प्रतिनिधी/ वडूज
वडूज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे सहकार्य घेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावर अपक्ष उमेदवारांना संधी दिली. नगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार सौ. मनिषा रविंद्र काळे तर उपनगराध्यक्षपदी प्रभाग चार मधील अपक्ष उमेदवार मनोज कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणूकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनिल गोडसे, सौ. आरती काळे, सौ. स्वप्नाली गोडसे, सौ. रोशना गोडसे,सौ. शोभा वायदंडे तसेच वंचितच्या सौ. शोभा बडेकर, अपक्ष सौ. राधिका गोडसे यांनी जाहीर समर्थन दिले होते. तर ऐनवेळी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक अभय देशमुख यांनीही गुलालात राहणेच पसंत केले.
निवड जाहीर होताच सौ. काळे, श्री. कुंभार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल, भंडायाची उधळण करीत जल्लोषी मिरवणूक काढली. या मिरवणूकीत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, सुरेंद्रदादा गुदगे, प्रा. बंडा गोडसे, हर्षदा देशमुख, हिंदुराव गोडसे, काँग्रेसचे नेते अशोकराव गोडसे, डॉ. महेश गुरव, वंचितचे जिल्हाध्यक्ष शाकीरभाई तांबोळी, इम्तियाज नदाफ, तुषार बैले, युवा नेते पृथ्वीराज गोडसे, विपूल गोडसे, चंद्रकांत काळे, विजय काळे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, धनाजीशेठ काळे, डॉ. महेश माने, राजेंद्र कुंभार, शिवाजी गोडसे, हरीभाऊ कुंभार, अशोकराव बैले, प्रतिक बडेकर, डॉ. संतोष गोडसे, विजय गोडसे, अक्षय थोरवे, विनोद शिंदे, दाऊद मुल्ला, बाळासाहेब काळे, नितीन बुरूंगले आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
समृध्द राजकीय वारसा
नूतन नगराध्यक्षा सौ. मनिषा व त्यांचे पती उद्योग व्यवसायानिमित्त बेंगलोरमध्ये वास्तव्यास असले तरी त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. सौ. काळे यांचे सासरे कै. शंकरराव काळे (आप्पा) यांनी वडूज विकास सेवा सोसायटीचे संचालकपद भूषविले आहे. तर आजे सासरे कै. बाळकृष्ण उर्फ किसनराव काळे हे 1962 ते 64 या काळात वडूजचे सरपंच होते. चुलत सासू सौ. रत्नमाला काळे या 2002 ते 2007 या काळात जिल्हा परिषद सदस्या होत्या. तर सौ. काळे यांच्या सख्या नणंद सौ. मेघा जीवनशेठ पुकळे या कलेढोण गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या आहेत.
विकासाचे नवे पर्व ः देशमुख.
जातीवादी विचार व धनशक्तीला बाजूला करण्यासाठी वडूजमध्ये अपक्ष व वंचित आघाडीच्या मदतीने वडूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची सत्ता स्थापन केली आहे. या निमित्ताने विकासाचे नवे पर्व उभे राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी व अपक्ष तीन उमेदवारांनी एकत्र येऊन जिल्हाधिकायांसमोर नविन विकास आघाडीची नोंदणी केली आहे. त्यामुळे पाच वर्षे या आघाडीच्या माध्यमातून स्थिर शासन देण्याबरोबरच मोठय़ा प्रमाणावर विकास कामांना गती दिली जाईल. तसेच या पुढच्या काळात बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिली जाईल असे मत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
दै. तरुण भारत चा अंदाज तंतोतंत
वडूज नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ’अपक्षांच्या हाती सुकाणू’ अशी हेडलाईन प्रसिद्ध केली होती. तर नगराध्यक्ष पद निवडणूक वार्तापत्रामध्ये ’जर -तर’ च्या मुद्यावर सौ. काळे यांना संधी मिळू शकते.असे नमूद केले होते. दै. तरुण भारत चा हा अंदाज आज तंतोतंत खरा ठरला.