प्रतिनिधी/ बेळगाव
ज्ये÷ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस शनिवारी बेळगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केक कापून आनंद व्यक्त केला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू महादेव पाटील, राज्य सचिव के. जी. पाटील, संध्या पेरनुरकर आदींच्या उपस्थितीत रामलिंग खिंड गल्ली येथील कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. अमोल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मुनीर लतीफ, दुर्गेश मेत्री, दीपक नार्वेकर, शिवाजी लाड, विनायक पाटील यांची भाषणे झाली.
जोतिबा पाटील यांनी आभार मानले. अल्ताफ सनदी, रामकृष्ण सांबरेकर, शाम मॉन्थेरिओ, कृष्णा गोविंद कांबळे, पंकज जाधव, विनायक पाटील, सुनील कुट्रे, धनपाल अक्षीमनी, अमित गाडेकर, गोपाळ कंग्राळकर, सुमीत बेरडे, निलेश चौगुले, विवेक कुट्रे, दीपक पाटील, प्रदीप किल्लेकर, विजाज खणगावकर, विनय कडोलकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.