बुधवार दिनांक 26 मे ते मंगळवार दि. 1 जून 2021
जे काही मिळाले आहे त्यावर समाधान माना!
पूर्वीच्या काळी एखाद्या माणसाने सायकल विकत घेतली की, लोक त्याला फार मोठा माणूस समजायचे. त्याच्याकडे कौतुकाने पाहात असतं. त्यातच जर एखाद्याकडे कार वगैरे असेल तर मग विचारायलाच नको! आजकाल कार सोडा विमानाने कोणी फिरत असेल तरीही त्याच्याकडे कोणीही ढुंकूनही पाहत नाहीत मग मोठेपणा कशाला दाखवायचा? ज्याच्याकडे सायकल आहे तो स्कूटर किंवा मोटरसायकल पाहिजे म्हणतो. साधी कार असेल तर रोल्सराईस असावी व तीही गाडी असेल तर विमान असावे. साधी नोकरी असेल तर ऑफिसर कधी होईन व मोठा अधिकारी असेल तर मालक कधी होईन अशी महत्त्वाकांक्षा प्रत्येकजण बाळगत असतो, व लोभ वाढला की नको त्या मार्गाने पैसे कमावण्याकडे वृत्ती वळते. व शेवटी मनुष्य समाधान हरवून बसतो. पण आपल्यापेक्षाही कित्येक लोक गरीब आहेत, आपल्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाही, असा विचार कोणीही करीत नाहीत. बँक अथवा सरकारी कर्मचारी अधिकारी पहा, त्यांना 50 ते 80 हजारापर्यंत पगार असतो, तरीही पैसा पुरत नाही म्हणून ते रडत असतात. ज्यांच्याकडे कमीत कमी पैसा असतो, त्यांच्या गरजा कमी असल्यामुळे ते सुखात असतात असे दिसून येते. प्रत्येकजण आपापल्या नशिबानुसार सुखात अथवा दुःखात असतो. त्यामुळे कुणीही कुणाशी तुलना करू नये. देव कुणावरही अन्याय करीत नाही. प्रत्येकाला संधी देतो, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र आपल्याला समजले पाहिजे. भरपूर कमाई असूनही जर पैसा पुरत नसेल, तर काय चुकत आहे ते पहा. कुठे काटकसर करता येईल त्याचा अंदाज घ्या. शेवटी जीवन तुमचे आहे. तुम्ही कार अथवा विमानाने फिरलात तर तुमचे कुणी कौतुक करणार नाही अथवा सायकलने फिरलात तर तुमच्यावर कोणी टीका करणार नाही. कारण हल्ली दिवस इतके भरभर जात आहेत की, कुणालाही दुसऱयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसंपत्तीमुळे सुखी जीवन निश्चितच जगता येऊ शकते. फक्त आपली मनाची तयारी पाहिजे. मी जर साधे वागलो तर लोक काय म्हणतील? असा विचार चुकूनही करू नका. अनेक गर्भश्रीमंतांच्या जन्म पत्रिकेतील ग्रहमान पाहता त्या लोकांना सर्वकाही असूनही त्यांना अजिबात समाधान नाही. कुठेतरी काहीतरी कमतरता निश्चित जाणवते असे दिसून येईल. सतत इतरांशी तुलना करीत रहाल तर तुम्हाला कधीही मनःशांती मिळणार नाही. त्यासाठी परमेश्वराने आपल्याला जे काही दिलेले आहे, तो त्याचा प्रसाद समजून आनंदाने राहा. सर्वात मुख्य म्हणजे व्यसन आणि चैनीवृत्तीपासून दूर राहा. जमाखर्च वेळच्यावेळी तपासत जा. जिथे सुईचे काम असेल तेथे दाभण वापरू नका, वर्षभर हा प्रयोग करून पहा, निश्चितच आनंदी व समाधानी व्हाल.
मेष
चंद्र-केतू योगावर आणि चार ग्रहांच्या प्रतियोगात पौर्णिमा होत आहे. अशावेळी काही कारणाने संशयी वातावरण निर्माण होते. त्यासाठी मनात काहीही किंतु न ठेवता कामे करीत राहा. अशा योगावर निष्कारण संशय अथवा खोटे आरोप येण्याची शक्मयता असते. नदीकाठच्या क्षेत्रातील प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत काही आडाखे चुकू शकतात. तसेच कमाई व खर्च यांच्या ताळेबंदही व्यवस्थित राहणार नाही. त्यासाठी सर्व बाजूंचा विचार करूनच महत्त्वाची कामे करावीत.
