ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे नेते आणि ठाण्यातील माझी खासदार आनंद परांजपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद परांजपे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत काम करत होते. जितेंद्र आव्हाड यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र खबरदारी म्हणून ते होम क्वारंटाईन झाले आहेत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आनंद परांजपे यांचे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या 16 वर पोहोचली आहे.
सध्या आनंद परंजपे रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या संपर्कात आलेले आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांची, सहकाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.