बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
गंगावती येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऑनलाईन कटा विभाग कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबच्या खेळाडूंनी 10 सुवर्ण, 6, रौप्य व 2 कास्यपदके पटकावित घवघवीत यश संपादन केले.
ऑनलाईन राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देशातून विविध राज्यांतील कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात इंडियन कराटे क्लबच्या खेळाडूंनी यश मिळविले. त्यात स्नेहा भद्रशेट्टी, श्रेया भद्रशेट्टी, रोहिणी तहशीलदार, गणेश पाटील, अक्षता देमाणे, रोहित तहशीलदार, ओमकार चौहान पाटील, अकुल खोत, रिझवान, विश्वा ताशीलदार यांनी सुवर्णपदक, सियान पटेल, संदेश गुडस, आयुष्य कल्लोळी, रिद्धी तहशीलदार, तानिशा हवालदार, विहान भद्रशेट्टी यांनी रौप्य तर आर्यनसिंग राजपूत व विजय होनगौडर यांनी कास्यपदक पटकाविले. या सर्व कराटेपटूंना कराटेमास्टर राजेंद्र काकतीकर, प्रशिक्षक परशुराम काकती यांचे मार्गदर्शन लाभले आहे.