्या नसेल. त्यावेळी तुम्ही काय करणार आहात?
मेष
मंगळ भाग्यात, कडक नक्षत्रात आलेला आहे. वाहन जपून चालवा. पारंपरिक पवित्र रुढींचे पालन केल्यास या मंगळाचा चांगला अनुभव येईल. देवधर्माबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोनही चांगला ठेवा, म्हणजे अपयश येणार नाही. व्ययस्थ शुक्राच्या कृपेमुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. भाग्योदयाची दारे उघडतील. पण रवि, शनि योगामुळे नोकरी व्यवसायात नको ते संकट येण्याची शक्मयता आहे.
वृषभ
राशीस्वामी लाभात शुभ आहे. धनलाभ, विवाह, संततीप्राप्ती, शिक्षणात यश, नोकरी व्यवसायात प्रमोशन या बाबतीत उत्कृष्ट अनुभव येतील. अष्टमस्थानी कडक नक्षत्रात मंगळ आलेला आहे. भावंडांच्या बाबतीत काळजीचे प्रसंग. समोरुन येणाऱयाचा भरवसा नसतो. त्यामुळे तुम्ही सावधानतेने वागले पाहिजे. सर्व तऱहेच्या दुर्घटनेपासून जपावे लागेल. डोळय़ांवर ताण पडणारी कामे करू नका.
मिथुन
दशमात शुक्र म्हणजे श्रीमंती, ऐषआराम व चांगली नोकरी मिळण्याचा दुग्धशर्करा योग. सप्तमस्थानी मंगळाचे आगमन नवनव्या समस्या निर्माण करील. निष्कारण शत्रुत्व ओढवेल. पूर्वी जर कुणाशी मतभेद झालेले असतील तर ती प्रकरणे बाहेर निघतील. यासाठी मंगळ हटेपर्यंत मन शांत ठेवा. धनलाभाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे, पण पैसा टिकणार नाही.
कर्क
भाग्यात शुक्र अतिशय चांगली फळे देईल. सहाव्या स्थानी कडक नक्षत्रात मंगळ आहे. आर्थिक बाबतीत चांगले योग. धार्मिक व साधूप्रवृत्तीच्या लोकांची गाठ पडेल. लिखाणाशी संबंध असेल तर शब्द विषापेक्षाही अधिक प्रखर परिणाम करतील. लिखाणात शब्द जपून वापरा. एखाद्याचे भले करताना त्याची पूर्ण माहिती काढून मगच निर्णय घ्या.
सिंह
अष्टमात शुक्र व मंगळ पंचमात आहे. विचित्र प्रेमप्रकरणे निर्माण होतील. व्यवहारी बुद्धीने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील. पण नातेवाईकांचा चुकीचा सल्ला व काही कारवायांमुळे गोत्यात येण्याची शक्मयता आहे.आर्थिक बाबतीत ग्रहमान अतिशय चांगले आहे. आर्थिक प्रगती सुरू होईल. काही बाबतीत मध्यस्थी केल्यामुळे निष्कारण शत्रुत्व ओढवेल.
कन्या
सप्तमातील शुक्र चतुर्थात आलेल्या मंगळामुळे जुन्या ओळखीचे रुपांतर प्रेमप्रकरणात होईल. विवाहाच्या वाटाघाटी सुरू होतील. कौटुंबिक चिंता वाढतील. आई व घरातील इतर स्त्रियांच्या बाबतीत कडाक्मयाचे मतभेद संभवतात. जर तुमचे घर दक्षिण दिशेला असेल तर जरा काळजी घ्या. घरात धार्मिक वातावरण ठेवा, म्हणजे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत. वास्तुचे कोणतेही व्यवहार करताना सावध रहा. बनावटगिरी अथवा आर्थिक फसवणूक होऊ शकेल.
तूळ
शुक्र चांगला असल्याने काही नव्या विद्या शिकण्याची संधी मिळेल. पराक्रमात कडक नक्षत्रात मंगळाचे आगमन म्हणजे अपघात, भांडण, तंटे पण त्याचबरोबर सर्व कार्यात हमखास यश म्हणता येईल. धनलाभ व भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. प्रापंचिक जीवन सुखी राहील. आर्थिक स्थिती व आरोग्य उत्तम राहील. मोबाईल कुणाच्या हाती देऊ नका. दुरुपयोग होण्याची शक्मयता आहे. आपले बोलणे कुणी रेकॉर्डिंग करू नये, यासाठी जपावे लागेल.
वृश्चिक
पंचमात आलेल्या शुक्रामुळे देवाधर्माकडे ओढा राहील. घरी मंगलकार्ये होण्याची शक्मयता. या शुक्राच्या कालखंडात लग्न अथवा मूलबाळ झाल्यास ते अतिशय भाग्यवान असेल. धनस्थानी कडक नक्षत्रात मंगळ आहे. धनलाभ, प्रवास या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल, पण खर्चही वाढतील. जुनी येणी वसूल होतील. महत्त्वाचे आर्थिक काम होईल. शनि, मंगळाचा अशुभ योग अपघातदर्शक आहे.
धनु
चतुर्थांत शुक्र व राशीत आलेल्या मंगळामुळे लक्ष्मीयोग होत आहे. कोणताही नोकरी व्यवसाय जोरात चालेल. घरदार, वाहन अथवा अत्यंत किंमती वस्तू खरेदीचे योग. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. कर्ज असेल तर ते फिटेल. महत्त्वाचे काम या आठवडय़ात होईल.आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. काही कारणांमुळे दूर गेलेल्या व्यक्तींची भेट होईल.
मकर
तृतीयात शुक्र असल्याने पत्रव्यावहारात यश. नातीगोती सुधारतील कोणतेही प्रवास लाभदायक. राशीतील रवि, शनि अत्यंत प्रखर होत आहेत. विरोध वाढला तरी मोठे यशही मिळवाल. तातडीने महत्त्वाची कामे करून घ्यावीत. मंगळ कडक नक्षत्रात असल्याने आर्थिक अडचणी जाणवतील. खर्च वाढतील. कोर्टप्रकरणे उद्भवतील. नको त्या मार्गाने पैसे कमविण्याचा मार्ग पत्करू नका. ग्रहमान अनुकूल नाही सांभाळून रहा.
कुंभ
धनस्थानी शुक्र व लाभस्थ मंगळ हा कुबेरयोग मानला जातो. मोठय़ा प्रमाणात धनलाभ होतील. सर्व आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील. पण मित्रमंडळींच्या काही कारवायांमुळे गोत्यात येण्याची शक्मयता आहे. हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय चांगला ठरेल. नोकऱयाचे कॉल येतील. तसेच लग्नासाठी तीन-चार स्थळांची ऑफर येईल. मंगळ, गुरु युतीयोग असल्याने या मंगळाचा कालखंड तुम्हाला अतिशय चांगला व लाभदायक ठरेल.
मीन
राशीतील शुक्र व दशमात आलेला मंगळ, मोठय़ा प्रमाणात यश देणारा हा योग आहे. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक व योग्य मार्गाने चालू असतील, तर गडगंज संपत्ती मिळवाल. स्वत: केलेले कोणतेही काम चांगले असते व त्यात जर आत्मविश्वास असेल तर ते सोनेरी फळही देऊ शकते, असा अनुभव येईल. काही शारीरिक दोष असतील तर ते दूर होतील.