प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहरातील व्यापाऱयांनी बंद पाळावा असे आवाहन करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दुचाकी रॅली शहरातून काढण्यात आली. शहरातील व्यापाऱयांना बंद पाळा अशी विनंती त्यांनी केली. रॅलीची सुरुवात राजवाडा येथून सकाळी 11.30 वाजता झाली. तेथून मोती चौक, राधिका टॉकीज चौक, राधिका रोड, बसस्थानक, पोवई नाका, शाहु चौक, अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर अशी रॅली काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, तेजस शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या दुचाकी रॅलीत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, ऍड. वैभव मोरे, डॉ. वैभव कळसे, प्रथमेश पवार, सचिन जाधव, जीवन काटकर, हर्षल भोईटे, विकास अवघडे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.