ऑनलाइन टीम / पुणे :
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद सलग दुसऱया दिवशीही महाराष्ट्रात उमटत आहेत.
राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील टिळक रोड येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाच्या बोर्डला काळं फासलं आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं आहे.
कार्यालयाला काळे फासल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा हा भ्याड हल्ला असून त्याचा निषेध करत काळे फासणाऱयांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी अभाविपद्वारे यावेळी करण्यात आली.