प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय एससी-एसटी आयोगाच्या चेअरमनपदी विजय संपालाजी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल देशातील विविध राज्यांमधील एससी-एसटी सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. दिल्ली येथील पंजाब भवन येथे हा सत्कार करण्यात आला.
भाजपचे कर्नाटक राज्य एससी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वी सिंग यांच्या हस्ते विजय संपालाजी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जस्वीर सिंग (कर्नाटक), राहुल रॉय (पंजाब), आशिष बन्सल (दिल्ली), प्रवीण गोयल (उत्तरप्रदेश) यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील अनेक दलित नेते उपस्थित होते. दलित समाजावर होणारे अन्याय दूर करण्यासोबतच रोजगार निर्मिती, विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.