ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसमुळे देशात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या स्वतः च्या पगारात 30 टक्के कपात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या साथीचा मुकाबला करण्यासाठी मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच अन्य प्रकारच्या खर्चातही राष्ट्रपतींनी कपात केली आहे.
यामध्ये, सुरक्षित वावर राखण्यासाठी राष्ट्रपतींनी देशांतर्गत कार्यक्रमाने दौरे देखील कमी केले असून त्यावरील खर्चातही कपात केली आहे. तसेच राष्ट्रपती भवनात होणारे भोजन समारंभ तसेच भोजनातील अन्नपदार्थांची संख्या ही कमी केले आहेत.
राष्ट्रपतींनी खर्चात कमी करण्यासाठी लिमोझिन खरेदीही पुढे ढकलली आहे. ही गाडी राष्ट्रपतींना विविध कार्यक्रमांना जाण्यासाठी वापरण्यात येते. यावर्षी राष्ट्रपतिभवनात कोणतेही काम केले जाणार नाही केव्हा सुरू असलेली कामे पूर्ण केली जातील असेही राष्ट्रपतींनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.