जिल्हय़ातील 743 बँका बंद ठेवून संप यशस्वी : निदर्शनांद्वारे केंद्राच्या खासगीकरणाला विरोध
प्रतिनिधी / बेळगाव
खासगीकरण विरोधात राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप मंगळवारीही सुरू होता. धर्मवीर संभाजी चौक येथे सर्व कर्मचाऱयांनी एकत्रित येऊन सरकारच्या धोरणाचा निषेध केला. सलग दोन दिवस बँका बंद असल्याने सुमारे 300 हून अधिक कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी बुधवारी बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाबद्दल प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोन दिवस देशव्यापी संप पुकारण्यात आला. बेळगाव जिल्हय़ातील 743 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा बंद ठेवून संप यशस्वी करण्यात आला. मंगळवारी धर्मवीर संभाजी चौक येथे बँक कर्मचाऱयांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत खासगीकरणाला विरोध केला. यावेळी बेळगाव परिसरातील बँक कर्मचारी उपस्थित होते.
खासगी-सहकारी बँकांवरही संपाचा परिणाम दुसरा शनिवार व रविवारच्या साप्ताहिक सुटीला जोडून बँकांचा संप आल्यामुळे सलग 4 दिवस बँका बंद होत्या. राष्ट्रीयकृत बँका बंद असल्या तरी त्याचा परिणाम खासगी, सहकारी व को-ऑप. सोसायटय़ांनाही बसला. बँका बंद असल्याने मोठय़ा रकमांचे व्यवहार ठप्प झाले होते. काही खासगी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत होती.