वृषभ
चंद्र-केतू योगावर होत असलेली पौर्णिमा वैवाहिक जीवनात किरकोळ वादंग निर्माण करील. संशयाला वाव मिळेल असे कोणतेही कृत्य करू नका. आर्थिक व्यवहारात अडचणी जाणवल्या तरी आगामी कालखंडात झालेली सर्व तूट भरून निघेल. नवीन काही करण्यापेक्षा हातात असलेली जुनी कामे संपविण्याचा प्रयत्न करा. भागिदारी व्यवसाय असेल तर बेसावध राहू नका. कोण काय बोलतो याकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल.
मिथुन
चंद्र-केतू योगावर होणारी पौर्णिमा आर्थिक बाबतीत चांगली असली तरी काही व्यक्तींच्या बाबतीत अतिशय विचित्र अनुभव येतील. त्यामुळे कोण कसे आहे याची पारख करूनच त्यांच्याशी वागा. लॉकडाऊनमुळे खोळंबलेले काही व्यवहार सुरू करण्यास हरकत नाही. आरोग्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नका. तसेच केवळ पुस्तकी ज्ञानाने अथवा स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका. उपवर वधू-वर असतील तर विवाहसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. हौसमौज, पाटर्य़ा यातून अमली पदार्थ पोटात जाण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावध राहा. या आठवडय़ात कागदपत्रावर सही करण्याचे प्रसंग येतील.
कर्क
बुधाचे बाराव्या स्थानी झालेले आगमन गूढ विषयात मोठे यश देईल. मंत्रतंत्र शिकण्यास उत्तम काळ. विलासीवृत्ती वाढेल. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. पंचमातील चंद्र-केतू योग अनैतिक बाबीकडे मन वळवण्याची शक्मयता आहे. प्रेम प्रकरण्यापासून जास्तीत जास्त दूर राहा. सट्टा, लॉटरी, शेअर बाजार अथवा तत्सम अचानक धनलाभ घडवून देणाऱया योजना असतील तर त्यात सावधगिरीने गुंतवणूक करा. अनुभव नसेल तर फार मोठे नुकसान होऊ शकते.
सिंह
काहीवेळा एखादी व्यक्ती सहज काहीतरी बोलून जात आहे आणि कर्मधर्मसंयोगाने त्या गोष्टी खऱया होतात असे अनुभव या आठवडय़ात येतील. चतुर्थातील चंद्र-केतू योगावरील पोर्णिमा राहत्या वास्तूतील काही घटनांमुळे किरकोळ मतभेद निर्माण करील. नोकरीविषयक मात्र अतिशय चांगले योग. बढती, बदली, स्थलांतर यासाठी प्रयत्न करा. वरि÷ मंडळींची कृपा राहील. काहीजणांना अचानक महत्त्वाची पदे अथवा प्रति÷ा मिळण्याचे योग. आर्थिक व्यवहार मात्र अत्यंत जपून करावेत.
कन्या
राशीस्वामी बुध दशमात येत आहे. महत्त्वाची व्यवहारी कामे पूर्ण होतील. बुद्धिमत्ता व कल्पकतेच्या जोरावर अवघड कामेही हातावेगळी करू शकाल. कलाक्षेत्र, साहित्य व क्रीडाक्षेत्रात उत्तम प्राविण्य मिळेल. चंद्र-केतू योगावरील पौर्णिमा पराक्रम स्थानी होत आहे. शेजारी व नातेवाईक यांच्याकडून खोटे आरोप अथवा संशयी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी बेसावध राहू नका. शिवाय मनातील गुप्त गोष्टींचा कोठेही गौप्यस्फोट होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबातील पूर्वीचे दिवस विसरून नव्या उत्साहाने नवी कामे सुरु करा. त्यात चांगले यश मिळेल.
