नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
तीन महिन्यांनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुन्हा एकदा उत्तरप्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रपतींचा हा दौरा २६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपती कोविंद २६ ऑगस्ट रोजी राजधानी लखनौला दाखल होणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते बाबा भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. राष्ट्रपती २९ ऑगस्ट रोजी प्रेसिडेंशियल ट्रेनने अयोध्येला पोहोचणार आहेत.
लखनौ येथील सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त २७ ऑगस्ट रोजी पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध करणार आहे. यासोबतच ते शाळेच्या हजार क्षमतेच्या सभागृहाचे उद्घाटन करतील. यानंतर ते शाळेत मुलींच्या वसतिगृहाची पायाभरणीही करणार आहे.राष्ट्रपती कोविंद २८ ऑगस्ट रोजी गोरखपूरला जाणार आहेत. राष्ट्रपती कोविंद आयुष विद्यापीठाच्या पायाभरणी आणि गोरक्षनाथ विद्यापीठातील रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहे.
यापूर्वी जूनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान, त्यांनी त्यांच्या कानपूर, पारुंख या गावालाही भेट दिली होती.