राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना संकट पाहात स्वतःच्या वेतनाचा 30 टक्के हिस्सा एक वर्षापर्यंत दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रपतींनी मार्चचे पूर्ण वेतन दान केले होते. याचबरोबर राष्ट्रपती भवनाच्या अन्य खर्चांमध्येही कपात करण्यास सांगण्यात आले आहे. याकरता समारंभ, प्रीतिभोजनात कमी पाहुण्यांना बोलाविणे, सजावटीकरता फुलांचा मर्यादित वापर, खाद्यपदार्थ तसेच राष्ट्रपतींच्या देशांतर्गत दौऱयांमध्ये कपात करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनाच्या पारंपरिक सोहळय़ात वापरलया जाणाऱया लिमोझिन (कार)च्या खरेदीचा प्रस्तावही स्थगित करण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये सरकारने खासदारांच्या वेतनात वर्षभरासाठी 30 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच खासदारनिधी देखील दोन वर्षांसाठी स्थगित केला आहे. या रकमेचा वापर आता कोरोना संकट निवारणासाठी करण्यात येत आहे. पंतप्रधान आणि नेत्यांच्या वेतनातही 30 टक्के कपात केली जात आहे.