तूळ
धनस्थानी चंद्र-केतू योगावर होणारी पौर्णिमा काही व्यवहारात संशयास्पद वातावरण निर्माण करील. त्यामुळे पैशाची देवाण-घेवाण जपून करा. बोलण्यातून लिहिण्यातून कुठेही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. लग्नाच्या वाटाघाटी सुरू असतील तर प्रतिपक्षाच्या काही अटी त्रासदायक ठरू शकतील. शिक्षण, आरोग्य, नोकरी-व्यवसाय या बबतीत ग्रहमान अनुकूल आहे. पण तरीही अष्टमातील राहूकडे दुर्लक्ष करू नका. किरकोळ चुका देखील गंभीर स्वरूप धारण करू शकतील.
वृश्चिक
तुमच्या राशीत केतू व तेथेच पौर्णिमा आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या काही गोष्टीत निर्णय घेताना चलबिचल होईल. त्यामुळे चारचौघांत सल्ला घेऊनच विचारविमर्श करा. नोकरी-व्यवसायात अचानक काही व्यक्ती बदलतील. भागिदारी व्यवसाय असेल तर कुठेही गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत काळजीचे कारण नाही. थोरामोठय़ांचे काही विचार अमलात आणल्यास महत्त्वाची कामे होतील.
धनु
राशीच्या सप्तमात आलेल्या बुधामुळे वैवाहिक बाबतीत चांगली घटना घडेल. व्यवहारकुशल व सुस्वभावी अशा व्यक्तीशी लग्न जुळण्याची शक्मयता. व्यापार-उद्योग क्षेत्राशी संबंधित असेल तर अडलेली महत्त्वाची कामे होऊ लागतील. आर्थिक व्यवहार गती घेऊ लागतील. चंद्र-केतूवर होणारी पौर्णिमा शत्रूंचा प्रभाव वाढविल. त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. तसेच तुमचे व्यवहार कितीही स्वच्छ व पारदर्शक असले तरी त्याचे कुठेही प्रदर्शन करु नका. अथवा त्यातील गुपिते लोकांना सांगू नका. बाकी इतर बाबतीत हा सप्ताह उत्तम आहे.
मकर
राशीच्या सहाव्या स्थानी येणारा बुध आर्थिक व्यवहारात मोठी उडी घेण्यास भाग पा डेल. काही कारणाने दुसऱयांच्या हाती गेलेले महत्त्वाचे व्यवहार अथवा कंत्राटे तुम्हाला परत मिळण्याची शक्मयता दिसते. चंद्र-केतू योगावर आलेली पौर्णिमा मुलाबाळांच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडवील, अथवा त्यांच्या जीवनाला काहीतरी निराळे वळण मिळवून देईल. मित्रमंडळी अथवा नातेवाईक यांच्याकडून काहीतरी लाभ होऊ शकतात. जर एखादी व्यक्ती हरवली असेल तर तुमच्या प्रयत्नामुळे ती परत येऊ शकते.
कुंभ
दशमात चंद्र-केतू योगावरील पौर्णिमा नोकरी व्यवसायात स्थानपालट, खांदेपालट अथवा दुसऱया शाखेत बदली किंवा कामाचे स्वरूप बदल करण्याची दाट शक्मयता आहे. चतुर्थातील महत्त्वाची चतुर ग्रह युती नोकरी व शाळेतील संदर्भातील काही समस्या मिटविण्यास मदत करील. साडेसातीचा प्रभाव असला तरीही इतर ग्रहमान अनुकूल असल्याने महत्त्वाची कामे शक्मयतो अडणार नाहीत. काही भाग्यवंतांना जवळच्या नात्यातील अथवा नोकरी विषयातील ओळखीच्या व्यक्तीशी विवाहाच्या संधी येतील.
मिन
भाग्यस्थानी चंद-केतू योगावर आलेली पौर्णिमा जीवनात काहीतरी निराळे वळण लाविल. पण कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी कोणत्याही प्रलोभनाला अडकू नका. रम, रमा, रमी यामुळे अनेकजण फसलेले आहेत हे लक्षात ठेवा. दक्षता घेतल्यास कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. नवीन कामाची ऑर्डर मिळाल्यामुळे काही जुनी कामे इतरांच्याकडे सोपविण्याचा प्रयत्न कराल. द्रवपदार्थ तसेच समुद्र संबंधित व्यवसाय असेल तर मोठे लाभ होऊ शकतात. पूर्वी नजरचुकीने गहाळ झालेली अथवा हरवलेली एखादी महत्त्वाची वस्तू अचानक सापडेल. त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल